मराठी नाटक पाहून भारावली Tabu, कलाकारांचं केलं तोंडभरून कौतुक!

Bigg Boss 19: सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ चे घर सज्ज; पाहा शानदार घराची पहिली झलक !
सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 19’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘बिग बॉस’ची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे आणि या घराचं वेगळेपण नेहमीच चर्चेत असतं. यंदा आर्ट डायरेक्टर ओमंग कुमार आणि प्रॉडक्शन डिझायनर वनीता गरुड यांनी निसर्गाच्या साधेपणातून प्रेरणा घेत जंगल थीमवर संपूर्ण घर सजवलं आहे. (Bigg Boss 19 House)

गार्डन एरिया
या वेळचा गार्डन एरिया म्हणजे एखादं खुलं मैदानच आहे. शारीरिक टास्कसाठी आदर्श अशी ही जागा मातीचा सुगंध, झाडांच्या सालीपासून घेतलेले डिझाईन एलिमेंट्स आणि विगवाम-स्टाईल बसण्याच्या जागेमुळे एकदम कॅम्पिंगचा फील देते. यंदा जिम कॉर्नर छोटा ठेवण्यात आला आहे, ज्यातून हा संदेश दिला जातो की या खेळात टिकण्यासाठी रणनीतीइतकाच स्टॅमिनाही महत्वाचा आहे.

लिव्हिंग एरिया
सर्वाधिक ड्रामा घडणारी ही जागा यंदा आणखी आकर्षक दिसते. गडद रंग, प्राणी प्रेरित डिझाईन्स, मोठमोठे स्कल्प्चर, सींग असलेले पक्षी आणि कन्फेशन रूमच्या दरवाज्यावर लावलेला बैलाचा डोळस पुतळा जो आपल्याकडे बघतोय असच वाटत राहील. ट्रॉपिकल झूमर आणि डेकोर सतत घरच्यांना आठवण करून देतात की या घरात काहीच सामान्य नाही.

किचन एरिया
‘बिग बॉस’मध्ये भांडणांची सुरुवात जिथून होते तो किचन एरिया यंदा चमचमता रंग आणि बोल्ड डिझाईन्समुळे एकदम भारी वाटत आहे. तो मागच्या सीझनपेक्षा लहान असला तरी, घरच्यांना जवळ राहण्यास भाग पाडणारं डिझाईन केल्याने वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

बेडरूम
घरातील शांत कोपरा म्हणजे बेडरूम. हलक्या रंगांमध्ये विंटेज टच देऊन सजवलेली ही खोली आरामदायी भासते. मात्र, यंदा एक वेगळेपणा आहे. सिंगल बेड्स पूर्णपणे हटवून फक्त डबल बेड्स आणि एक मोठा ट्रिपल बेड ठेवण्यात आला आहे. यातून नवीन समीकरणं, मैत्री-शत्रुत्व आणि चकमकी निर्माण होणार यात शंका नाही.

असेंब्ली रूम
यंदा प्रथमच घरात एक वेगळी रूम जोडली गेली आहे ती आहे असेंब्ली रूम. सीझनच्या ‘घरवाल्यांची सरकार’ या थीमनुसार सजवलेली ही खोली सत्ता आणि नियंत्रणाचं प्रतीक आहे. स्पर्धक येथे चर्चा, वाद आणि निर्णय घेण्यासाठी जमा होतील. मात्र ही खोली केवळ काही ठराविक वेळेसच खुली राहणार आहे, ज्यामुळे त्यात एक वेगळंच उत्सुकतेचं वातावरण निर्माण होईल.(Bigg Boss 19 House)
==================================
हे देखील वाचा: Bigg Boss मध्ये होणार अंडरटेकर आणि माईक टायसनची दमदार एन्ट्री !
===================================

बाथरूम एरिया
डिझाईन मागील सीझनप्रमाणेच आहे, पण नवीन वॉलपेपर्स आणि रंगांच्या संयोजनाने ताजेपणा आणण्यात आला आहे. ही जागा खासगी असली तरी रणनीती आखण्यासाठी आणि गुपचूप संभाषणांसाठी महत्वाची ठरणार आहे. एकूणच, ‘बिग बॉस 19’चं जंगल थीमवर आधारित घर प्रेक्षकांसाठी आणखी रोचक ठरणार हे नक्की!