Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Rajkumar Rao : ‘भूल चूक माफ’ चित्रपटाने दमदार ओपनिंग केली
गेल्या काही दिवसांपासून राजकुमार राव (Rajkumar Rao) याचा ‘भूल चूक माफ’ (Bhool Chuk Maaf) चित्रपट विशेष चर्चेत आहे. देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे राजकुमार रावचा हा चित्रपट थिएटरऐवजी ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोर्टाच्या कचाट्यात अडकलेल्या या चित्रपटाने अखेर थिएटरमध्येच चित्रपट प्रदर्शित होईल असं जाहिर केलं आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर राजकुमारचा हा चित्रपट किती कमाई करेल याबद्दलअंदाज वर्तवला जात आहे. जाणून घेऊयात आकडेवारी…(Entertainment news)

ओटीटी आणि थिएटर रिलीजच्या वादात अडकलेला ‘भूल चूक माफ’ चित्रपट अखेर आज २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित झाला. खरं तर जुन्या गाण्यांना नवी ओळख देत राजकुमार रावचा हा चित्रपटही प्रेक्षकांना आवडेल असं म्हटलं जात होतं. शिवाय, त्याच्या यापूर्वी आलेल्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्डही तो मोडेल असं देखील म्हटलं जात होतं. ‘भूल चूक माफ’ची लोकप्रियता तशी कमीच होती. त्यामुळे पहिल्या दिवशी हा चित्रपट ५ कोटींचा आकडा गाठेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात आली होती. (Bollywood news)
आता सॅकनिल्कवर ‘भूल चूक माफ’ चित्रपटाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. राजकुमार रावच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ २.६८ कोटींचीच कमाई केली आहे. यापूर्वीच्या राजकुमारच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी उत्तम कमाई केली होती. मात्र, या चित्रपटाने अत्यंत निराशाजनक ओपनिंग केल्यामुळे पुढे हा चित्रपट २० कोटींचा टप्पा तरी गाठेल का अशी शंका व्यक्त केली जात आहे. (Bhool Chuk Maaf movie box office collection)
================================
हे देखील वाचा: War 2 : दमदार अॅक्शन आणि कसदार अभिनय; ह्रतिक-Jr NTRच्या चित्रपटाचा टीझर रिलीज
=================================
करण शर्मा दिग्दर्शित ‘भूल चूक माफ’ चित्रपटात राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्याव्यतिरिक्त, सीमा पाहवा, संजय मिश्रा, झाकीर हुसेन, रघुबीर यादव व इश्तियाक खान यांनीही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.( Bhool chuk maaf cast)