Dadasaheb Phalke पुरस्कार विजेत्या कलाकाराने गायले ‘हे’ पहिले आणि शेवटचे

Bigg Boss Marathi 6 : घरात पुन्हा पडली वादाची ठिणगी; प्राजक्ता आणि अनुश्रीमध्ये ड्युटीमुळे झाला राडा!
कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी ६’ ( Bigg Boss 6) आता खऱ्या अर्थाने रंगात आला असून घरातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या दमदार थीमसह सुरू झालेल्या या पर्वात स्पर्धकांमधील नाती, समीकरणं आणि मतभेद वेगवेगळ्या वळणावर जात आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये घरातील ड्युटीच्या मुद्द्यावरून प्राजक्ता ( Prajakta Shukre) आणि अनुश्री ( Anushri Mane) यांच्यात जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळतं. घरकामाच्या वाटपावरून ‘बिग बॉस’च्या घरात नेहमीच कुरबुरी होत असतात, मात्र यंदा हे वाद अधिकच टोकदार झाल्याचं चित्र आहे. (Bigg Boss Marathi 6)

प्रोमोमध्ये अनुश्री “आम्ही ड्युटी करणार नाही,” अशी ठाम भूमिका घेताना दिसते. यावर प्राजक्ताचा संताप अनावर होतो आणि दोघींमध्ये तीव्र शब्दयुद्ध रंगतं. एकमेकींवर आरोप-प्रत्यारोप करताना वापरलेले शब्द पाहता घरातील वातावरण चांगलंच तापलेलं दिसतं. हा वाद इथेच थांबत नाही. प्राजक्ता ही संपूर्ण प्रकार दीपालीला सांगते आणि त्यानंतर दीपाली गार्डन एरियामध्ये जाऊन अनुश्रीला जाब विचारते. या सगळ्या गोंधळात पुन्हा एकदा वादाला उधाण येतं आणि काही वक्तव्यांमुळे परिस्थिती आणखी चिघळते. या शाब्दिक चकमकीमुळे घरातील इतर सदस्यही अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळतं.

घरातील हा वाढता तणाव प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. “ह्याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ” या रितेश भाऊंच्या ओळीप्रमाणेच यंदाचा खेळ सतत नवे वळण घेत असून प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे.(Bigg Boss Marathi 6)
===========================
===========================
दरम्यान, आजच्या भागात घरात आणखी एक मोठा टास्क रंगणार आहे. राशनच्या गोण्यांसाठी होणाऱ्या या टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये प्रचंड राडा पाहायला मिळणार आहे. राशन मिळवण्यासाठी स्पर्धकांना जास्तीत जास्त गोण्या जमा कराव्या लागणार असून, जो संघ हा टास्क जिंकेल त्यांना गोल्डन राशन कार्ड मिळणार आहे. एकीकडे वाढते वाद आणि दुसरीकडे तगडी स्पर्धा, यामुळे ‘बिग बॉस मराठी ६’ आता अधिकच रंजक होत चालला आहे.