Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

Bin Lagnachi Gosht Teaser: नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या सिनेमात पहायला मिळणार प्रिया- उमेशची भन्नाट केमिस्ट्री!
मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन विषय हाताळणारे चित्रपट सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अशाच एका वेगळ्या धाटणीची कथा असलेल्या ‘बिन लग्नाची गोष्ट’ चा सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. नात्यांच्या पारंपरिक चौकटींना धक्का देणारा, नव्या विचारांना वाव देणारा आणि लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या संवेदनशील सामाजिक विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करतो आहे.(Bin Lagnachi Gosht Teaser)

या चित्रपटात प्रिया बापट आणि उमेश कामत ही प्रेक्षकांची लाडकी जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. टीझरमध्ये त्यांच्या जोडीची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळते. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या या जोडप्याच्या नात्यात लग्नाआधीच गरोदरपणासारखे धक्कादायक वळण येते, आणि त्यानंतर घडणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. याशिवाय, टीझरमध्ये गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांचं एक वेगळंच नातं उलगडताना दिसतंय. पारंपरिक चौकटींपलीकडे जाऊन, ते नात्यांना एक नवा अर्थ देताना दाखवले गेले आहेत. त्यामुळे केवळ तरुण पिढीच नाही तर प्रौढ प्रेक्षकवर्गही या चित्रपटाशी जोडले जाणार, असं स्पष्टपणे जाणवतं.

चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, “टीझरला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. हा चित्रपट लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या विषयावर भाष्य करत असला तरी त्यात नात्यांची गुंतागुंत, प्रेम, जबाबदारी, सामाजिक मानसिकता यांचा भावनिक प्रवास आहे.” निर्माते नितीन वैद्य यांचंही असंच मत आहे. ते म्हणाले, “गोष्ट हटके आहे, पण ती आपल्याला भिडणारी आणि मनाला स्पर्श करणारी आहे. गिरीश ओक, निवेदिता सराफ यांसारख्या अनुभवी कलाकारांची साथ या कथेला अधिकच उंचीवर घेऊन जाते.”(Bin Lagnachi Gosht Teaser)
============================
============================
‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स यांची संयुक्त निर्मिती असून, तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत करत आहेत. चित्रपटाची कथा समीर कुलकर्णी यांची असून, दिग्दर्शन आदित्य इंगळे यांचं आहे. या चित्रपटात भावनिक गुंतवणूक, सामाजिक वास्तव आणि नव्या युगाची झलक एकत्र पाहायला मिळेल, असं टीझरवरून नक्कीच म्हणता येईल. नात्यांचे विविध रंग दाखवणारा आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.