हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Bigg Boss 19 ची स्पर्धक Tanya Mittal घरात घेऊन गेली तब्बल ८००हून जास्त साडया?
भारतीय कपडे आणि पारंपरिक हस्तकलांना प्रोत्साहन देणारी, तसेच स्वतःच्या स्टाइलमधून त्यांचं सौंदर्य जगापुढे आणणारी उद्योजिका, सामाजिक कार्यकर्ती आणि फॅशन प्रेमी तान्या मित्तल सध्या ‘बिग बॉस १९’ (Bigg Boss 19) मुळे चर्चेत आहे. भारतीय साड्यांविषयी तिचं विशेष प्रेम आहे आणि ती नेहमीच सांगते की, “साडी ही केवळ एक पोशाख नसून ती एक ओळख आहे.” शोमध्ये प्रवेश करताना तिनं तिच्या खास स्टाइल स्टेटमेंटविषयी बोलताना सांगितलं होतं की ती लक्झरी आयटम मागे ठेवणार नाही, तर आपल्या दागिन्यांसह तब्बल ८०० हून अधिक साड्या घेऊन घरात जाणार आहे. इतकंच नाही, तर तान्या दररोज ३ वेगवेगळ्या साड्या नेसणार असून, दिवसभरात वेळोवेळी त्या बदलत राहणार असल्याचं ही तिनं सांगितलं होतं. त्यामुळे आता घरात बिग बॉस च्या घरात जाताना तिने खरच ८०० पेक्षा जास्त साडया नेल्या आहेत अशी चर्चा आहे.(Bigg Boss 19)

‘बिग बॉस १९’ या सीझनमध्ये ‘घरवालों की सरकार’ ही खास थीम घेऊन शो सुरू झाला आहे. यात गौरव खन्ना, अमल मलिक, अवेज दरबार, अशनूर कौर, मृदुल तिवारी, नगमा मिराजकर, कुनिका सदानंद, बसीर अली, अभिषेक बजाज, तान्या मित्तल, झीशान कादरी, नेहल चुडास्मा, नतालिया जानोझेक, प्रणीत मोरे, फरहाना भट्ट आणि नीलम गिरी असे अनेक दिग्गज सहभागी झाले आहेत.

मात्र, या आठवड्यात तान्याला तिच्या सहकारी सदस्यांनी घराबाहेर जाण्यासाठी नामांकन दिलं आहे. विशेष म्हणजे, गौरव खन्ना, नीलम गिरी, नतालिया, अभिषेक बजाज, झीशान कादरी आणि प्रणीत मोरे यांसारख्या सदस्यांनी तिचं नाव पुढे केलं. या नामांकनामुळे तान्या भावनिक झाली असून, तिनं डोळ्यात पाणी आणत सांगितलं की, ज्या प्रणीत मोरे आणि मृदुल तिवारीला ती खऱ्या मैत्रिणी मानत होती, त्यांच्याकडून नामांकन मिळालं हे तिला सर्वाधिक दुःखदायक वाटलं. सोशल मीडियावर देखील तान्या प्रचंड चर्चेत आहे. तिच्या काही विधानांमुळे नेटिझन्सनी तिची खिल्ली उडवली आहे. विशेषत: “मला ‘मॅडम’ म्हणून हाक मारावी” आणि “माझं कुटुंब मला ‘बॉस’ म्हणतं” या तिच्या विधानांवर मोठ्या प्रमाणात मीम्स तयार होत आहेत.(Bigg Boss 19)
===========================
===========================
दरम्यान, घरातून बाहेर काढलेली अभिनेत्री फरहाना भट्ट सध्या गुप्त खोलीत असून, बिग बॉसनं तिला स्पर्धकांबाबत प्रतिक्रिया देण्याची संधी दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत घरात नवा ड्रामा रंगणार, हे निश्चित आहे. ‘बिग बॉस १९’ सध्या प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलाच उधाण आणतोय. तान्या मित्तलचं नामांकन तिला शोमध्ये टिकवून ठेवतं की घराबाहेर करतं, हे येणाऱ्या भागांमध्ये स्पष्ट होईल.