Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

“मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठी बोलायलाही शिकेन”; Vijay Sethupati

Nirmiti Sawant : ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित; आता रंगणार कौटुंबिक

नऊवारी, नथ आणि बंदूक…‘Super Duper’ मधून Nirmiti Sawant पुन्हा दिसणार डॅशिंग सासूच्या भुमिकेत! 

जेव्हा कॉमेडीयन मुक्री अभिनेत्री Nadiraच्या बेडरूममध्ये शिरला होता!

Bigg Boss Marathi 6: ‘चल आपण करून टाकू लग्न’ ,

Ramayana चित्रपटाच्या खोट्या कास्टिंगवर भडकला विक्रांत मेस्सी

Mughal-E-Azam : मोहन स्टुडिओत साधं टॉयलेटही नव्हतं….

Valentine’s Week  2026 : ७ वर्ष लिव्हइनमध्ये राहूनही बॉलिवूडच्या ‘या’

Gondhal चित्रपटाचा जागतिक डंका; ’फिप्रेस्को’ या मानाच्या अवॉर्डने मराठी कलेचा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss Marathi 6: ‘चल आपण करून टाकू लग्न’ , राकेश बापटने प्राजक्ताला घातली थेट लग्नाची मागणी? 

 Bigg Boss Marathi 6: ‘चल आपण करून टाकू लग्न’ , राकेश बापटने प्राजक्ताला घातली थेट लग्नाची मागणी? 
Rakesh Bapat Preposed Prajakta Shukre
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bigg Boss Marathi 6: ‘चल आपण करून टाकू लग्न’ , राकेश बापटने प्राजक्ताला घातली थेट लग्नाची मागणी? 

by Team KalakrutiMedia 10/02/2026

‘Bigg Boss Marathi 6’ च्या आजच्या भागात घरातील समीकरणं अधिकच गुंतागुंतीची होताना दिसतात. दरम्यान, राकेश दीपालीसमोर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळंबोलताना पहायला मिळाला . तो आपल्या एक्स पत्नी अभिनेत्री रिद्धी डोगरा (Riddhi Dogara) हिच्याबद्दल सांगतो की, त्यांच्या नात्यात समज होती, पण विचार न जुळल्यामुळे ते दोघे पती-पत्नी म्हणून एकत्र राहू शकले नाहीत. मात्र आजही त्यांच्यात मैत्री कायम असून ते रोज संपर्कात असतात. ,तेव्हा न्हा लग्न करण्याचा विचार नसल्याचंही राकेश स्पष्ट करतो.त्यानंतर घरात पुढे सुरू होतो एक गुप्त प्लॅन. अनुश्री ठरवते की, ती टोळी सोडत असल्याचं खोटं चित्र तयार करायचं. टोळीविरोधात बोलायचं, पण योग्य वेळी टास्कमध्ये त्यांच्याच बाजूने उभं राहायचं असा तिचा डाव असतो. यानुसार ती तन्वीसमोर टोळीविरोधात बोलते. मात्र विशालवर आधीपासूनच विश्वास नसल्यामुळे तन्वीला अनुश्रीवर संशय येतो. अनुश्री हीच गोष्ट राकेश आणि दीपालीलाही सांगते आणि नंतर तेच संभाषण टोळीपर्यंत पोहोचवते.(Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Update

दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी घासण्याच्या कामावरून दीपाली, सागर आणि विशाल यांच्यात जोरदार वाद होतो. अनुश्री पुन्हा आपला प्लॅन राबवत सगळ्यांशी वेगवेगळ्या भूमिका घेत बोलते. त्यामुळे दीपाली, तन्वी, प्राजक्ता आणि करण या सगळ्यांनाच तिच्यावर संशय येऊ लागतो. दरम्यान, रुचिता सागरला थेट प्रश्न विचारते की, घरात कोण कॅप्टन होऊ नये असं त्याला वाटतं? यावर सागर स्पष्टपणे तन्वीचं नाव घेतो. याचवेळी बिग बॉस मोठी घोषणा करतात. घरात ‘एन्टरटेन्मेंटची त्सुनामी’ येणार असल्याचं ते सांगतात. त्यासाठी सर्व स्पर्धकांना गोल्डन रेशन कार्ड दिलं जातं आणि पुढील दिवस अधिकच कठीण असतील, असा इशाराही दिला जातो.

Bigg Boss Marathi 6 Update

त्यानंतर राकेश आणि प्राजक्तामधील संवादही चर्चेचा विषय ठरतो. राकेश आपल्या स्वप्नातील जोडीदाराबद्दल बोलताना म्हणतो की, ‘मी लहानपणी असं म्हणायचो, मी जर कधी लग्न केलं, तर एका गायिकेशी करेन. ती रोज रियाज करेल आणि मी ऐकत राहीन. ती सकाळी उठून ओले केस मोकळे सोडून साडी नेसून तानपुरा वाजवत असेल. तिला तसं गाताना मी बघत बसेन. मग नाही मिळाली अशी.’ पुढे राकेश मुद्दाम प्राजक्ताला म्हणतो, ‘चल प्राजक्ता करून टाकू आपण लग्न. बोल देतो ओपन प्रपोजल, स्वप्न असं दिसतंय मला समोर’ प्राजक्ता राकेशला गप्प करते. प्राजक्ता हे जाऊन करणला सांगते. एपिसोडच्या शेवटी सगळ्यात मोठा धमाका होतो. गार्डन एरियात सगळे स्पर्धक फ्रीज असताना राखी सावंत बिग बॉसच्या घरात एन्ट्री करते. तिच्या आगमनाने घरात एकच गोंधळ उडतो. राखी सगळ्यांची खिल्ली उडवत राकेशला ‘माझे एक्स जीजू’ म्हणते. प्रभू तिच्या समोर पूर्णपणे गोंधळून जातो. राखी आणि प्रभूमधील संवाद, विशालसोबत झालेली बाचाबाची आणि अंड्यांवरून झालेला वाद घरात नवा रंग भरतो. (Bigg Boss Marathi 6)

============================

हे देखील वाचा: आधी कोर्टात खेचण्याची भाषा आता वाढदिवसाच्या शुभेच्छा? Shashank Ketkar च्या पोस्टमुळे चाहतेही गोंधळले…

============================

रुचिता आणि अनुश्री राखीला आपल्या टोळीत घेण्याचा विचार करतात, पण तिचा आत्मविश्वास पाहून त्या स्वतःच गोंधळतात. तन्वी स्पष्टपणे म्हणते की, राखी पूर्ण तयारीनिशी गेम खेळायला आली आहे. ड्युटीच्या चर्चेदरम्यानही राखी आपल्या हटके शैलीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आणि ‘मित्र म्हणजे सगळं करायचं का?’ असा सवाल उपस्थित करते. एकूणच हा भाग वाद, डावपेच, खुलासे आणि राखी सावंतच्या धडाकेबाज एन्ट्रीमुळे प्रेक्षकांसाठी भरपूर मनोरंजन घेऊन आला.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: BBM6 Drama bigg boss marathi 6 Bigg Boss Marathi Latest Episode Celebrity Entertainment Marathi reality show news Prajakta Proposal rakesh bapat
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.