Ramayana Movie : १६०० कोटींच्या भव्य ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूरचं

Bollywood News : “मी धार्मिक नाही तर…, गायत्री मंत्रामुळे मला…”;मुस्लिम अभिनेत्रीचं महत्वाचं विधान
आपल्या देशात सर्व धर्म समभाव आहे अगदी तसंच सिनेइंडस्ट्रीतही विविध प्रांतामधून आलेले वेगवेगळे धर्मीय कलाकार प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसतात… प्रत्येक कलाकार इतरांच्या धर्मांचा आदर करताना आपण पाहतो.. आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी मुस्लिम धर्मीय असूनही हनुमान चालीसा म्हणते आणि गायत्री मंत्राचा जप देखील करते… कोण आहे ही अभिनेत्री जिला गायत्री मंत्र आणि हनुमान चालीसामुळे शांतता मिळते.. जाणून घेऊयात..(Bollywood News)

बॉलिवूडच्या ज्या अभिनेत्रीबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय ती रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत ‘रॉकस्टार’ (Rockstar Movie) चित्रपटात झळकली आहे… ती अभिनेत्री म्हणजे नर्गिस फाखरी (Nargis Fakhari)… मुस्मिल असूनही तिने स्वत:चा धर्म न बदलता नर्गिस गायत्री मंत्राचा जप करते आणि हनुमान चालीसा देखील म्हणते… मुस्लिम असूनही तिचा हिंदू पूजापाठावर विश्वास आहे… नर्गिसने News9 Live शी बोलताना ती स्वतः धार्मिक नसून अध्यात्मिक असल्याचं म्हटलं आहे… नर्गिस म्हणाली की, मला सर्व धर्मांबाबत जाणून घ्यायला आवडतं. माझ्या घरात गायत्री मंत्र म्हटला जातो.मंत्रोच्चार, हनुमान चालिसा यांची सकारात्मक उर्जा मी अनुभवते आणि यामुळे मला तिला चांगलं देखील वाटतं”.(Entertainment News)
================================
हे देखील वाचा: अभिनयापूर्वी आपल्याच वडिलांना Direct करणारा Ranbir Kapoor!
=================================
नर्गिस फाखरी हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये २०११ मध्ये आलेल्या रॉकस्टार चित्रपटातून पदार्पण केलं होतं… त्यानंतर तिने ‘मद्रास कॅफे’, ‘फटा पोस्टर निकला हिरो’,’स्पाय’, ‘मे तेरा हिरो’, ‘बॅंजो’, ‘हाऊसफुल्ल ३’, ‘अमावस’, ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) अशा अनेक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत…(Nargis Fakhri Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi