Dadasaheb Phalke पुरस्कार विजेत्या कलाकाराने गायले ‘हे’ पहिले आणि शेवटचे

Bigg Boss Marathi 6: ‘तो माझा हात कधीच सोडत नाही…’ राधा पाटील बॉयफ्रेंडच्या आठवणींनी झाली भावूक!
Bigg Boss Marathi 6 च्या घरात रोजच वाद-विवाद पाहायला मिळत असले तरी, या गोंधळाच्या पलीकडे काही नाती हळुवारपणे फुलताना देखील दिसत आहेत. अशाच एका खास नात्याची चर्चा सध्या प्रेक्षकांमध्ये रंगली आहे, ती म्हणजे राधा पाटील (Radha Patil)आणि अनुश्री माने (Anushri Mane) यांची मैत्री. अवघ्या काही दिवसांतच या दोघींमध्ये घट्ट बॉन्ड तयार झाल्याचं घरात स्पष्टपणे जाणवत आहे. आगामी भागात, सकाळच्या वेळेत राधा आणि अनुश्री गार्डन एरियामध्ये शांतपणे गप्पा मारताना दिसणार आहेत. या संवादात राधाने प्रथमच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. राधा गेल्या काही वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने अनुक्षीसमोर उघड केलं. विशेष म्हणजे, अनुक्षीने राधाच्या बॉयफ्रेंडबद्दल आपली आपुलकी व्यक्त करताना, ती त्याची फॅन असल्याचंही सांगितलं. मात्र, त्याचं नेमकं नाव शोच्या टेलिकास्टमध्ये म्यूट करण्यात आलं आहे.(Bigg Boss Marathi 6)

राधा सांगते की, “आम्ही 2BHK फ्लॅटमध्ये राहतो. आमचं बेडरूम वेगळं आहे आणि बाकी मुलींसाठी स्वतंत्र रूम आहे. आम्ही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहोत. त्याचा स्वभाव खूपच प्रोटेक्टिव्ह आहे. कोणी मला काही बोललं, तर तो शांत बसणार नाही. त्याला कोणतीही वाईट सवय नाही. गेल्या तीन वर्षांत त्याने स्वतःच्या हाताने जेवणही केलं नाही, तो नेहमी माझ्याच हातचं जेवतो. त्यामुळे मी इथे आले आहे, तेव्हा मला सतत त्याची काळजी वाटते… तो कसा असेल, काय करत असेल?” ती पुढे म्हणते की, “अनेक मुलींना देसी बॉय हवा असतो ना, तसाच तो आहे.” हे सांगताना राधा भावूक झालेली दिसते. “त्याची आठवण आली की मला खूप रडायला येतं. इथे लोक मला खूप बोलतात… तो इथे असता, तर कदाचित एवढ्यात कोणाशी तरी भांडून बाहेर पडला असता,” असं ती हसत-हसत पण भावनांनी भरून सांगते. यावर अनुश्री गंमतीने म्हणते, “आता मला पण एखादा बॉयफ्रेंड शोधायला हवा.” राधाच्या बॉयफ्रेंडबद्दल अनुक्षी पुढे म्हणते, “मी त्याची फॅन आहे… म्हणजे तुझीही आहे, पण त्याचं एक खास गाणं मला फार आवडतं.”

राधा यावर आणखी एक किस्सा सांगते. “आम्ही फिरायला गेलो की माझ्यासोबत फारसं कोणी फोटो काढत नाही, पण त्याच्यासोबत फोटो काढायला लोकांची गर्दी होते. लोक त्याच्यासाठी वेडे आहेत. पण, तो कधीच माझा हात सोडत नाही. आम्हाला आता तीन वर्ष झाली, पण कधीच असं वाटलं नाही की आमच्यातलं प्रेम कमी झालं आहे. मी चिडते, ओरडते, तरीही तो सगळं शांतपणे सहन करतो. त्यामुळेच त्याची आठवण आली की मी अधिक भावूक होते.”(Bigg Boss Marathi 6)
=============================
हे देखील वाचा: Akshaya Naik ची मोठी झेप; मराठी मालिकेतून आता थेट हिंदी वेबविश्वात पदार्पण !
=============================
या सगळ्या गप्पांनंतर, शेवटी राधाने अनुक्षीला तिच्या बॉयफ्रेंडचं पूर्ण नावही सांगितलं. मात्र, हे नाव प्रेक्षकांसाठी सस्पेन्सच ठेवलं असून, एपिसोडमध्ये ते म्यूट करण्यात आलं आहे.या संवादामुळे बिग बॉसच्या घरात केवळ भांडणंच नाही, तर खऱ्या भावना, प्रेम आणि मैत्रीही तितकीच महत्त्वाची आहे, हे पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.