Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 : ‘मला काही फरक पडत नाही…’

Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण;

जे गाणे Kishore Kumar गायला तयार नव्हते त्याच गाण्याने त्यांना

The Kerala Story 2 Trailer: ‘25 वर्षांमध्ये भारत इस्लामिक राष्ट्र

Gautami Patil Wedding: गौतमी पाटीलने ‘या’ अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ? नवऱ्यासाठी घेतला स्पेशल उखाणा

Shraddha Kapoor : पुण्यात ‘ईठा’ चित्रपटाचं शुटींग पूर्ण!

“मुंबईत राहायचं म्हणजे मराठी आलंच पाहिजे!”; Rohit Sharmaने साधला हास्यजत्रेच्या

सदस्यांना वठणीवर आणण्यासाठी Bigg Bossने लढवली शक्कल; घराचा कारभार सांभाळण्यासाठी

OTT गाजवल्यानंतर ‘सुंदरा’ आता हिंदी मालिकेमध्ये झळकणार; Akshaya Naik च्या

Dhurandhar 2 अडकला कायदेशीर कचाट्यात! आदित्य धरच्या प्रोडक्शनला BMC ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात येणार मोठा ट्विस्ट; दार उघडणार आणि नशिब उल्टा-पुल्टा होणार ! 

 Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात येणार मोठा ट्विस्ट; दार उघडणार आणि नशिब उल्टा-पुल्टा होणार ! 
Bigg Boss Marathi 6
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात येणार मोठा ट्विस्ट; दार उघडणार आणि नशिब उल्टा-पुल्टा होणार ! 

by Team KalakrutiMedia 19/01/2026

कलर्स मराठीवरील ‘Bigg Boss Marathi 6’च्या घरात सध्या प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहेत. रोज नव्या वादांना, मजेशीर क्षणांना आणि बदलत्या नात्यांना प्रेक्षक साक्षीदार ठरत आहेत. खेळ जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे आव्हान अधिक कठीण होत चालले आहे. अशातच आता घरात असा एक मोठा ट्विस्ट येणार आहे, जो संपूर्ण खेळाची दिशा बदलू शकतो. आजच्या भागात प्रेक्षकांना एक अत्यंत धक्कादायक बदल पाहायला मिळणार आहे. ‘उल्टा-पुल्टा’ नावाच्या खास रूमची घरात एन्ट्री होणार असून, या रूमकडे संपूर्ण गेम पलटवण्याची ताकद असल्याचं बिग बॉसने स्वतः जाहीर केलं आहे. “या आठवड्यात सदस्यांसाठी अडचणी दुप्पट होणार आहेत,” असा इशाराही बिग बॉसने दिला आहे. या नव्या रूममुळे घरातील समीकरणं ढवळून निघणार असून, कोणासाठी ही संधी ठरेल तर कोणासाठी मोठी अडचण ठरू शकते. (Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6

या ट्विस्टमुळे घरातील वातावरण अधिकच तापल्याचं दिसून येत आहे. बिग बॉसच्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, आजच्या भागात नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, आणखी एका प्रोमोमध्ये अनुश्री आणि राकेश बापट (Rakesh Bapat) यांच्यात जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. वादाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसले तरी अनुश्रीच्या काही शब्दांमुळे राकेश प्रचंड संतापलेला दिसतो. संतापाच्या भरात राकेश घरात तोडफोड करताना आणि घर सोडण्याची भाषा करताना दिसतो. “मला या घरात अजिबात राहायचं नाही,” असं तो ठामपणे सांगतो. तर दुसरीकडे अनुश्रीने केलेल्या आरोपांवर राकेश तीव्र प्रतिक्रिया देतो, ज्यामुळे हा वाद अधिकच पेटतो.

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6

‘बिग बॉस मराठी’ला सुरुवात होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. नुकताच ‘भाऊंचा धक्का’ हा खास एपिसोड पार पडला, ज्यामध्ये यावेळी कोणतीही नामांकन प्रक्रिया झाली नाही. मात्र येत्या आठवड्यात नक्कीच नॉमिनेशन होणार असून, एक स्पर्धक घराबाहेर जाणार असल्याचं रितेश देशमुखने आधीच स्पष्ट केलं आहे. (Bigg Boss Marathi 6)

============================

हे देखील वाचा: Bai Tujha Ashirwad: स्टार प्रवाहवर नव्या मालिकेचा AI टीजर रिलीज; ईशा केसकर नव्या शोमधून करणार पुनरागमन?  

============================

आता ‘उल्टा-पुल्टा’ रूम, वाढते वाद आणि होणारी नॉमिनेशन प्रक्रिया यामुळे हा आठवडा अधिकच निर्णायक ठरणार आहे. कोणाचा खेळ बहरणार आणि कोणाचा प्रवास इथेच संपणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रोचक ठरेल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Anushri mane Bigg Boss Marathi bigg boss marathi 6 Celebrity Entertainment rakesh bapat Ulta Pulta
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.