Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

Big boss 19 च्या घरातून बाहर येताच Tanya Mittal ने रंग बदलले; खास मैत्रीणीशी संबंध तोडले
Bigg Boss 19 मधले वाद आणि मैत्रीच्या गोष्टी सीजन संपल्यावर ही अजून कायम आहेत. तान्या मित्तलने (Tanya Mittal ) बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर केलेल्या एका निर्णयाने त्याची बरीच चर्चा होत आहे. घरात तिच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक म्हणजे नीलम गिरी (Neelam Giri). आणि याच नीलम ला तान्या मित्तल ने घराबाहेर येताच इंस्टाग्रामवर अनफॉलो करण्याचा निर्णय घेतल्याने तान्या मित्तल अजूनच लाइम लाइट मध्ये आली आहे.(Tanya Mittal)

तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांच्यातील मैत्री बिग बॉसच्या घरात खूपच चर्चेचा विषय झाली होती. परंतु शोमधून बाहेर येताच तान्याला नीलमच्या काही मुलाखतींचे क्लिप्स पाहायला मिळाले. त्यात नीलमने तिला थेट “फेक” आणि “खोटारडी” असे म्हटले होते. यावर तान्याला खूप वाईट वाटले आणि तिने सोशल मीडियावर नीलमला अनफॉलो केलं.

तान्या मित्तलने याबाबत सांगितले की, “मी नीलमवर विश्वास ठेवला होता आणि घरात असताना अनेक खासगी गोष्टी तिच्यासोबत शेअर केल्या होत्या. पण तिने माझा विश्वास तोडला. जर ती माझी खरी मैत्रीण असती, तर ती मला असं सार्वजनिकपणे नकारात्मकपणेअस ठरवून बोलली नसती.” हे सगळ सांगताना तान्याच्या चेहऱ्यावर संताप स्पष्टपणे दिसत होता, आणि तिच्या आवाजातील नाराजीने तिच्या भावना ही आणखी स्पष्ट केल्या आहेत.(Tanya Mittal)
================================
================================
शोमधून बाहेर आल्यानंतर तान्याला फक्त प्रचंड लोकप्रियता मिळालेली नाही, तर प्रसिद्ध निर्माती एकता कपूरने तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी साईन केलं आहे. तान्या मित्तल ‘बिग बॉस १९’ च्या घरात फरहाना भट्ट, नीलम गिरी आणि कुनिका सदानंद यांच्यासोबत एक गट तयार केला होता, परंतु घराबाहेर आल्यानंतर आता तिची मैत्री तुटली. यामुळे सिद्ध होतं की टीव्हीच्या दुनियेत ड्रामा कधीच थांबत नाही. तो फक्त पडद्यावरच नाही, तर पडद्यामागेही चालूच असतो. हा शोच्या संपल्यानंतर तान्या स्वतःला “एकटी लढणारी योद्धा” मानते, आणि तिच्या याच गोष्टींमुळे आणि घरातल्या तिच्या वागणूकीमुळे तिला घराबाहेर ही नवे प्रोजेक्ट आणि काम मिळत आहे.