
Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार तूफान राडा !
बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi) च्या घरात पुन्हा एकदा वातावरण तापणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सागर कारंडे, प्रभू आणि रुचिता यांच्यातील एक प्रसंग चांगलाच चर्चेचा विषय ठरतो आहे. हलक्याफुलक्या मस्करीतून सुरू झालेला हा प्रकार काही क्षणांतच गंभीर वादात बदलतो. प्रोमोमध्ये प्रभू ‘तुमच्यासारखं नाही’ असं म्हणत ऋतुजाची नक्कल करताना दिसतो. त्याची बोलण्याची ढब, देहबोली आणि हावभाव पाहून घरातील काही स्पर्धक हसत असल्याचं दिसतं. मात्र यानंतर रुचिता देखील मागे राहत नाही. ती ‘म्युट, म्युट’ असं म्हणत थेट प्रभूचीच नक्कल करू लागते. सुरुवातीला विनोदाच्या स्वरूपात सुरू झालेला हा प्रकार हळूहळू तणावपूर्ण वळण घेतो. (Bigg Boss Marathi 6)

हा सगळा प्रकार पाहून सागर कारंडेचा (Sagar Karande) संयम सुटतो. तो संतापलेल्या आवाजात प्रभूला थेट इशारा देतो, “ए प्रभू, आवाज जास्त चढवू नकोस.” सागरचा हा रोखठोक सूर ऐकून प्रभू क्षणभर चकित होतो आणि “काय बोललास?” असा सवाल करतो. त्यावर सागर स्पष्ट शब्दांत सांगतो की, “कोणी काही बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही की तू कोणालाही काहीही बोलशील.”

या वादामुळे घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण होतं. मात्र प्रभू आपली बाजू मांडताना शांत राहण्याचा प्रयत्न करतो. “मी काहीच बोललो नाही,” असं तो म्हणतो. त्याच्या या प्रतिक्रियेमुळे हा वाद आणखी पेटणार की निवळणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.(Bigg Boss Marathi 6)
==========================
==========================
दरम्यान, हा संपूर्ण सीन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या असून, काही जण सागर कारंडेच्या स्पष्ट आणि थेट भूमिकेचं समर्थन करत आहेत, तर काही प्रेक्षक प्रभूने घेतलेली शांत भूमिका योग्य असल्याचं मत व्यक्त करत आहेत.