Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19 फिनाले आधीच विनरचे नाव लीक; ‘हा’ सदस्य जिंकणार शो !
Big Boss 19 सध्या हिंदी टेलिव्हिजनवरील एक अत्यंत चर्चेत असलेला शो आहे. टीव्हीपासून ओटीटी पर्यंत या शोने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. बिग बॉस 19 चा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे आणि शोचा अंतिम निर्णय कोण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. फिनाले काहीच दिवसांत होणार असताना बिग बॉस 19 च्या विनरचं नाव समोर आलं आहे. यामध्ये टॉप 5 फायनलिस्टांची नावं देखील समोर आली आहेत.व्हायरल होत असलेल्या लिस्टमध्ये अभिनेता गौरव खन्ना बिग बॉस 19 चा विनर असल्याचं दिसतंय.(Bigg Boss 19 Winner Name)

आता सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे, ज्यात बिग बॉस 19 च्या विनरची आणि इव्हिक्शन झालेल्या सदस्यांची माहिती दिली आहे. यामध्ये प्रणीत मोरेच्या घराबाहेर जाण्याची माहिती देखील देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये फिनालेच्या आधीच्या गाजलेल्या स्पर्धकांची माहिती समोर आली आहे, आणि शोच्या अंतिम टप्प्यात होणारे डिनॅमिक्स खूपच रोमांचक आहेत.त्याचबरोबर टॉप 5 फायनलिस्ट मध्ये पुढील नावं आहेत. गौरव खन्ना ( विनर ), अभिषेक बजाज ( रनर अप ), फरहाना भट्ट ( सेकंड रनर अप ), अमाल मलिक ( थर्ड रनर अप ), तान्या मित्तल ( फोर्थ रनर अप ).

बिग बॉस 19 चा ग्रँड प्रीमियर २४ ऑगस्टला झाला होता, आणि त्यानंतर १०५ दिवसांनी शोच्या फिनालेचे आयोजन होणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले ७ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे, पण याबाबत वाहिनीकडून अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.याशिवाय, बिग बॉसच्या अंतिम टप्प्यात ड्रामा क्वीन राखी सावंतची एंट्री होणार असल्याच्या चर्चा जोरदार आहेत. राखी सावंत नुकतीच दुबईहून भारतात परतली आहे, आणि तिने स्वत: सांगितले आहे की ती बिग बॉस 19 मध्ये जाणार आहे. (Bigg Boss 19 Winner Name)
===============================
हे देखील वाचा: ‘सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या’,हे काय बरळली Rakhi Sawant ?
===============================
राखी सावंत आणि तान्या मित्तल यांच्यात तणाव वाढल्यामुळे घरात त्यांचा सामना होईल, असं सांगितलं जात आहे. दोघांमध्ये ताणतणाव निर्माण होईल का, हे पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. बिग बॉस 19 मध्ये राखी सावंत कधी एन्ट्री घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. तिच्या धमाकेदार एंट्रीची आणि नंतरच्या ड्रामा फुल्लींगच्या प्रतीक्षेत सर्व फॅन्स आहेत.