Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bajrangi Bhaijaan : चित्रपटात एकही शब्द बोलली नाही पण रातोरात

Amruta Khanvilkar : “माझ्या घरी आलात तर आदर करणं…”; मराठी-हिंदी

Genelia Deshmukh : बॉलिवूडनंर साऊथमध्येही पुनरागमन; SS Rajamouli यांच्याशी झाली

Priyanka Chopra : ‘बर्फी’तील झिलमिल ५ दिवसांत कशी घडली? 

Box Office Collection : बॉलिवूड चित्रपटांनी पहिल्याच सहामाहीत पार केला

संतोष जुवेकरच्या ‘त्या’ विधानावर Vicky Kaushal याची प्रतिक्रिया!

Kurla To Vengurla Marathi Movie: लग्न व्यवस्थेतील गुंतागुंतीचा वेध घेणारी हलकीफुलकी

Chala Hava Yeu Dya Season 2: ‘चला हवा येऊ द्या’

Avkarika Movie Trailer: पथनाट्याने  रंगला ‘अवकारीका’ चित्रपटाचा  ट्रेलर लाँच सोहळा

Renuka Shahane : “२-३ जणांना मारहाण करुन भाषा….”; महाठी-हिंदी भाषेवर

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Karishma Kapoor : एका दिवसांत ६ चित्रपटांचं शुटींग आणि टोपणनावाची इंटरेस्टिंग स्टोरी!

 Karishma Kapoor : एका दिवसांत ६ चित्रपटांचं शुटींग आणि टोपणनावाची इंटरेस्टिंग स्टोरी!
कलाकृती विशेष

Karishma Kapoor : एका दिवसांत ६ चित्रपटांचं शुटींग आणि टोपणनावाची इंटरेस्टिंग स्टोरी!

by रसिका शिंदे-पॉल 25/06/2025

निळे डोळे, मोहक सौंदर्य, अभिनय आणि नृत्याची जाण असणारी अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) हिने ९०चं आणि २०००चं बॉलिवूडचं दशक चांगलंच गाजवलं… राज कपूर यांची नात असूनही कधीच तिला वशीला लावून चित्रपट मिळाला नाही असं बऱ्याच मुलाखतीमध्ये करिश्मा स्वत: बोलली आहे… ३४ वर्षांपेक्षा अधिक काळ सिने-इंडस्ट्रीत काम करणारी करिश्मा राजा हिंदुस्थानी, दिल तो पागल है, हम साथ साथ है, बीवी नं १, अंदाज अपना अपना अशा अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना दिसली आहे… एकापेक्षा एक ग्रेट चित्रपट देणाऱ्या करिश्मा हिने कायम तिच्या प्रत्येक भूमिकांमधून वर्सटॅलिटी दाखवण्याचा प्रयत्न केला… मात्र, तुम्हाला माहित आहे का एकेकाळी करिश्माने चक्क एका दिवसात ६ चित्रपटांचं शुटींग एकत्रित केलं आहे… बॉलिवूडमधलं सिने-घराणं जरी असलं तरी करिश्माच्या वाट्यालाही स्ट्रगल हा आलाच होता… जाणून घेऊयात करिश्माच्या या Struggle Period बद्दल…(Bollywood News)

कपिल शर्मा शो मध्ये काही महिन्यांपूर्वी करिश्मा आणि करिना कपूर यांनी हजेरी लावली होती… यावेळी कॅंडिड गप्पा मारताना करिश्माने तिच्या करिअरच्या सुरुवातीचा काळ सांगितला.. करिश्मा यावेळी म्हणाली की,” एक काळ असा होता ज्यावेळी मी एकाच दिवशी ६ चित्रपटाचं शुटींग करत होते… एका दिवसात मी या स्टुडिओमधून त्या स्टुडिओत जात राहायचे आणि चित्रपट आणि माझ्या कॅरेक्टरनुसार कॉश्च्युम्स चेंज करत असायचे…” बरं त्यावेळी करिश्माची जोडी गोविंदासोबत सुपरहिट ठरली होती… त्यामुळे दिग्दर्शक डेविड धवन आणि करिश्मा-गोविंदा हिरो-हिरोईन आणि शक्ती कपूर, कादर खान हे साईड हिरो अशी एक टीमच तयार जाली होती… त्यामुळे सातत्याने ही टीम एकत्र प्रवास करत ‘कुली नं १’, ‘राजा बाबू’, ‘हिरो नं १’, ‘हसीना मान जायेगी’ असे ब्लॉकबस्टर चित्रपट देतच होती…

करिश्माची ओळख ग्लॅमरस रोल्ससाठी अधिक होती… ती कधीच ग्रेड शेडची भूमिका किंवा एखादं पात्र करेल अशी अपेक्षा प्रेक्षकांनीच नाही तर तिने देखील कधीच केली नव्हती… मात्र, शिकारी या चित्रपटात करिश्माने ग्रेड शेडची बूमिका साकारत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच दिला होता… आणखी एक किस्सा असा तो म्हणजे तिच्या लोलो या Nick Name चा… इंडस्ट्रीत करिश्मा कपूर हे नाव जरी फेमस असलं तरी तिला तिचे मित्र आणि घरचे लोलो म्हणतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहेच… पण तिला लोलो हे नाव कसं पडलं त्याचीही एक इंटरेस्टींग स्टोरी आहे… करिश्मा कपूरची आई बबिता कपूर या देखील अभिनेत्री… आणि त्या हॉलिवूड अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा हिच्या फॅन होत्या.. आणि तिच्याच नावापासून प्रेरित होत त्यांनी करिश्माचं लाडानं नाव लोलो असं ठेवलं…

================================

हे देखील वाचा: Aishwerya Rai :  ऐश्वर्याने नकार दिलेल्या चित्रपटामुळे करिष्मा कपूर झाली सुपरस्टार!

=================================

करिश्मा ही कपूर घराण्यातील मोठी मुलगी… त्यामुळे शिक्षण सोडून तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा घेतलेला निर्णय कपूर फॅमेलीसाठी फार महत्वाचा आणि मोठा होता… तिच्या चाहत्यांसोबतच घरच्यांच्याही तिच्याकडून फार अपेक्षा होत्या.. आणि नक्कीच ३४ वर्षांच्या या कारकिर्दित ती प्रत्येकांच्या अपेक्षेला खरी उतरली… खरं तर कपूर घराण्यातील स्त्रियांनी किंवा मुलींनी इंडस्ट्रीत काम करु नये असं घराण्यातील मोठ्या लोकांचं मत होतं असं म्हटलं जातं… पण करिश्मा कपूरने एका मुलाखतीमध्ये हे चुकीचं असून कपूर कुटुंबातील प्रत्येक मुलीला, सुनेला तिचं करिअर निवडण्याची मुभा आहे असं तिने स्पष्टपणे सांगितलं होतं…

वयाच्या १७ व्या वर्षापासून कपूर घराण्याचं अभिन. क्षेत्रातील नाव मोठं करण्याचं काम करिश्मा हिने सुरु केलं होतं ते आजपर्यंत अविरतपणे सुरुच आहे… करिश्माच्या चित्रपटांबद्दल जितकी चर्चा झाली त्यापेक्षा अधिक तिचं पर्सनल लाईफही चर्चेत होतं आणि आजही आहेच.. मग ते अभिषेक बच्चन सोबतचं रिलेशन असो किंवा दिवंगत एक्स नवरा संजय कपूर यांच्यासोबतचा घटस्फोट असो…. लोकांच्या ट्रोलिंगला आणि वैयक्तिक जीवनातील रोलर कोस्टर राईड्सचा सामना करत करिश्माने अजरामर चित्रपट आणि भूमिका दिल्या आहेत…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhishek Bachchan biwi no. 1 Bollywood bollywood classic movies bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Entertainment News hum sath sath hai kappor family kareena kapoor karishma kapoor karishma kapoor birthday karishma kapoor movies latest entertainment news in marathi marathi entertainment news Raj Kapoor raja babu raja hindistani sunjay kapoor
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.