Top 5 OTT Movies: या आठवड्यात ओटीटीवर सर्वाधिक पाहिले गेलेले

Bodybuilder Suhas Khamkar: ‘राजवीर’ मधून बॉडीबिल्डर सुहास खामकरचे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण !
बॉडीबिल्डिंगच्या विश्वात नाव कमावलेले सुप्रसिद्ध भारतीय बॉडीबिल्डर सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर धडक देत आहेत. ‘राजवीर’ या आगामी हिंदी अॅक्शनपटात ते एका तडफदार IPS अधिकाऱ्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा बहुप्रतिक्षित चित्रपट ८ ऑगस्ट २०२५ रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होतो आहे, आणि आतापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सुहास खामकर यांचा पडद्यावरील हा पहिलाच मोठा प्रोजेक्ट असून, त्यांच्या बलदंड शरीरयष्टीला साजेसा, करारी आणि रोषणदिप व्यक्तिमत्त्व लाभलेली भूमिका ‘राजवीर’मध्ये पाहायला मिळणार आहे. नुकताच रिलीज झालेला ट्रेलर पाहता, एक स्पष्ट संदेश मिळतो की हिंदी सिनेसृष्टीला एक नवीन अॅक्शन हिरो मिळालेला आहे.(Bodybuilder Suhas Khamkar)

या चित्रपटाची निर्मिती अर्थ स्टुडिओ यांनी केली असून, सारा मोशन पिक्चर्स, रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स, आणि समृद्धी मोशन पिक्चर्स यांचेही सहनिर्मितीत मोलाचं योगदान आहे. चित्रपटाचे निर्माते साकार प्रकाश राऊत, ध्वनि साकार राऊत, गौरव परदासनी, आणि सूर्यकांत बाजी असून, सहनिर्माती म्हणून रुचिका तोलानी यांचा सहभाग आहे. दिग्दर्शनाची धुरा साकार राऊत आणि स्वप्नील देशमुख यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या कथानकासाठी, पटकथा आणि संवादासाठी साकार राऊत, जेकॉब, पॉल कुरियन, आणि माज खान यांनी लेखन केलं आहे. छायांकनाची जबाबदारी भूषण वेदपाठक यांच्याकडे आहे, तर संगीत दिग्दर्शन अभिनंदन गायकवाड आणि होपून सैकिया यांनी केलं आहे.

चित्रपटात सुहास खामकर यांच्यासोबत झाकीर हुसैन, गौरव परदासनी, प्राशी अवस्थी, आणि धीरज सानप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रत्येक पात्र वेगळं आहे, आणि त्यांचं योगदानही कथानकात महत्त्वाचं आहे. ‘राजवीर’ ही एका निडर आणि प्रामाणिक आयपीएस अधिकाऱ्याची कहाणी आहे, जो अन्यायाविरोधात उभा राहतो.(Bodybuilder Suhas Khamkar)
==============================
==============================
ही कथा केवळ अॅक्शनने भरलेली नाही, तर जबाबदारी, निष्ठा आणि देशप्रेम अशा भावना घेऊन आली आहे. ट्रेलरमध्ये सुहास खामकर यांचा अॅक्शन अवतार आणि संवादफेक पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. ८ ऑगस्टपासून ‘राजवीर‘ प्रेक्षकांच्या न्यायालयात सादर होतो आहे. आता सुहास खामकर एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांना आवडतो का हे आपल्याला तेव्हाच समजेल.