Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Lakshmichya Pavlani मालिकेचा प्रवास संपला; Isha Keskar च्या जाण्याचा TRP ला फटका!

Bigg Boss Marathi Season 6 : आला रे आला…!! बिग

Border 2 चित्रपटाचा टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज!

Kishore Kumar याच्या आयुष्यात ‘चार’ या क्रमांकाचे काय महत्व होते?

Pinga g pori pinga: पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत नवा

‘आई तेव्हाच होईल जेव्हा मी…’ अभिनेत्री Hruta Durgule हिने आई होण्याबाबत

‘राजा शिवाजी’ चित्रपटातील Sanjay Duttच्या भूमिकेची पहिली झलक आली समोर;

Sushmita Sen वयाच्या 50 व्या वर्षी अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीने स्वतः

Bigg Boss 19 मधून जिंकलेल्या पैशाच काय करणार? Gaurav Khanna

Human Cocaine चित्रपटाचा धडकी भरवणारा ट्रेलर प्रदर्शित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

घनःश्याम दरोडेला अश्रू अनावर

 घनःश्याम दरोडेला अश्रू अनावर
टीव्ही वाले

घनःश्याम दरोडेला अश्रू अनावर

by Jyotsna Kulkarni 08/08/2024

बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व अगदी पहिल्या दिवसापासूनच तुफान गाजत आहे. जोरदार भांडणं, वाद यांमुळे सतत हा शो लाइमलाईट्मधे येत आहे. नुकतेच घरामध्ये सीझनचे पहिले कॅप्टन्सी टास्क पार पडले. कॅप्टनीसीची बुलेच ट्रेन या टास्कमध्ये अंकिता जिंकली आणि ती या सिझनची घराची पहिली कॅप्टन बनली. योगिताने टास्कमध्ये अंकिताला कॅप्टन्सी मिळवून दिली. अंकिता कॅप्टन झाल्यामुळे कमालीची खुश होती.

मात्र दुसरीकडे अरबाज, निक्की, जान्हवी यांच्या ग्रुपने अनफेअर गेम झाला म्हणून राग व्यक्त ओरडत होते. तर महाराष्ट्राचा छोटा पुढारी म्हणून ओळखला जाणारा घन:श्याम हा कॅप्टन होता आले नाही म्हणून खूपच भावुक झाला. अशातच घन:श्यामला रडू कोसळे. त्याचा रडत असण्याचा एक व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होताना दिसत आहे.

पहिल्याच कॅप्टन्सी टास्कच्या पहिल्याच राऊंडमध्ये वर्षाताईंनी अनफेअर रिझल्ट दिला आणि अंकिताला कॅप्टन बनवण्याची त्यांची इच्छा पूर्ण होण्यास मदत झाली. असा आरोप घन:श्यामने केला आणि तो चिडला. त्याला अंकिता कॅप्टन झाल्याने राजही येत होता आणि रडायलाही येत होतं. म्ह्णूनच घन:श्याम अरबाजकडे गेला आणि धाय मोकलून रडला. तरीही त्याला शांत वाटत नव्हते म्हणून तो धनंजय पोवार अर्थात डीपी यांच्याकडे गेला आणि त्याने त्यांच्यासमोर आपले मन मोकळे केले.

डीपी यांच्याशी बोलताना घनःश्याम यांना अश्रू देखील अनावर झाले. या सगळ्यानंतर घन:श्याम डीपी दादाकडे त्याचं मनं मोकळं करतो. सध्या सोशल मीडियावर बिग बॉसचा एक नवा प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये ‘छोटा पुढारी’ घन:श्याम दरवडे धनंजय पोवारकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसत आहे.

घनःश्याम धनंजय यांच्याकडे येऊन त्यांना सांगतो की,”माझ्या घरच्यांना नेहमी बाहेरचे, ओळखीचे लोकं म्हणायचे की तुमचा मुलगा काही करू शकत नाही आहे. त्याला उंची नाही. मात्र आता हेच लोकं म्हणतात यांचा मुलगा ‘बिग बॉस’मध्ये कसा गेला?” हे ऐकून धनंजय घन:श्यामची समजूत घालताना दिसतात. धनंजय म्हणतात, “शरीराची उंची मापता आली नाही, त्याला मनाची उंची काय माफता येणार?” हे सर्व तो रडतच बोलताना दिसतो.

सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओ खूपच गाजत आहे. यासोबतच नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट्स करताना डीपी यांचे खूपच कौतुक केले आहे. तर अनेकांनी घनश्याम यांना नाटकी देखील म्हटले आहे. डीपी दादांनी बोललेल्या त्या वाक्याचे सर्वच नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. दरम्यान सध्या घन:श्याम सध्या अरबाज, निक्की, वैभव, जान्हवी यांच्या ग्रुपमध्ये आहे.

तत्पूर्वी बिग बॉसच्या घरात अंकिता पहिली कॅप्टन झाली असून, तिने सध्या घराचा ताबा घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तिच्या कॅप्टनशिपमध्ये घरात काय काय घडते हे बघणे महत्वाचे असेल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bigg Boss Marathi Bigg Boss Marathi Season 5 Ghanshyam Darode chota pudhari dhananjay powar घनश्याम दरोडे धनंजय पोवार बिग बॉस मराठी
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.