Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Bigg Boss 19: प्रणित मोरेवर सलमान खानचा संताप, पहिल्याच विकेंड वारमध्ये दबंग भाईने सुनावलं !
मनोरंजनविश्वातील सर्वात मोठा आणि वादग्रस्त शो बिग बॉस यंदा आपल्या १९ व्या सीझनसह धमाक्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या शोला सलमान खानच होस्ट करतोय. शोची सुरुवात होऊन अवघे काही दिवसच झालेत, पण एवढ्या कमी वेळातच घरातले वाद, भांडणं, टोकाटोकी आणि वादग्रस्त प्रसंगांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बिग बॉस म्हटलं की सर्वाधिक उत्सुकता असते ती म्हणजे विकेंडच्या वारची. या भागात सलमान खान थेट घरातल्या सदस्यांशी संवाद साधतो आणि त्यांच्या वागणुकीवर भाष्य करतो. या विकेंडच्या भागात मात्र सलमानचा राग स्पष्टपणे ओसंडून वाहताना दिसला. त्याने थेट घरातील स्पर्धक प्रणित मोरेचा क्लास घेतला. मराठी प्रेक्षकांसाठी ओळखता चेहरा असलेला प्रणित मोरे या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे. त्याचा गेमप्ले, त्याची बोलण्याची ढब प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच आवडत आहे. पण यावेळी त्याच्या सलमान खानवर केलेल्या जोक्समुळे त्याला मोठा फटका बसला.(Bigg Boss 19)

सलमानने प्रणितला थेट सुनावत म्हटलय की, “मला ठाऊक आहे तू माझ्यावर काय काय जोक्स केले आहेत. लोकांना हसवणं चांगली गोष्ट आहे, पण त्यासाठी माझं नाव घेणं योग्य नाही. जर तू माझ्या जागी असतास आणि मी तुझ्या जागी घरात असतो, तर काय केलं असतंस याचा विचार कर. ” सलमान खान प्रणितचा क्लास घेतानाचा हा संपूर्ण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं आहे, “भाई… तू तर आता संपलास.’ तर दुसऱ्याने कमेंट केली आहे की, “याचसाठीच तर तुला बिग बॉसच्या घरात आणलं आहे.” तर काहींनी मात्र प्रणितच्या समर्थनार्थ लिहिलं की, “जोक हा फक्त जोक असतो, सलमानने एवढं मनाला लावून घेऊ नये.”

प्रणित मोरे फक्त सलमान खानलाच नाही तर इतर घरातील स्पर्धकांनाही आपल्या जोक्सने टार्गेट करत असतो. कधी कधी हे जोक्स मजेदार वाटतात, पण कधी ते वादाला निमंत्रण देतात. त्याच्या या धाडसी अंदाजामुळे काही जण त्याचं कौतुक करतायत, तर काही जण त्याच्यावर नाराजी व्यक्त करतायत. सलमान खानने यावेळी प्रणितवर आपली नाराजी जाहीर केली असली तरी, प्रेक्षकांच्या नजरेत प्रणितचा गेम स्ट्राँग दिसतोय. मराठी प्रेक्षक त्याच्या पाठीशी असल्याचंही दिसतंय.(Bigg Boss 19)
===================================
हे देखील वाचा: Bigg Boss 19 ची स्पर्धक Tanya Mittal घरात घेऊन गेली तब्बल ८००हून जास्त साडया?
===================================
ही शोची तर फक्त सुरुवात आहे आणि एवढ्यातच एवढा मोठा वाद उभा राहिला आहे. त्यामुळे येणाऱ्या भागांमध्ये अजून कोणते राडे, कोणते वाद, कोणत्या जोड्या बनणार आणि कोण कोणाच्या विरोधात जाणार, याकडे प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत. बिग बॉस 19 मध्ये सुरुवातीपासूनच रंगलेल्या या नाट्यमय वातावरणामुळे पुढचे काही आठवडे प्रेक्षकांसाठी आणखी थरारक ठरणार यात शंका नाही.