
Bigg Boss 19: Pranit More नाही तर ‘या’ स्पर्धकाला मिळाले तिकीट टू फिनाले
Bigg Boss 19 च्या मालिकेने आता शेवटच्या टप्प्यात पदार्पण केलं आहे. दोन्ही आठवड्यांमध्ये रोमांचक टास्क आणि दृष्यांमुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण गौरव खन्ना (Gaurav Khanna) हा बिग बॉस १९ चा पहिला फायनलिस्ट ठरला आहे. तिकीट टू फिनाले (Ticket To Finale) टास्क जिंकून त्याने नवा इतिहास रचला आहे आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिकीट टू फिनाले टास्क हा शोचा एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. या टास्कमध्ये सहभागी होण्यासाठी चार स्पर्धकांनी आपली दावेदारी पक्की केली होती. त्यात अशनूर कौर (Ashnoor Kaur), प्रणित मोरे (Pranit More) , गौरव खन्ना, आणि फरहाना भट्ट (Farhana Bhatt) या चार स्पर्धकांचा समावेश होता. या टास्कमध्ये स्पर्धकांना दोन-दोनच्या टीममध्ये विभागण्यात आलं होतं.(Bigg Boss 19)

अशनूरने तान्याला, प्रणितने शहबाजला, गौरवने मालतीला आणि फरहानाने अमालला पराभूत करून टास्कमध्ये आपलं स्थान पक्कं केलं. त्यानंतर, प्रत्येक स्पर्धकाला एक विशेष ‘वेल ऑफ डेस्टिनी’ नामक जादुई विहिरीचा सामना करावा लागला. या टास्कमध्ये स्पर्धकांना दोन वाट्यांसह एक काठी खांद्यावर ठेवायची होती. एका वाटीत लाल पाणी आणि दुसऱ्या वाटीत हिरवं पाणी होतं. स्पर्धकांना संतुलन राखून दोन्ही पाणी वाचवायचं होतं. जर लाल पाणी सांडून ते हिरव्या रेषेपर्यंत पोहोचलं, तर त्या स्पर्धकाला एलिमिनेट करण्यात आलं.

या तिकीट टू फिनाले टास्कमध्ये तीन राऊंड्स पार केल्यानंतर, एक स्पर्धक प्रत्येक राऊंडमध्ये बाहेर पडला. शेवटी, गौरव खन्ना हा स्पर्धक होता जो अखेरपर्यंत आपल्या लाल पाण्याचं संतुलन राखून अंतिम फेरीत पोहोचला. यामुळे तो बिग बॉस १९ चा पहिला फायनलिस्ट ठरला. गौरव खन्नाच्या या विजयाने शोच्या उत्सुकतेला आणखी एक वळण दिलं आहे. दोन आठवड्यांनी शोचा विजेता घोषित होईल आणि या वेळी नक्कीच अनेक वळणं घडतील.(Bigg Boss 19)
===========================
हे देखील वाचा: घराला लागलेल्या भीषण आगीतून ‘या’ व्यक्तीमुळे वाचला Shiv Thakare चा जीव !
===========================
दर्शक आणि स्पर्धक दोन्हीही आगामी टास्क आणि वळणांना मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.गौरव खन्ना च्या फिनालेत पोहोचण्यामुळे शोच्या भविष्यात काय घडणार आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. आता सर्वांचे लक्ष आहे पुढील टास्क आणि कोण त्याच्या विरोधात फिनालेत पोहोचेल, याकडे.