Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Preity Zinta उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच हुशार बिसनेसवूमन आहे ‘डिंपल गर्ल’ प्रीती झिंटा

 Preity Zinta उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच हुशार बिसनेसवूमन आहे ‘डिंपल गर्ल’ प्रीती झिंटा
कलाकृती विशेष

Preity Zinta उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच हुशार बिसनेसवूमन आहे ‘डिंपल गर्ल’ प्रीती झिंटा

by Jyotsna Kulkarni 31/01/2025

आज बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ अशी ओळख असलेली प्रीती झिंटा (Preity Zinta) तिचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रीती झिंटा बॉलिवूडमध्ये एक उत्तम अभिनेत्रीसोबतच बबली गर्ल म्हणून देखील प्रसिद्ध आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारून बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवले. आज प्रीती फारशी चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी तिची लोकप्रियता आणि क्रेझ कायम आहे. प्रीती झिंटाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक माहिती. (Preity Zinta)

३१ जानेवारी १९७५ रोजी हिमाचलमधल्या शिमला येथे प्रीतीचा जन्म झाला. तिचे वडील आर्मी ऑफिसर होते. मात्र खूपच कमी वयात तिने तिच्या आयुष्यातील दोन सर्वात महत्वाच्या लोकांना कायमचे गमावले. प्रीती केवळ १३ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. या अपघातामध्ये तिची आई गंभीर जखमी झाली. तिची आई दोन वर्ष अंथरुणावर होती. खूपच कमी वयात तिच्यावर आणि तिच्या भावांवर घराची आईची जबादारी आली. मात्र हार न मानता तिने तिचे शिक्षण सुरु ठेवले. (Preity Zinta Birthday)

Preity Zinta

प्रीतीने तिचे शालेय शिक्षण शिमल्याच्या कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी स्कूलमधून घेतले. त्यानंतर सेंट बेड कॉलेज शिमला येथून पुढील शिक्षण घेतले. ती अभ्यासात नेहमीच हुशार होती. तिने इंग्रजी ऑनर्समध्ये पदवी आणि क्रिमिनल सायकॉलॉजीत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. प्रीतीला अभ्यास खूपच आवडायचा. तिने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केल्यानंतरही तिने शिक्षण घेत होती. चित्रपटाच्या शुटिंगमधून सुट्ट्या घेऊन प्रितीने परीक्षा दिल्या आणि तिने तिचे शिक्षण पूर्ण केले. आज प्रीती बॉलिवूडमधील सर्वात शिक्षित अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Bollywood Tadka)

शिमला मध्ये प्रीतीचे आयुष्य सुरळीत चालू होते. अभिनयात येण्याचा तिचा दूर दूरपर्यंत विचार नव्हता. अशातच ती १९९६ मध्ये एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत, प्रीतीची एका दिग्दर्शकासोबत भेट झाली. त्याने तिला चॉकलेटच्या जाहिरातीमध्ये काम करण्यासाठी विचारले आणि तिने होकार दिला. यानंतर प्रीतीने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. येथून तिला अभिनयात रस निर्माण झाला आणि तिने मुंबई गाठत चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. (Ankahi Baatein)

मुंबईत एका ऑडिशनदरम्यान दिग्दर्शक शेखर कपूर यांनी तिला पाहिले आणि तिला अभिनेत्री होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिला ‘तारा रम पम’ या चित्रपटाची ऑफर आली, ज्यामध्ये ती हृतिक रोशनसोबत काम करणार होती, पण काही कारणास्तव हा चित्रपट रखडला. यानंतर प्रीतीने कुंदन शाह यांच्या चित्रपटात काम केले, मात्र हा चित्रपटही दोन वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आला. दरम्यान, तिला ‘दिल से’ या चित्रपटाची ऑफर आली आणि तिने तो केला. हा तिचा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट ठरला. यात ती शाहरुख खान आणि मनीषा कोईराला यांच्यासोबत सहाय्यक भूमिकेत दिसली होती.(Entertainment mix masala)

Preity Zinta

पुढे १९९८ मध्ये प्रीतीने ‘सोल्जर’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिने प्रथमच मुख्य भूमिकेत काम केले आणि डेब्यू फिमेलचा फिल्मफेअर पुरस्कारही जिंकला. या सान्म्त ती बॉबी देओलसोबत दिसली. सिनेमा खूपच हिट झाला आणि प्रीती देखील गाजली. यानंतर तिने अजिबात मागे वळून पाहिले नाही. तिने यानंतर तिने ‘क्या कहना’, ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘मिशन कश्मीर’, ‘फर्ज’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘दिल चाहता है’, ‘अरमान’, ‘वीर जारा’, ‘सलाम नमस्ते’, ‘कभी अलविदा ना कहना’ यासह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. (Bollywood Masala)

प्रीती झिंटाने हिंदीच नव्हे तर अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘प्रेमंते इदेरा’ आणि ‘राजा कुमारुडू’ सारख्या तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. याशिवाय तिने ‘हेवन ऑन अर्थ’ नावाच्या कॅनेडियन चित्रपटातही काम केले आहे. प्रीती नेहमीच बॉलिवूडमधील चर्चित अभिनेत्री म्हणून ओळखली गेली. मात्र यासोबतच प्रीतीची बॉलिवूडमध्ये अजून एक ओळख म्हणजे निडर अभिनेत्री. प्रितीने थेट अंडरवर्ल्ड डॉन विरोधात साक्ष दिली होती. याचा एक किस्सा खूपच प्रसिद्ध आहे. (Social News)

Preity Zinta

अब्बास मस्तान दिग्दर्शित ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटाचे निर्माते भरत शाह आणि नाझिम रिझवी होते, पण या चित्रपटात अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलने पैसे गुंतवले होते. या चित्रपटात सलमान खान आणि राणी मुखर्जी सारखे कलाकार होते पण साक्ष देण्याची वेळ आली तेव्हा फक्त प्रीतीनेच धाडस दाखवले. या प्रकरणात शाहरुख खान, सलमान खानपासून महेश मांजरेकरपर्यंत सर्वांनी साक्ष देण्यास नकार दिला होता.

प्रीतीने न्यायालयात जाऊन छोटा शकीलविरोधात साक्ष दिली होती. प्रितीला सतत धमकीचे फोन येत होते. हे प्रकरण अंडरवर्ल्डशी संबंधित असल्याने प्रीतीचा व्हिडीओग्राफीद्वारे जबाब नोंदवण्यात आला. प्रितीच्या या धाडसाने बॉलिवूड थक्क झाले. प्रिती झिंटाने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ‘धमक्यांनंतर मी खूप घाबरले होते. मी +92 पासून सुरू होणाऱ्या कोणत्याही कॉलला उत्तर दिले नाही. लालकृष्ण अडवाणीजींनी माझ्याशी बोलून सुरक्षा घेण्यास सांगितले होते, पण मी नकार दिला होता. मात्र, सेटवर साध्या वेशातील काही पोलिस होते.” (Preity Zinta Personal Life)

प्रीतीचे व्यावसायिक आयुष्य यशस्वी ठरत असताना तिचे वैयक्तिक आयुष्य देखील खूपच गाजले. तिचे तिच्या करियरमध्ये अनेकांसोबत नाव जोडले गेले. बिझनेसमन नेस वाडियासोबत तिचे नाते चर्चेत होते. दोघांनी मिळून आयपीएलची टीमही विकत घेतली पण हे नातं काही जमलं नाही आणि जवळपास ५ वर्षाचे हे नाते कटुतेनं संपुष्टात आले.

Preity Zinta

प्रीती झिंटा इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघ पंजाब किंग्सची सह-मालकीण आहे. तिने आयपीएलमध्ये संघ खरेदी केला आणि ती स्पोर्ट्स टीमची मालकीण बनली. तिने २००८ मध्ये हा संघ विकत घेतला आणि २००९ पर्यंत आयपीएल संघाची एकमेव महिला ओनर राहिली. याशिवाय ती आयपीएल संघाची सर्वात तरुण मालक बनली आहे.

प्रिती झिंटा आज चित्रपटांपासून दूर असली तरी ती करोडोंची कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रिती झिंटाची एकूण संपत्ती १५ मिलियन डॉलर्स म्हणजेच ११० कोटी रुपये आहे. अभिनेत्री असण्यासोबतच प्रिती एक यशस्वी बिझनेसवुमन देखील आहे. याशिवाय तिने ऋषिकेशच्या अनाथाश्रमातील ३४ मुलींनाही दत्तक घेतले आहे. प्रितीने २०१६ मध्ये परदेशी बॉयफ्रेंड जेन गुडनाइफशी लग्न केले.

Preity Zinta

प्रीती झिंटा अमेरिकेत सहलीसाठी गेली होती तेव्हा तीची भेट जीन गुडइनफसोबत झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत काही क्षण घालवले. काही दिवसांनी या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले . २०१५ मध्ये आयपीएल फायनलच्या वेळीही तो प्रितीसोबत दिसला होता, त्यानंतर दोघेही अमेरिकेला गेले, त्यामुळे त्यांच्या प्रेमाबद्दल कोणालाच माहिती नव्हती. यानंतर जेव्हा प्रेम फुलले आणि त्यांनी लग्न केले.

======

हे देखील वाचा : Ramesh Deo मराठी मनोरंजनविश्वातील राजबिंडा ‘खलनायक’ रमेश देव

======

२०१६ मध्ये प्रीती झिंटाने तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान अमेरिकन नागरिक जीन गुडइनफशी लग्न केले. २९ फेब्रुवारी रोजी या कपलने लॉस एंजिलिसमध्ये एका खासगी समारंभात सप्तपदी घेतल्या. प्रीती आणि जीनच्या लग्नाचे फोटो लग्नाच्या ६ महिन्यांनंतर समोर आले होते. २०२१ मध्ये प्रीतीने सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. मुलांच्या जन्माची बातमी स्वतः प्रीतीने सोशल मीडियावर शेअर केली होती.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured hindi Preity Zinta Preity Zinta facts Preity Zinta information Preity Zinta journey Preity Zinta life Preity Zinta lovelife Preity Zinta personal life Preity Zinta unknown facts Preity Zinta's Birthday प्रीती झिंटा प्रीती झिंटा अभिनय प्रवास प्रीती झिंटा माहिती प्रीती झिंटा लग्न प्रीती झिंटा वाढदिवस प्रीती झिंटा वैयक्तिक आयुष्य प्रीती झिंटा व्यावसायिक आयुष्य
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.