
Aishwerya Rai : Miss Universe ला राणी मुखर्जीने केलंलं रिप्लेस!
रोमॅंटिक चित्रपट म्हटलं की त्यात शाहरुख खान (Shah Rukh Khan) असणार हे समीकरण गेल अनेक वर्ष पक्क ठरलं आहे. असाच २००३ मध्ये शाहरुख खान याचा ‘चलते चलते’ (Chalte Chalte) हा चित्रपट आला होता. काही अंशी विषयानुसार काळाच्या पुढचा हा चित्रपट होता. राणी मुखर्जी (Rani Mukherjee) या चित्रपटात शाहरुख सोबत झळकली होती. पण तुम्हाला माहित आहे का ‘चलते चलते’साठी आधी राणी ऐवजी ऐश्वर्या रायची (Aishwerya Rai) निवड करण्यात आली होती. मात्र, नंतर चक्क राणीने मिस युनवर्सला रिप्लेस केलं होतं. (Bollywood movies)

तर, ‘चलते चलते’ या चित्रपटात आधी शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय हि जोडी फिक्स झाली होती. इतकंच नाही तर चित्रपटाचं शुट देखील सुरु झालं होतं. पण काही कारणामुळे ऐश्वर्याला राणी मुखर्जीने रिप्लेस केलं. याबद्दल चलते चलते चित्रपटाचे दिग्दर्शक अझीझ मिर्झा यांनी‘रेडिओ नशा’ला दिलेल्या एका खास मुलाखतीत कारण सांगितलं आहे. ते म्हणाले की, “मला माहीत नाही. असो!”. पुढे त्यांना विचारण्यात आले की, ऐश्वर्यासोबत बरेच सीन शूट करण्यात आले होते का? ते म्हणाले, नाही. आम्ही फक्त ‘प्रेम नगरिया’ हे गाणे शूट केलं होतं. आम्ही फक्त एका दिवसाचंच शूटिंग केलं होतं. दुर्दैवाने, गोष्टी आमच्या इच्छेनुसार घडल्या नाहीत आणि मग राणी चित्रपटाचा भाग बनली.” (Entertainment news)

महत्वाचं म्हणजे ‘चलते चलते’ या चित्रपटात पहिल्यांदात अझीझ मिर्झा यांनी शाहरुख खानसोबत जुही चावला हिला (Juhi Chawala) कास्ट केलं नव्हतं. यापूर्वी त्यांच्या पहिल्या तीनही चित्रपटांमध्ये जूही चावला आणि शाहरुख खान एकत्र दिसले होते. त्यामुळे पुन्हा एकदा चलते चलते मध्ये जुहीला का घेतलं नाही असं विचारले असता ते म्हणाले की, “मला वाटलं होतं की, लोकांना काहीतरी वेगळं पाहायचं आहे. असं नाही की, राणी वाईट होती, राणी नेहमीसारखीच (Rani Mukherjee) चांगली होती.” (Untold stories)
========
हे देखील वाचा : ऐश्वर्या राय बच्चनने नाकारलेले पाच चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का??
========
इतकंच नव्हे तर चलते चलते हा चित्रपट अमिषा पटेल (Amisha Patel) हिला देखील विचारण्यात आला होता. मात्र, अमिषाच्या सेक्रेटरीने तिच्यापर्यंत तो चित्रपट किंवा ती ऑफर जाऊ न देता परस्पर स्वत:हूनत अमिषा हा चित्रपट करणार नाही असं उत्तर दिलं होतं. काही महिन्यांपूर्वीच अमिषाने एका मुलाखतीमध्ये चलते चलते चित्रपट तु नाकारला होता का? असं विचारल्यावर हा महत्वाचा खुलासा केला होता.
अमिषा म्हणाली होती की, “चलते चलते रिलीज होण्याच्या मार्गात होती त्यावेळी शाहरुख खन डबिंग करत होता. त्यावेळी शाहरुखने अमिषा ये मी तुला तू माझ्यासोबत रिजेक्ट केलेल्या चित्रपटाचे काही इडिटेड सीन्स दाखवतो असं म्हटलं होतं. त्यावर मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की मी तो चित्रपट नाकारला नव्हता. मुळात तो माझ्यापर्यंत आलाच नव्हता तो माझ्या सेक्रेटरीने परस्पर नकार कळवला होता. ते का केलं होतं हे मलाही माहित नाही”. (Amisha patel and chalte chalte movie)

दरम्यान २००३ मधील ‘चलते चलते’ हा सुपरहिट चित्रपट ठरला होता. राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटात सतीश शाह, जॉनी लिव्हर, जयश्री टी असे अनेक कलाकार होते. ११ कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाने २००३ मध्ये ४३.२८ कोटी वर्ल्डवाईड कमावले होते. तर भारतात चित्रपटाने ३०.१५ कोटींची कमाई केली होती. (Chalte chalte movie box office collection)
रसिका शिंदे-पॉल