
Bigg Boss Marathi 6: राकेश ला लहानपणी होता ‘हा’ गंभीर आजार; बिग बॉसच्या घरात व्यक्त केलं दुःख
Bigg Boss Marathi 6 च्या कालच्या भागात कॅप्टनसी टास्कने घरात अक्षरशः वादळ उठवलं. ग्रहणाच्या संकल्पनेवर आधारित टास्कमध्ये कोण टिकणार आणि कोण बाद होणार, यावरून सदस्यांमध्ये तणाव शिगेला पोहोचला. सुरुवातीला बिग बॉस सहा स्पर्धकांना पॉवर की दाखवायला सांगतात आणि तन्वी टास्कचे नियम स्पष्ट करते. आयुष बझर वाजवून सूर्याची भूमिका घेतो, तर इतर सदस्य ग्रह आणि उपग्रह बनतात. टास्क सुरू होताच शब्दांच्या फैरी झडू लागतात. तन्वीने विशालला पहिल्याच फेरीत बाहेर काढल्यामुळे वातावरण तापतं. त्यानंतर ओंकारने प्राजक्ताला बाद केल्याने समीकरणं आणखी बिघडतात. विशालचा संताप अनावर होतो आणि त्याची आक्रमक प्रतिक्रिया सर्वांचं लक्ष वेधून घेते. दुसऱ्या फेरीतही संघर्ष काही कमी होत नाही. अनुश्री आणि दीपाली उपग्रह बनतात. अनुश्रीने राकेशला कॅप्टनसीच्या शर्यतीतून काढण्याचा निर्णय घेतल्याने मोठा वाद उभा राहतो. “घरात सहभाग नाही” हा आरोप राकेशला मान्य होत नाही. या निर्णयामुळे प्रभूही बाहेर पडतो आणि अखेर आयुष व रोशन कॅप्टनसीच्या अंतिम फेरीत पोहोचतात. (Bigg Boss Marathi 6)

टास्क नंतरचा खेळ अधिकच वैयक्तिक होतो. राकेशचा राग, आदळआपट आणि इतर सदस्यांशी झालेल्या बाचाबाचींमुळे घरात नकारात्मक वातावरण तयार होतं. याच दरम्यान राकेशने प्राजक्तासमोर केलेली भावनिक कबुली प्रेक्षकांच्या मनाला भिडते. राकेश प्राजक्ताला सांगतो की, ‘मी लहान असताना ‘Dyslexic’ होता . ‘तारे जमीन पर मधल्या मुलासारखा होतो. मी खूप वर्ष शाळेत तोंडी परीक्षा दिली. शब्द वाचायला जायचो तर शब्द उडायचे सगळे. आता पण स्क्रिप्ट वाचताना, दुसऱ्या ओळीवर जाताना मला गोंधळायला होतं. जेव्हा मला पहिल्यांदा स्क्रिप्ट देतात ना, तेव्हा चला रीडिंग करूया, असं नाही करत मी. ते शब्द फ्रेंडली व्हावे लागतात. मी कलेतून एक्स्प्रेस करायला शिकलो.’ असं ही राकेश प्राजक्तासोबत बोलताना सांगतो.

दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच पुन्हा टोमणे, चुगल्या आणि भांडणांची मालिका सुरू होते. राकेश मुद्दाम झोपून राहतो, बिग बॉस त्याला कन्फेशन रूममध्ये बोलावून समजावतात. दुसरीकडे, घरात भांडी, कपडे आणि वैयक्तिक मुद्द्यांवरून वाद रंगतात. रुचिताचे अश्रू, रोशनची दुखावलेली भावना आणि ओंकारचं भावनिक होणं सगळं मिळून हा भाग प्रचंड भावनिक बनतो. (Bigg Boss Marathi 6)
===========================
हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6: राकेश आणि अनुश्री यांच्यात पुन्हा वाद; कोणाची होणार बोलती बंद?
===========================
हां एपिसोड एक गोष्ट स्पष्ट करतो ‘बिग बॉस मराठी ६’ आता फक्त टास्कपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर प्रत्येक स्पर्धकाची मानसिक ताकद, भावनिक संघर्ष आणि नातेसंबंधांची खरी परीक्षा सुरू झाली आहे.