Bollywood Movies : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांचं झालंय

‘बिग बॉस मराठी’ फेम Janhavi Killekar ची मालिकेत एन्ट्री; मोहिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना घालणार भुरळ !
Aai Tuljabhavani Serial: सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्या मालिकांमधून अनेक नवे चेहरे आणि कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागले आहेत. अशातच एका लोकप्रिय पौराणिक मालिकेमध्ये ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करत आहे.(Actress Janhavi Killekar)

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत जान्हवीची एन्ट्री होणार असून ती ‘मोहिनी’ या खलनायिकेच्या खास भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो कलर्स मराठीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला असून, चाहत्यांनी या प्रोमोवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मोहाचा मोह, मोहिनीचा पाश, भुलवून करते कायमचा नाश” यावाक्यासह शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये जान्हवीचा पारंपरिक आणि लक्षवेधी लूक पहायला मिळतो. ‘आई तुळजाभवानी’ ही आध्यात्मिक आणि पौराणिक पार्श्वभूमीवर आधारित मालिका असून गेल्या वर्षभरापासून ती प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. आता जान्हवी किल्लेकरच्या मोहिनी या रहस्यमय पात्रामुळे या मालिकेत एक नवा वळण येणार असल्याचं स्पष्ट होत आहे. तिच्या पारंपरिक वेशभूषा आणि तीव्र नजरेनं सजलेला हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

जान्हवीने याआधीही छोट्या पडद्यावर विविध गडद छटा असलेल्या भूमिका साकारल्या आहेत. विशेषतः ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेमध्ये तिने ‘सानिया’ ही खलनायिका साकारली होती. या मालिकेत तिच्यासोबत विवेक सांगळे, निवेदिता सराफ आणि तन्वी मुंडले यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय जान्हवी ‘अबोली’ या मालिकेत एक डॅशिंग महिला पोलीस अधिकारी म्हणून झळकली होती, जी भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली.(Actress Janhavi Killekar)
================================
================================
जान्हवीला खरी ओळख मिळाली ती ‘कोळीवाडा झिंगला’ या गाण्यामुळे. या गाण्याच्या यशानंतर तिने विविध मालिकांमध्ये अभिनय करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. आता ‘आई तुळजाभवानी’ या पौराणिक मालिकेत तिचं पुनरागमन प्रेक्षकांसाठी एक आकर्षण ठरणार आहे. नव्या लूकमध्ये, पारंपरिक पेहरावात आणि एक आगळीवेगळी ताकदवान भूमिका साकारताना जान्हवी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकणार, यात शंका नाही. चाहत्यांसाठी ही एन्ट्री नक्कीच सरप्राइज ठरणार आहे.