Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…
१९६५ साली दिग्दर्शक चेतन आनंद एक चित्रपट बनवत होते ‘आखरी खत’. या चित्रपटासाठी त्यांनी नायक म्हणून गायक भूपिंदर यांना ऑफर दिली होती! परंतु भूपिंदर यांनी ‘आपल्याला संगीत क्षेत्रात करिअर करायचे आहे’ असं म्हणत ही संधी नाकारली! मात्र या चित्रपटात चेतन आनंद यांनी त्यांच्या स्वरात ‘रुत जवां जवां’ हे गाणे घेतले आणि त्यांच्यावरच चित्रित केले होते. नंतर भूपिंदर यांना कायम वाटत होतं की,’ जर नायक म्हणून ऑफर स्वीकारली असती तर कदाचित आज मी वेगळ्या जागी पोचलो असतो. गायक नायक म्हणून एक निराळी इमेज तयार झाली असती.’ (Indian cinema)
ते काहीही जरी असलं तरी भूपिंदर सिंग यांची कारकीर्द परिपूर्ण झाली असेच म्हणावे लागेल. कारण सत्तर आणि ऐंशीच्या दशकात ज्यावेळी सिने संगीताचा सुवर्णकाळ मागे पडून ॲक्शन पटांचा काळ आला होता; या काळात देखील भूपिंदर यांनी उत्कृष्टच गाणी रसिकांना सादर केली. भूपिंदर नशीब एवढं चांगलं होतं की त्यांना गुलजार सारखा सच्चा दोस्त मिळाला आणि आर डी बर्मन, नौशाद ,जयदेव, मदन मोहन,खय्याम, बप्पी लहरी यांच्यासारखे संगीतकार लाभले. (Indian cinema and music)

भूपिंदर सिंग बहुआयामी कलाकार होते. उत्कृष्ट वादक, गायक आणि संगीतकार ही होते. भूपिंदर यांच्या गिटार वादनाने हिंदी सिनेमातील अनेक सुपरहिट गीतांना वेगळीच रंगत दिली आहे. मग ते ‘दम मारो दम’ सारखं फडकते गीत असो असो किंवा ‘चिंगारी कोई भडके’ सारखं कल्ट क्लासिक गीत असो किंवा चुरा लिया है तुमने जो दिल को असो किंवा ‘तुम जो मिल गये हो ‘ सारखं अफलातून गाणं असो ! भूपिंदर आणि आर डी बर्मन यांचं फार मोठा असोसिएशन होतं. ‘परिचय’ (बीती न बीताये रैना) पासून हा प्रवास सुरू झाला होता. किनारा,सितारा, सत्ते पे सत्ता, मासूम या सिनेमातील गायकी सोबत भूपिंदर च्या गिटार ने कमाल केली होती. (Entertainment)

संगीतकार मदन मोहन हे त्या अर्थाने भूपेंद्रचे गॉड फादर त्यांनीच संगीताच्या दुनियेत भूपिंदर यांना आणलं होतं. पहिल्याच गाण्यात (हकीकत चित्रपटात) त्याचा मुकाबला महान गायकांसोबत होता.ते गाणं होतं ‘हो के मजबूर मुझे उसने…” आणि सोबतीला रफी, मन्नाडे आणि तालाताचे स्वर होते! भूपिंदर यांचा स्वर हा धीर गंभीर , पहाडी , कानात घुमणारा दमदार स्वर होता. गाणं संपल्यावर ही हा स्वर कानाशी गुंजारव करीत असंत ! खय्याम त्यांच्या स्वराला ‘गुणगुणी आवाज’ म्हणत होते. भूपिंदर आणि मिताली यांचे अनेक गजल अल्बम जगभर रसिक आवडीने ऐकतात. (Bollywood tadaka)
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
गुलजार यांच्यासोबत त्यांची खास मैत्री होती. कितीतरी गैर फिल्मी अल्बम गुलजार यांच्या शब्दांनी आणि भूपिंदर यांच्या स्वराने अप्रतिम बनले होते. गुलजार भूपिंदर यांच्या स्वराबाबत एकदा म्हणाले होते “अगर तुम्हारी आवाज का तावीज बन सकता तो मै जरूर बनवा लेता और पहनता!” भूपिंदर सिंगआणि गुलजार यांचे अक्सर,चांद परोसा है, सुरमयी रात, वो जो शायर था रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवीत आहेत. गुलजार शक्यतो आधी शब्द लिहायचे संगीतकार त्याला नंतर संगीत द्यायचे. पण भूपिंदर सिंगयांनी स्वरबद्ध केलेल्या एका अल्बम मध्ये उलटा प्रकार झाला होता त्यात भूपेंद्रच्या ट्यूनवर गुलजार यांनी शब्द लिहिले होते! (Bollywood news)