Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

 All Is Well Marathi Movie: तीन मित्रांची धमाल गोष्ट ‘ऑल

Gaadi Number 1760: प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे प्रथमेश-प्रियदर्शिनीचे ‘झननन झाला’ गाणं

Dostana : ‘मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया…’हे गाणे

Aamir Khan याच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचं कलेक्शन झालंय तरी

‘रंगभूमीवर फुललेली प्रेमकहाणी, कशी झालेली Reema Lagoo आणि Vivek Lagoo

Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष

Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

Sachin Pilgoankar- रंजिताचा ‘आंखियों के झरोखो से’आठवतो का?

Housefull 5 : मल्टिस्टार कास्ट असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

माझा सुरजलाच पाठिंबा – वैभव चव्हाण

 माझा सुरजलाच पाठिंबा – वैभव चव्हाण
कलाकृती तडका

माझा सुरजलाच पाठिंबा – वैभव चव्हाण

by Jyotsna Kulkarni 18/09/2024

सध्या सर्वत्र फक्त बिग बॉसचीच हवा आहे. बिग बॉसमध्ये सतत होणाऱ्या विविध घटनांमुळे हा शो प्रकाशझोतात राहतो. बिग बॉसचा हा पाचवा सिझन सुरु आहे. मात्र या सिझनने मागील चारही सीझनपेक्षा जास्त लोकप्रियता मिळवली आहे. टीआरपीच्या अनेक रेकॉर्ड मोडत या पर्वाने नवीन रेकॉर्ड सेट केले केले आहे. बिग बॉसचा हा सिझन हिट होण्याची अनेक कारणं आहेत.

मागील आठवड्यात तर बिग बॉसच्या घरात अनेक अनपेक्षित आणि आश्चर्यचकित गोष्टी घडलेल्या पाहायला मिळाल्या. आर्याने भांडणात निक्कीच्या गालात चापट लावली आणि तिला शिक्षा म्हणून घरातून निष्कासित करण्यात आले. आर्या घराबाहेर पडल्याने या आठवड्यात कोणी नॉमिनेट होणार नाही असे वाटत असतानाच वैभव चव्हाण हा घराबाहेर पडला. त्याला मिळालेल्या कमी मतांमुळे या घराचा निरोप घ्यावा लागला.

घरातून बाहेर आल्यानंतर वैभवने सुरज चव्हाणबद्दल एका मुलाखतीमध्ये त्याचे मत व्यक्त केले आहे. वैभव चव्हाणने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सुरजबद्दल वक्तव्य केले आहे. वैभवला मुलाखतीमध्ये विचारले गेले की, तो बिग बॉसच्या घरात असलेल्या कोणत्या एका व्यक्तीला पाठिंबा देणार? यावर त्याने सांगितले, “खरं सांगू का तर त्या व्यक्तीचा आणि माझा बॉण्ड लोकांना माहीतच नाहीये. सुरज ही या घरातील अशी व्यक्ती आहे की, ज्याला मी आधीपासूनच ओळखतो. त्याचे गाव माझ्या गावाशेजारीच आहे. त्याच्या चित्रपटांच्या प्रमोशनला मी पाहुणा म्हणून देखील गेलो आहे, त्याला भेटलेलो आहे. आमचे एक चव्हाण-चव्हाण हा जो बॉण्ड आहे, ते आधीपासूनच आहे.”

Vaibhav Chavan

मुलाखतीमध्ये पुढे वैभव म्हणाला, “घरात आमच्यात जी भांडणं झाली, ती तेवढ्यापुरती होती. त्याला राग आला आणि मलाही राग आला. मात्र ते त्या वेळेपुरतेच होते. आम्ही जिम एकत्र करायचो. कपडे शेअर करायचो. माझ्या हुडीज वगैरे मी त्याला दिल्या आहेत. मी त्याची दोन वेळा दाढीपण करून दिली आहे. बाहेरही त्याचे आणि माझं नातं चांगलं होतं.”

सुरजच्या स्वभावाबद्दल वैभवने सांगितले की, “मला मनापासून वाटते की, सुरज खूपच साधा, सरळ माणूस आहे. त्याला जे योग्य वाटते तेच तो करतो. कोणाचेही ऐकून तो अजिबात वागत नाही. बी ग्रुपमध्ये ज्यावेळी माझ्याबद्दल काही गोष्टी बोलल्या जात होत्या, त्यावेळी तो ऐकतो कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे. कितीही नाही म्हटले तरी ते मनात राहते आणि मला माहीत नाही की, माझ्याबद्दल त्या ग्रुपमध्ये काय बोललं गेलंय. त्याचा थोडाफार प्रभाव असू शकतो.”

==============================

हे देखील वाचा: बाप्पाचा आशीर्वाद घेत ‘पाणी’सिनेमाचा टिझर लाँच; आदिनाथ कोठारेचा लूक ही आला समोर…

==============================

सुरजला पाठिंबा देण्याबद्दल वैभव म्हणाला, “मी सुरजला पाठिंबा देईन. कारण तो माझ्या गावचा आहे. मला माहितेय तो पहिल्यापासून कसा आहे. तो कोणत्याच खोट्या गोष्टी करत नाही. तो पहिल्यांदाच या शोमध्ये आला आहे आणि मी पण पहिल्यांदाच या अशा शोमध्ये आलो होतो. मला ज्या गोष्टी कळल्या नाहीत, त्या त्याला कळल्या तो खूप स्मार्ट आहे. त्याच्याबरोबर जी भांडणं झाली, ती वैयक्तिक नव्हती. येताना मी त्याला मिठी मारली आणि सांगितलं की, ट्रॉफी बारामतीत पाहिजे.”

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Big Boss Marathi Big Boss Marathi 5 vaibhav chavan बिग बॉस मराठी ५ वैभव चव्हाण सुरज चव्हाण
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.