
Kesari 2 : मराठीसह हिंदीतील या आठवड्यात रिलीज होणारे चित्रपट!
एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात धमाकेदार चित्रपट रिलीज होणार आहेत. अक्षय कुमार याच्या स्काय फोर्स या देशभक्तीपर चित्रपटाने वर्षाती सुरुवात झाली होती. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटानंतर आता अक्षय कुमार आणखी एका सत्य घटनेवर आधारित चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात थिएटरसोबतच ओटीटीवर कोणत्या हिंदी आणि मराठी कलाकृती रिलीज होणार जाणून घेऊयात…
केसरी चॅप्टर २
या यादीत पहिलं नाव येतं ते अक्षय कुमारच्या ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटाचं. जालीयनवाला बाग हत्याकांडाचं सत्य समोर आणणाऱ्या वकिलाची भूमिका या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) करणार आहे. त्याच्यासोबत चित्रपटात आर माधवन आणि अनन्या पांडे देखील प्रमुख भूमिकेत दिणार आहेत. ‘केसरी चॅप्टर २’ मध्ये अक्षय सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारणार असून ते वकिल आणि स्वातंत्र्यसेनानी होते. १९१९ साली जालीयनवाला बाग येथे झालेल्या सत्य आणि क्रुर घटनेवर चित्रपटाचं कथानक आधारित आहे. (Kesari chapter 2)

खौफ
रजत कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘खौफ’ ही वेब सीरीज १८ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या हॉरर सीरीजची कथा एका हॉस्टेलमधील बंद खोलीत घडणाऱ्या violence वर आधारित आहे. प्राईम व्हिडिओवर रिलीज होणाऱ्या या वेब सीरीजमध्ये सुची मल्होत्रा, रिया शुक्ला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Khauf horror web series)

लॉगआऊट
अभिनेते ‘इरफान खान’ (Irfan Khan) यांचा मुलगा बाबील खान (Babil Khan) याला आजवर चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमवण्याची संधी न मिळाल्यामुळे ओटीटीवर तो आपलं कौशल्य दाखवताना दिसत आहे. त्याचा ‘लॉगआऊट’ (Logout) हा चित्रपट १८ एप्रिलला झी ५ या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. दोन सोशल मिडिया इन्फ्लुएनसर मुलांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. पण अचानक एकेदिवशी या इन्फ्लुएनसर मुलाचा फोन हरवतो आणि काय घडतं हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल.(Bollywood movie)

सुशीला सुजीत
प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित ‘सुशीला सुजीत’ हा चित्रपट १८ एप्रिलला प्रदर्शित होणार असून यात स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. घराच्या एका खोलीत अडकलेल्या या दोघांच्या मदतीला कुणी येऊ शकेल का? आणि मुळात घरातच ते कसे अडकले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार आहेत. (Susheela Sujeet marathi movie)

===========
हे देखील वाचा : Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय
===========
संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट १८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून देहरूपाने संपले तरी कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या मुक्ताबाईंच्या कार्य आणि विचारांना जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी मुक्ताईने निभावलेल्या माता ,भगिनी, गुरु अशा विविध भूमिकांचे पदर ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’उलगडणार आहेत. स्त्री-पुरुष भेदापलीकडे जगणे शिकविणाऱ्या संत मुक्ताईंचा खडतर आणि भक्तीरसानं परिपूर्ण जीवनप्रवास आजच्या पिढीला ज्ञात व्हावा यासाठी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा वेगळा प्रयत्न केला गेला आहे. (Sant Dnyaneshwaranchi Muktai)
