Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Ustad Bismillah Khan : उस्ताद बिस्मिल्लाह खान – शहनाईचा सच्चा किमयागार
आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्यासाठी मुहूर्त, दिवस जितका आवश्यक समजला जातो, तितकीच महत्वाची समजली जाते सनई. कोणतेही शुभकार्य या सनईशिवाय संपन्नच होत नाही. इतके मोठे गारुड या सनईचे आपल्यावर आहे. मात्र एक मिनिट….हे गारुड फक्त सनईचेच नाही तर सनई वाजवणाऱ्या दिग्गज अशा उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे देखील आहे बरं का. कारण सनई म्हणजेच उस्ताद बिस्मिल्लाह खान आणि उस्ताद बिस्मिल्लाह खान म्हणजे सनई. (Ustad Bismillah Khan)
सनई आणि उस्ताद बिस्मिल्लाह खान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्याशिवाय आपण सनईची कल्पनाच करू शकत नाही. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या उस्ताद बिस्मिल्लाह खान यांनी त्यांच्या सनई वादनामुळे संपूर्ण जगात मोठा नावलौकिक कमावला. उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचं निधन होऊन १९ वर्ष झाले, मात्र आजही ते त्यांच्या सनईच्या रूपाने आपल्यामध्ये कायम आहेत. अतिशय सच्चा कलाकार म्हणून नेहमीच खान साहेबांचा उल्लेख होतो. यशाने त्यांच्या पायाशी अक्षरशः लोळण घेतली मात्र त्यांनी त्यांचा साधेपणा सोडला नाही. (Ustad Bismillah Khan Birth Anniversary)

कार्यक्रमांच्या निमित्ताने खान साहेबांनी जगभर प्रवास केला. जवळपास जगातील सर्वच देशांमध्ये त्यांनी कार्यक्रम केले, मात्र तरीही ते स्वतःचे कपडे स्वतःच धुवायचे. जन्माने जरी ते मुसलमान असले तरी त्यांच्यासाठी प्रत्येक धर्म तितकाच महत्वाचा होता. काशी विश्वनाथ मंदिरात कायम त्यांचे सनईवादन असायचे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर बसून तासनतास रियाज करणे त्यांचं आवडते काम होतं. त्यांना कशी विश्वेश्वर आणि गंगा नदी या दोन गोष्टींबद्दल एक वेगळीच ओढ होती. असे असले तरी त्यांनी मुस्लिम धर्माच्या रिती कधीच सोडल्या नाहीत. ते रमजान महिन्यात उपवास करायचे. पाच वेळेला नमाज अदा करायचे. (Ustad Bismillah Khan Life Journey)
========
हे देखील वाचा : Prasad Oak: ‘सुशीला-सुजीत’मध्ये एक नाही ‘अनेक’ भूमिका साकारणार प्रसाद!
========
उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा जन्म २१ मार्च १९१६ रोजी बिहारमधील डुमरोन येथे झाला. त्याचे वडील भोजपूरच्या राजाच्या दरबारी संगीतकार होते. जेव्हा त्यांच्या आजोबांना खान साहेबांच्या जन्माबद्दल समजले तेव्हा त्यांनी अल्लाहचे आभार मानताना ‘बिस्मिल्लाह’ म्हटलं आणि तेव्हापासून त्यांचं नाव बिस्मिल्ला झालं. मात्र प्रत्यक्षात त्यांचं नाव कमरुद्दीन खान असं होतं. सुरुवातीपासूनच त्यांच्या घरात पूर्णपणे कलेचं वातावरण असल्यामुळे बिस्मिल्ला खान यांचा ओढा संगीताकडे आपसूकच निर्माण झाला. अगदी लहान वयातच ते शहनाई वाजवायला शिकले. (Ustad Bismillah Khan News)

लहान असतानाच बिस्मिल्ला खान वाराणसीला त्यांच्या मामाकडे अलिबक्ष विलायती यांच्याकडे राहायला गेले. अलिबक्ष हे काशीच्या विश्वनाथ मंदिरात शहनाई वाजवायचे. त्यांनीच बिस्मिल्ला खान यांना शहनाई वाजवायला शिकवली. कमी वयातच बिस्मिल्ला खान हे ठुमरी, चैती, कजरी, स्वानी असे विविध राग शिकले. त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी अलाहाबादच्या संगीत परिषदेत सनई वाजवली. पुढे मामाच्या मृत्यूनंतर उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी कशी विश्वनाथ मंदिरात अनेक वर्षे शहनाई वाजवली. त्यांनी ख्याल संगीताचाही अभ्यास केला आणि विविध रागांवर प्रभुत्व मिळवले. (Entertainement News)
सन १९३७ मध्ये कोलकाता येथील भारतीय संगीत परिषदेत त्यांनी सर्वप्रथम सार्वजनिक कार्यक्रमात शहनाई वादन केले. या कार्यक्रमानंतर त्यांचे अफाय कौतुक झाले आणि तिथूनच त्यांना खरी मोठी ओळख मिळाली. त्यानंतर, त्यांना १९३८ मध्ये लखनौ, ऑल इंडिया रेडिओमध्ये कामाच्या रूपाने त्यांना सर्वात मोठा ब्रेक मिळाला. पुढे एडिनबर्ग म्युझिक फेस्टिव्हलमध्ये आपली कला सादर केल्यानंतर त्याला जगभरात प्रसिद्धी मिळाली. (Marathi Top News)

खान साहेबांच्या शहनाईचे चाहते केवळ सामान्य लोकं नाही तर राजकारणी देखील होते. म्हणूनच जेव्हा १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वत्रंत्र झाला तेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. त्यावेळी तिथे उस्ताद बिस्मिल्ला खान यांना शहनाई वाजवली होती. २६ जानेवारी १९५० रोजी, भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, त्यांनी लाल किल्ल्यावरून राग कैफी देखील खान साहेबांनी सादर केला होता. त्यानंतर १९९७ साली स्वातंत्र्यदिनाच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी लाल किल्ल्यावर शहनाई वाजवली होती. तेव्हापासूनच नेहमी स्वतंत्रता दिन आणि प्रजासत्ताक दिन या दिवशी नेहमी उस्ताद बिस्मिल्ला खान यांची शहनाई आपल्याला ऐकायला मिळते.(Marathi Top Trending News)
उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी चित्रपटांमध्ये देखील शहनाई वाजवत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी कन्नड सिनेमा ‘सनादी अपात्रा’मध्ये राजकुमारसाठी शहनाई वाजवली होती. यासोबतच १९५९ मध्ये ‘गूंज उठी शहनाई’ सिनेमातील त्यांचे वंदन आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या शहनाईच्या अनेक कॅसेट, सिडी यांची विक्रमी विक्री झाली होती. उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी अफाट लोकप्रियता आणि पैसा कमावला. मात्र त्यांनी त्यांना मिळालेला पैसा कायम परिवारावर आणि गरजू लोकांवर खर्च केला. त्यामुळेच त्यांना आर्थिक संकटाचा देखील सामना करावा लागला होता. तेव्हा भारत सरकारने त्यांची मदत देखील केली होती. (Bollywood Mix Masala News)
========
हे देखील वाचा : Farida Jalal : “भन्साळींनी दारुचा ग्लास हातात घ्यायला सांगितला आणि…”
========
उस्ताद बिस्मिल्ला खान याना त्यांच्या वादनासाठी अनेक लहान मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना २००१ साली भारतातील सर्वोच्च अशा ‘भारत रत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले. यासोबतच त्यांना १९८० साली पद्म विभूषण, १९६८ मध्ये पद्म भूषण, १९६१ साली पद्म श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. १९५६ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.१९३० साली ऑल इंडिया म्यूजिक कॉन्फरन्समध्ये सर्वश्रेष्ठ वादनाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. तर मध्य प्रदेश सरकार त्यांचा सर्वोच्च संगीत पुरस्कार ‘तानसेन’ देऊन देखील उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा गौरव केला होता.(Ustad Bismillah Khan Awards)