“मागील जन्मातील जो तुमचा शत्रू असतो, तोच..”; Prajakta Mali लव्ह

‘कानात बोटं घालून गप बस!’ अनुश्रीचा राखी सावंतला सल्ला; आता घरात उडणार का वादाचा भडका?
Bigg Boss Marathi 6 च्या घरात पुन्हा एकदा मनोरंजनाचा स्फोट झाला आहे. ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant) वाईल्ड कार्ड एन्ट्रीमधून घरात दाखल झाली असून, तिच्या आगमनाने घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं आहे. राखी येताच समीकरणं ढवळून निघाली असून, तिच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावामुळे चर्चा, टोमणे आणि वादांना सुरुवात झाली आहे. घरात पाऊल टाकताच राखीनं थेट तन्वीला चॅलेंज दिलं, पण खरी ठिणगी उडाली ती अनुश्रीसोबत. सकाळच्या गाण्यांवरून दोघींमध्ये जोरदार वाद पाहायला मिळाला. अनुश्री झोपेत असताना राखीनं तिचं पांघरूण ओढल्यामुळे अनुश्री चिडली आणि तिनं राखीला थेट जाब विचारला. “मी झोपलेली असताना माझं पांघरूण का काढलंस?मला बिलकुल नाही आवडत. प्लीज.” असा सवाल तिनं केला.(Bigg Boss Marathi 6)

यावर राखीनं तिच्या खास शैलीत उत्तर देत गाण्यांवर नाराजी व्यक्त केली. “म्हणून ते चार चार वेळा गाणं लावतात आणि माझ्या डोक्याची नस फाटते.” असं म्हणत तिनं अनुश्रीच्या पांघरूणावरून टोमणा मारला. हा संवाद ऐकून अनुश्री आणखी भडकली आणि दोघींमध्ये वाद अधिकच चिघळला. यावर अनुश्री तिला म्हणाली , “ते ऑलवेज चार चार वेळाच गाणं लावतात,”

राखी त्यावर म्हणाली, “त्यांचा कोंबडा चार चार वेळा वाजतो म्हणून मी तुझ्याकडे आले आणि तुझा कोंबडा (पांघरूण) खाली घेतला”.राखीच्या या बोलण्यावर अनुश्री चिडली. ती म्हणाली, “मी तर झिंज्या पकडते, झिंज्या”. यावर राखीनं अनुश्रीला ठणकावून सांगितलं, “हे असं नाही चालणार. बिग बॉस माझं डोकं फिरवणार सकाळी सकाळी. गाण्यांवर गाणी लावणार”.वाद इथेच थांबला नाही. अनुश्रीनं राखीला सुनावत म्हटलं, कानात बोटं घालून गप्प बसत जा मग. ऐकत नको जाऊ गाणी.” या सगळ्या प्रकारामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, राखी आणि अनुश्री यांच्यातील संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे.(Bigg Boss Marathi 6)
============================
============================
राखी सावंतच्या एन्ट्रीनंतर घरातला खेळ अधिक रंगतदार झाला असून, अनुश्रीसोबत सुरू झालेला हा पंगा पुढे कोणतं वळण घेणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. येणाऱ्या भागात राखी आपला खेळ कसा खेळणार, हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.