Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

बॉलिवूडच्या ‘या’ ऑनस्क्रीन यशस्वी जोड्या ठरल्या खऱ्या आयुष्यातही सुपरहिट!
बॉलिवूडमधल्या कित्येक जोड्या ऑनस्क्रीन सुपरहिट जोड्या समजल्या जातात (Couples of Bollywood), तर काही जोड्या ‘रिअल लाईफ’ मध्ये सुपरहिट असतात, पण ‘रील’ लाईफमध्ये मात्र प्रेक्षकांनी त्यांना नाकारलेलं असतं. सैफ- करीना, ऐश्वर्या -अभिषेक, अजय देवगण – काजोल, अक्षय – ट्विंकल, रितेश – जेनेलिया अशा खऱ्याखुऱ्या आयुष्यात सुखाने संसार करणाऱ्या जोड्या पडद्यावर मात्र लोकांनी फारशा पसंत केल्या नाहीत. पण या लेखात बॉलिवूडमध्ये ‘रील आणि रिअल’ आयुष्यातही लोकप्रिय असणाऱ्या जोड्या आणि त्याच्या प्रेमकहाण्यांबद्दल माहिती घेऊया (Couples of Bollywood).
१. अमिताभ -जया
बॉलिवूडमधल्या ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रीन यशस्वी असणाऱ्या जोड्यांमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे नाव सर्वात आधी येतं. बॉलिवूडचा शहेनशहा बिग-बी अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांची प्रेमकहाणी लोकांनी जेवढी ऑनस्क्रीन पसंत केली तेवढीच ऑफस्क्रीन म्हणजेच रिअल लाईफमध्येही यशस्वी आहे.
अमिताभ जेव्हा बॉलिवूडमध्ये नवीन होता तेव्हा जयाचं इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी बस्तान बसलं होतं. अमिताभ तेव्हा स्ट्रगल करत होता. गुड्डी चित्रपटासाठी आधी अमिताभची निवड झाली होती, पण नंतर त्याला या चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. त्यावेळी अमिताभबद्दल जयाच्या मनात ‘सॉफ्ट कॉर्नर’ निर्माण झाला. पुढे जंजीर दरम्यान त्यांच्यामधली मैत्री अधिक दृढ झाली.

अमिताभ- जयाच्या लग्नाचा किस्साही भन्नाट आहे. जंजीर चित्रपटाचं यश साजरे करण्यासाठी अमिताभ बच्चन आणि जयाला लंडनमध्ये जायचं होतं. पण अमिताभचे वडील हरिवंशराय बच्चन यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते म्हणाले की, “जर तुम्हाला परदेशातजायचं असेल, तर आधी दोघांनी लग्न करा आणि मग एकत्र परदेशात जा.” त्यानंतर अमिताभने जयाला लग्नासाठी मागणी घातली आणि जयानेही होकार दिला. आणि लगेचच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह सोहळा पार पडला. (Couples of Bollywood)
अमिताभ आणि जयाचं नातं आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे. नाही म्हणायला त्यांच्या आयुष्यात रेखा नावाचं वादळ आलं होतं आणि ते बराच काळ घोंगावतही होतं. पण तरीही अमिताभ – जया यांचं नातं आजही कायम आहे.

अमिताभ आणि जया यांनी जंजीर, अभिमान, शोले, सिलसिला, कभी खुशी कभी गम असे अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. असं म्हटलं जातं की, सिलसिला हा चित्रपट अमिताभ, जया आणि रेखा यांच्या आयुष्याची खरीखुरी कहाणी होती. अर्थात या अफवा असल्याचा दावाही करण्यात येतो. जे काही असेल ते असेल, पण या चित्रपटानंतर अमिताभ आणि रेखाने कधीही एकत्र काम केलं नाही.
२. धर्मेंद्र – हेमा
धर्मेंद्र आणि हेमामालिनी ही ऑनस्क्रीन तुफान लोकप्रिय असणारी जोडी ऑफस्क्रीन देखील तितकीच यशस्वी ठरली आहे. धर्मेंद्र आणि हेमामालिनीची भेट झाली तेव्हा धर्मेंद्र आधीपासूनच विवाहित होता. इतकंच काय तर, त्याला तीन मुलंही होती. हेमामालिनी म्हणजे साक्षात बॉलिवूडची स्वप्नसुंदरी. परंतु, तरीही या दोघांच्या प्रेमाच्या मध्ये कोणतीच गोष्ट आली नाही.
हेमामालिनीशी लग्न करण्यासाठी धर्मेंद्रने मुस्लिम धर्म स्वीकारला आणि आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता तिची आणि मुलांचीही जबाबदारी घेतली. हेमामालीनीनेही धर्मेंद्रच्या निर्णयाला विरोध न करता त्याच्याशी लग्न केलं. हेमामालिनीच्या वडिलांचा या दोघांच्या नात्याला विरोध होता कारण आपल्या मुलीने विवाहित पुरुषाशी लग्न करणं त्यांना मान्य नव्हतं. अखेर हेमाने तिच्या वडिलांच्या निधनानंतर धर्मेंद्रशी लग्न केलं.
धर्मेंद्र आणि हेमा जोडी ‘रील’ आणि ‘रिअल’ आयुष्यामध्येही सुपरहिट जोडी समजली जाते. या जोडीचे शोले, सीता और गीता, राजा जानी, ड्रीम गर्ल असे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. (Couples of Bollywood)
३. ऋषी कपूर – नीतू कपूर
बॉलिवूडमधील ‘स्वीट कपल’ म्हणजे ऋषी कपूर आणि नीतू कपूर. या दोघांची प्रेमकहाणी अगदी चित्रपटाला शोभेल अशीच होती. ‘जहरीला इन्सान’ या चित्रपटाच्या निमित्ताने या दोघांची ओळख झाली. सुरुवातीला या दोघांची फक्त मैत्री होती. ऋषी कपूर सतत थट्टा मस्करी करून नीतूला त्रास देत असत.
एका शूटिंग दरम्यान मुंबईबाहेर असताना ऋषीला नीतूवरील प्रेमाची जाणीव झाली. या दोघांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबीयांचा विरोध होता. परंतु, अखेर खरं प्रेम जिंकलं आणि ऋषी – नीतूची केमिस्ट्री ऑनस्क्रीन इतकीच ऑफस्क्रीनही यशस्वी ठरली. दुर्दैवाने एप्रिल २०२० मध्ये ऋषी कपूरचा मृत्यू झाला.

ऋषी – नीतू यांनी आजवर एकूण १२ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये अमर अकबर अँथनी, रफ़ू चक्कर, कभी कभी, लव्ह आज कल, दो दुनी चार, बेशरम या चित्रपटांचा समावेश आहे. (Couples of Bollywood)
४. रणवीर सिंग – दीपिका
सध्याच्या काळातील ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन लोकप्रिय असणारी जोडी म्हणजे रणवीर – दीपिका. रणबीर कपूर बरोबर ब्रेकअप झाल्यावर एकाकी पडलेल्या दीपिकाच्या आयुष्यात रणवीरची एंट्री झाली. रणवीर तेव्हा बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत होता. आणि दीपिका बऱ्यापैकी स्थिरावत होती.
रणवीर आणि दीपिका यांनी कारकिर्दीच्या यशस्वी वळणावर असतानाच विवाहबद्ध झाली. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी झालेल्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज केसमध्ये दीपूला चौकशीसाठी बोलावलं होतं तेव्हा रणवीर सावलीसारखा तिच्यासोबत होता. या दोघांमधलं प्रेम छोट्या छोट्या प्रसंगातूनही सहज ‘हायलाईट’ होत असतं. (Couples of Bollywood)

====
हे देखील वाचा: ‘ओम शांती ओम‘ हे गाणे आधी लक्ष्मीकांतच्या स्वरात रेकॉर्ड झालं होतं का ?
====
रणवीर आणि दीपिका यांनी बॉम्बे टॉकीज, राम -लीला, बाजीराव -मस्तानी, पद्मावत, 83 अशा एकूण ६ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. रील आणि रिअल आयुष्यात या दोघांची जोडी सध्यातरी सुपरहिट आहे.
– भाग्यश्री बर्वे