
Bigg Boss Marathi 6 Promo: ‘आपण शब्द दिला की मागे नाही हटत’ म्हणत रितेश भाऊसोबत धडाकेबाज नवा प्रोमो रिलीज
‘Bigg Boss Marathi’ चा सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या सीझनची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यंदाही या लोकप्रिय रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) करणार आहे. आधीच प्रदर्शित झालेल्या दमदार प्रोमोमुळे चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली होती आणि आता शोचा आणखी एक नवा प्रोमो समोर आल्याने उत्साहाला पुन्हा एकदा उधाण आलं आहे. (Bigg Boss Marathi 6 Promo)

नव्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख एका वेगळ्याच, हटके अंदाजात दिसतोय. “एकदा शब्द दिला की मागे हटायचं नाही,” अशा ठाम संवादासह तो यंदाचा सीझन खास आणि लक्षवेधी ठरणार असल्याचे संकेत देतोय. “दार उघडणार, नशिबाचा खेळ बदलणार” या ओळींसह शेअर करण्यात आलेला हा प्रोमो या सीझनची थीम काय असू शकते, याची झलक देतो.
==============================
==============================
या प्रोमोवरून प्रेक्षकांनी विविध तर्क लावायला सुरुवात केली आहे. यंदाचा खेळ केवळ करमणुकीपुरता मर्यादित न राहता, स्पर्धकांच्या आयुष्याला कलाटणी देणारा असू शकतो, अशी चर्चा रंगते आहे. रितेश देशमुखच्या प्रभावी शब्दांमुळे आणि त्याच्या सादरीकरणामुळे शोचा टोन आधीच सेट झालेला दिसतो.

प्रत्येक सीझनप्रमाणे यंदाही प्रोमोमध्ये रितेश भाऊ काहीतरी नवीन घेऊन आले आहेत. कधी वेगळा लूक, कधी हटके स्टाईल, तर कधी खास स्वॅगहे त्यांच्या प्रोमोचं वैशिष्ट्य ठरलं आहे. या वेळीही त्यांनी एका वेगळ्या अवतारातून सीझनची थीम प्रेक्षकांसमोर मांडली आहे. प्रोमोमधील त्यांचे संवाद सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.(Bigg Boss Marathi 6 Promo)
==============================
==============================
‘बिग बॉस मराठी 6’चा प्रीमियर 11 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता होणार आहे. आता सर्वांचं लक्ष आहे ते यंदाच्या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांकडे. अनेक कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची नावं चर्चेत असून, कोण कोण घरात जाणार याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दार उघडल्यानंतर नेमके कोणते ट्विस्ट समोर येणार, कोण बाजी मारणार आणि कोण अडचणीत सापडणारयाची उत्तरं लवकरच मिळणार आहेत. तोपर्यंत, बिग बॉस मराठी 6 ची चर्चा रंगातच राहणार हे नक्की आहे.