Ashok Saraf : अशोक मामांनी इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु करण्याचं कारण

भाऊ-ओंकार एकत्र इलो ! “करून गेलो गांव” पुन्हा नव्याने रंगभूमीवर
काही भाषा या कानाला ऐकायला अतिशय गोड वाटतात त्यातलीच एक भाषा म्हणजे मालवणी भाषा. ही भाषा आपल्याला समजू दे अगर नको समजू दे पण ती ऐकण्यात एक वेगळीच मजा येते. याच मुळे रंगभूमीवर अशी अनेक मालवणी भाषेतील नाटक आहेत जी मालवणी भाषेत सुरु झाली आणि प्रेक्षकांचा ही त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला. आता अशाच मालवणी भाषेतील नाटक प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. नाट्य रसिकांच्या प्रेमापोटी निर्माते राहुल भंडारे आणि महेश वामन मांजरेकर यांनी दहा वर्षापूर्वी प्रचंड लोकप्रिय झालेले “करून गेलो गांव” हे मालवणी नाटक पुन्हा नव्या रूपात रंगभूमीवर आणले आहे.(Karun Gelo Gaon)

विशेष म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने दोन भन्नाट विनोदवीरांची जोडी प्रेक्षकांच एकत्र मनोरंजन करणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेले भाऊ कदम आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ या कार्यक्रमातून मधून लोकप्रिय झालेला अभिनेता ओंकार भोजने या दोघांची फ्रेश जोशी आपल्याला या नाटकात पहायला मिळणार आहे. या नाटकातून भाऊ कदम आपल्या विनोदाची आणि अभिनयाची जादू दाखवून देणार आहेत. तर विनोदाच्या अफलातून टायमिंगनं सर्वांना हसवणारा कोकण कोहिनूर अर्थात अभिनेता ओंकार भोजने आता व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करतोय.

या नाटकाच्या निमित्तानं विनोदवीरांची एक नवी आणि अनोखी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राजेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणार्या या नाटकाची थीम तीच असली तरी काळानुसार सध्याच्या घडामोडीवर आधारीत थोडेफार बदल करण्यात आले आहेत. ओंकार भोजने आणि भाऊ कदम बरोबरच या नाटकात अभिनेत्री उषा साटम, नुपूर दूदवडकर, प्रणव जोशी, अनुष्का बोऱ्हाडे, सौरभ गुजले, सचिन शिंदे, सुमित सावंत, दिपक लांजेकर हे कलाकार देखील आहेत. मुंबई व महानगरात प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हाऊसफुल्लचा बोर्ड झळकविलेलं हे नाटक आता संपूर्ण महाराष्ट्रात धमाल करण्यास सज्ज झाले आहे.(Karun Gelo Gaon)
==============================
(हे देखील वाचा: विनोदवीर कुशल बद्रीके पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत)
=============================
भाऊ कदम यांनी १९९१ मध्ये नाटकांतून अभिनय करण्यास सुरुवात केली, तेव्हापासून त्यांची अभिनय कारकीर्दीची सुरुवात झाली.त्यांची लोकप्रियता हि “फू बाई फू”च्या टीव्ही कार्यक्रमातून झाली आणि ते त्यांच्या भूमिकेबद्दल प्रसिद्ध झाले. आता त्यांनी लोकांच्या मनात एक विनोदी कलाकार म्हणून घर करून घेतले आहे.आणि ओंकार भोजने बद्दल बोलायचे झाल्यास आपल्या पहिल्या नाटकासाठी ओंकार भोजने प्रचंड खुश आहे. काही दिवसांआधीच ‘सरला एक कोटी’ या सिनेमातून त्यानं मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर आता तो व्यावसायिक नाटकात काम करणार आहे.