
Big Boss Marathi Season 6 च्या घरातील चावी चोराचा रितेश भाऊंनी केला पर्दाफाश; थेट Video दाखवत…
लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीचं सहावं पर्व (Big Boss Marathi Season 6) सुरू होऊन बघता बघता एक आठवडा झाला. पहिल्या दिवसापासूनच यंदाच्या स्पर्धकांनी घरात राडा घालायला सुरुवात केली. पहिल्या आठवड्यात काली सदस्यांना पॉवर की मिळाली होती, पण त्या चावीचं महत्व समजून न घेता रुचिताने तिची ‘पॉवर की’ स्विमिंग पूलजवळ ठेवली होती. करण आणि तिच्यात मस्करीत लागलेल्या पैजेत तिने ती की गमावली. करणने (Karan Sonawane) रुचिताची ‘पॉवर की’ घेतली. तिनं प्रचंड आकांडतांडव करुनही करणने तिची ‘पॉवर की’ दिली नाही.
पुढच्या टास्टमध्ये पॉवर की चा वापर करण्यासाठी रुचितासोबत (Ruchita Jamdar) सोनालीची जोडी होती, पण रुचिताकडे पॉवर की नसल्यामुळे ती यातून बाद झाली. दुसऱ्या दिवशी कोणीतरी मुद्दाम सोनालीची पॉवर की लपवली. कॅप्टन्सी टास्क संपल्यामुळे आता त्याचा काही उपयोग नसल्यामुळे सोनालीनं इतका बाऊ केला नाही. पण चावी चोरणारा चोर कोण यासाठी काही सदस्यांनी घरात तांडव केला. आणि आता भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनीर खरा चोर समोर आणला आहे..

तर, झालं असं की, कॅप्टन्सी टास्कच्या दुसऱ्यादिवशी सकाळी सोनालीला तिची पॉवर की सापडत नव्हती. तिला समजलं की कोणतरी ती चोरली आहे. पण टास्कनंतर त्या चावीचा उपयोग नसल्यामुळे तिने फारसं त्याकडे लक्ष दिलं नाही. थोड्यावेळाने पॉवर की बाथरूमच्या दरवाजाजवळ सचिनला दिसली. सचिनने याबद्दल सागरला सांगितलं. त्यावेळी तिथे सचिन, सागर आणि आयुष असल्यामुळे त्यांच्यापैकीच कुणीतरी चोरली आणि मग कुणाच्याही नकळत ती तिथे टाकली असा आरोप त्यांवर करण्यात आला. बिग बॉसच्या घरात चोरी होऊन, चोर खुलेआम फिरत असल्यामुळे सागर, सचिन आणि आयुष यांनी उपोषण केलं. (Marathi Big Boss)

इतकंच नाही तर, सागर, आयुष आणि सचिन यांनी प्रत्येक स्पर्धकाला बोलावून ‘पॉवर की’बद्दल विचारलं, पण कुणीही कबुली दिली नाही. यावेळी अनुश्री, तन्वीचं नाव सांगते. त्यानंतर मुद्दाम सागर, सचिन आणि आयुष आम्हाला चावी कोणी चोरली ते समजलंय, असं म्हणतात आणि उपोषण बंद करतात. आता रविवारच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने बिग बॉसच्या घरातल्या चावी चोराचा पर्दा फार केला आहे. (Sagar Karande)
================================
================================
रितेश यांनी थेट, एक फुटेज दाखवलं. त्यामध्ये अनुश्री एकटीच माईकवर बोलत असते. अनुश्रीनेच सोनालीची चावी चोरलेली असते. ‘उपोषणाचा फालतूचा मुद्दा आहे’ असं अनुश्री म्हणते. ‘मला त्यांच्याबद्दल काहीतरी वाटतं, म्हणून मीसुद्धा काही खाललं नाहीये. पण, मी शेवटपर्यंत कोणालाच कळू देणार नाहीये, त्या चावीचं काय झालं’ असं अनुश्री (Anushri Mane) म्हणतेय. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरातील चोर कोण, हे आता उघडकीस आलं आहे.. आता यावरुन घरात दुसऱ्या आठवड्यात काय राडा होणार? आणि पुढचा आठवडा अजून किती रंगत आणणार हे पाहण्यासाठी सगळेच उस्तुक आहेत. (Riteish Deshmukh)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi