Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Big Boss Marathi 6 मध्ये सागर कारंडे ते Gautami Patil सह ‘हे’ कलाकार झळकणार 

 Big Boss Marathi 6 मध्ये सागर कारंडे ते Gautami Patil सह ‘हे’ कलाकार झळकणार 
Big Boss Marathi 6 Contestant list
टीव्ही वाले मिक्स मसाला

Big Boss Marathi 6 मध्ये सागर कारंडे ते Gautami Patil सह ‘हे’ कलाकार झळकणार 

by Team KalakrutiMedia 05/01/2026

Big Boss Marathi चं नवीन पर्व कधी एकदा सुरु होत आहे याची सर्वच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर जवळ आला आहे. ११ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी ६चा बहुप्रतिक्षित धमाका सुरू होणार आहे. यंदाचं पर्व खास ठरणार आहे, कारण या वेळची संकल्पना नेहमीपेक्षा वेगळी आहे. घरामध्ये ‘स्वर्ग आणि नर्क’ अशी अनोखी थीम पाहायला मिळणार असून, स्पर्धकांना अक्षरशः सुख-दुःखाच्या टोकाच्या अनुभवांतून जावं लागणार आहे. प्रेक्षकांचा लाडका होस्ट रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) पुन्हा एकदा आपल्या हटके शैलीत घरातील सदस्यांना धडे देण्यासाठी सज्ज आहे. स्पर्धकांच्या नावांबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. आता मात्र काही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचं समजत आहे.(Big Boss Marathi 6)

Big Boss Marathi 6
Big Boss Marathi 6 contestants List

मराठी विनोदविश्वातील लोकप्रिय चेहरा सागर कारंडे (Sagar Karande) यंदा बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’मधील त्याची टाइमिंग आणि हुशारी या खेळात कशी कामी येते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तसेच, अभिनेत्री आणि लेखिका दीपाली सय्यद (Deepali Sayyad ) आपल्या ठाम मतांमुळे आणि बिनधास्त स्वभावामुळे घरात वेगळाच रंग भरतील, अशी चर्चा आहे.तरुण प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री अनुश्री माने (Anushri Mane) जिने लोकप्रिय वेब सीरिज ‘शाळा’ मधून लोकप्रियता मिळवली , तीही यंदा घरात दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय, ‘छत्रीवाली’ आणि ‘दोस्तीगिरी’ फेम चॉकलेट बॉय संकेत पाठक (Sanket Pathak) याची एन्ट्रीही प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

Big Boss Marathi 6
Big Boss Marathi 6 contestants List

या अधिकृत नावांव्यतिरिक्त काही चर्चित व्यक्तींची नावंही जोरदार चर्चेत आहेत. जर या स्पर्धकांनी घरात पाऊल ठेवलं, तर खेळ नक्कीच अधिक रंगतदार होईल. यामध्ये लावणी स्टार गौतमी पाटील (Gautami Patil) , वकील गुणरत्न सदावर्ते, सोशल मीडिया स्टार विनायक माळी, डॅनी पंडित, अभिनेत्री गिरीजा ओक आणि धनश्री काडगावकर यांचा समावेश आहे. (Big Boss Marathi 6)

===========================

हे देखील वाचा: नव्या वर्षात स्टार प्रवाहवर मनोरंजनाचा महासोहळा; प्रेक्षकांसाठी तीन भव्य मालिकांची मेजवानी !

===========================

मागील सीझनमध्ये ‘झापूक झुपूक’ म्हणत प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सुरज चव्हाणने विजेतेपद पटकावलं होतं. त्याने ट्रॉफीसह १४.६ लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक गाडी जिंकली होती. आता यंदाच्या पर्वात कोण प्रेक्षकांचा लाडका ठरेल आणि ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. रविवार, ११ जानेवारी २०२६ पासून दररोज रात्री ८ वाजताकलर्स मराठीवर बिग बॉस मराठी ६ पाहता येणार आहे. Jio Hotstar वर हा शो कधीही पाहता येईल. यंदाचा बिग बॉस मराठी स्वर्ग दाखवतो की नर्क? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आता दिवस मोजत आहेत!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bigg boss 6 bigg boss 6 contastant list bigg boss 6 list Celebrity Colors Marathi Entertainment gautami Patil nbigg boss Ritesh deshmukh sanket pathak
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.