
Ankita Walawalkar : डीपी दादा-कुणाल भगत लवकरच नवा प्रोजेक्ट करणार!
मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील स्पर्धक अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) अर्थात सगळ्यांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल हिने काहीदिवसांपूर्वीच संगीतकार कुणाल भगत (Kunal Bhagat) याच्यासोबत लग्नगाठ बांधली. कोकणात आल्या गावी मित्र परिवार आणि कुटुंबाच्या साक्षीने कुणाल आणि अंकिताच्या संसाराला सुरुवात झाली. यावेळी अंकिताचा मानलेला भाऊ धनंजय पोवार (Dhananjay Powar) म्हणजेच डीपी दादा देखील हजर होते. आणि आत्ता लवकरच कुणाल भगत आणि डीपी दादा एकत्र नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेत.
अंकिता वालावलकरचा नवरा कुणाल भगत (Kunal Bhagat) हा संगीत दिग्दर्शक आहे. त्याने मालिका, चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरचा नवरा असल्यामुळे कुणालही सोशल मिडीयावर सक्रिय असतो. अशाच एका सेगमेंटमध्ये चाहत्यांशी संवाद साधताना त्याला धनंजय पोवार यांनी प्रश्न विचारला. ((Marathi big boss season 5)

बिग बॉस’ फेम धनंजय पोवार (Dhananjay Powar) अर्थात डीपी दादा यांनी कुणालला “चल लवकर प्रोजेक्ट सुरू करूया” असं विचारलं. त्यावर कुणालनेदेखील त्यांना “लवकरच” असं उत्तर दिलं. कुणालच्या या उत्तरावरून धनंजय-कुणाल ही जोडी लवकरच कोणता तरी प्रोजेक्ट घेऊन येणार आहेत अशी कल्पना येतेय.
===========
हे देखील वाचा : ankita walawalkar marriage : अंकिता वालावलकरचं सासरी दणक्यात स्वागत
===========
आता हा प्रोजेक्ट नेमका काय असणार आहे? आणि त्यांचा हा नवा प्रोजेक्ट नेमका कधी येणार? याबद्दल दोघांनी काहीही खुलासा केला नाही. मात्र, कुणालच्या (Kunal Bhagat) “लवकरच” या उत्तरामुळे चाहत्यांना कुणाल आणि डीपी दादा एकत्र दिसणार हे नक्कीच.

दरम्यान, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी अंकिता आणि कुणाल यांनी मालवणमध्ये लग्नगाठ बांधली त्यांच्या लग्नाला बरेच सोशल मीडिया इन्फ्लयुएन्सर, बिग बॉसचे स्पर्धकही आवर्जून आले होते. आपल्या गावी कोकणात लग्न केल्यामुळे अंकिताचं कौतुकही केलं गेलं होतं.