Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 : ‘मला काही फरक पडत नाही…’

Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण;

जे गाणे Kishore Kumar गायला तयार नव्हते त्याच गाण्याने त्यांना

The Kerala Story 2 Trailer: ‘25 वर्षांमध्ये भारत इस्लामिक राष्ट्र

Gautami Patil Wedding: गौतमी पाटीलने ‘या’ अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ? नवऱ्यासाठी घेतला स्पेशल उखाणा

Shraddha Kapoor : पुण्यात ‘ईठा’ चित्रपटाचं शुटींग पूर्ण!

“मुंबईत राहायचं म्हणजे मराठी आलंच पाहिजे!”; Rohit Sharmaने साधला हास्यजत्रेच्या

सदस्यांना वठणीवर आणण्यासाठी Bigg Bossने लढवली शक्कल; घराचा कारभार सांभाळण्यासाठी

OTT गाजवल्यानंतर ‘सुंदरा’ आता हिंदी मालिकेमध्ये झळकणार; Akshaya Naik च्या

Dhurandhar 2 अडकला कायदेशीर कचाट्यात! आदित्य धरच्या प्रोडक्शनला BMC ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss Marathi 6: सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची घरात एन्ट्री; ‘फोकस्ड इंडियन’ घरात किती फोकस्ड राहणार?

 Bigg Boss Marathi 6: सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची घरात एन्ट्री; ‘फोकस्ड इंडियन’ घरात किती फोकस्ड राहणार?
Bigg Boss Marathi 6
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bigg Boss Marathi 6: सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची घरात एन्ट्री; ‘फोकस्ड इंडियन’ घरात किती फोकस्ड राहणार?

by Team KalakrutiMedia 12/01/2026

मोबाईलवर स्क्रोल करताना अचानक चेहऱ्यावर हसू आणणारा, आपल्या अतरंगी निरीक्षणांनी आणि मिश्कील शैलीने लाखो लोकांना आपलंसं करणारा करण सोनवणे (Karan Sonawane) आता थेट Bigg Boss Marathi च्या घरात पोहोचला आहे. सोशल मीडियावर ‘फोकस्ड इंडियन’ म्हणून ओळखला जाणारा करण आज, ११ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजता सुरू झालेल्या बिग बॉस मराठी ६ चा भाग बनला असून, त्याची एंट्री आधीपासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. या पर्वाचा शानदार शुभारंभ अभिनेता रितेश देशमुखने केला. करण सोनवणेचा प्रवास झपाट्याने घडलेला वाटत असला, तरी त्यामागे अनेक वर्षांची मेहनत आहे. सोशल मीडिया आजइतका प्रभावी नव्हता, त्या काळातच म्हणजे २०१४-१५ च्या सुमारास करणने थिएटर आणि स्टँड-अप कॉमेडीच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करायला सुरुवात केली. सामान्य मराठी माणसाचं दैनंदिन जगणं, त्यातल्या विसंगती, छोट्या आनंदाच्या क्षणांवर केलेली त्याची मार्मिक टिप्पणी लोकांना भावली.(Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6

हळूहळू सोशल मीडियावर त्याचा प्रभाव वाढत गेला आणि आज त्याच्या नावावर १.५ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. ‘फोकस्ड इंडियन’ ही ओळख आता केवळ टोपणनाव न राहता एक ब्रँड बनला आहे. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी करणला निरोप देण्यासाठी त्याची खास ‘ऑरेंज ज्यूस’ मंडळी एकत्र आली होती. मित्र, सहकारी आणि जवळच्या लोकांनी त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनीही सोशल मीडियावरून त्याला पाठिंबा देत, या प्रवासात पूर्ण ताकद लावणार असल्याचं जाहीर केलं.

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6

याचकाळात आणखी एक सोशल मीडिया चेहरा, प्रभु शेळके यानेही बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. दोघांनाही दार निवडण्याची संधी देण्यात आली. प्रभुने मेहनतीचा मार्ग स्वीकारला, तर करणने शॉर्टकटचं दार निवडत खेळाच्या सुरुवातीलाच धाडसी निर्णय घेतला. यामुळे करणकडे काही विशेष अधिकार असणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. करण केवळ रिल्स किंवा विनोदी व्हिडिओंपुरता मर्यादित नाही. त्याने अभिनय क्षेत्रातही स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. ‘ब्लॅकआउट’, ‘१२३४’ आणि ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ यांसारख्या प्रोजेक्ट्समधील त्याच्या भूमिकांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात तो केवळ कंटेंट क्रिएटर म्हणून नव्हे, तर अनुभवी कलाकार म्हणूनही उतरला आहे. (Bigg Boss Marathi 6)

============================

हे देखील वाचा: Mirzapur 4 कधी येणार? श्रिया पिळगावकरने खास फोटो शेअर करत दिली गुडन्यूज!

============================

आता करन ची विनोदी शैली घरात सकारात्मक वातावरण निर्माण करेल की तीच शैली वादाचं कारण ठरेल, हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट नक्की करण सोनवणेची एंट्री बिग बॉस मराठी ६ ला एक वेगळी रंगत देणारी ठरली आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bigg Boss Marathi bigg boss marathi 6 bigg boss marathi 6 list Celebrity Colors Marathi enters the house Entertainment influencer karan sonawane Ritesh deshmukh
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.