Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Rekha To Rani Mukherjee : बॉलीवूडचे ‘हे’ कलाकार इन्स्टाग्रामपासून आहेत लांब
कुठलाही मनात विचार आला किंवा आजूबाजूला काहीही पाहिलं की आधी ते सोशल मिडियावर टाकायची सगळ्यांची धावपळ असते… अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच इन्स्टाग्रामचं भलतंच वेड आहे… बरं आपलं इन्स्टावर अकाऊंट असल्यामुळे आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय सुरु आहे हे देखील एका क्लिकवर आपल्याला समजतं… पण तुम्हाला माहित आहेत का आजही काही बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटी आहेत जे इन्स्टाग्रामचा वापर करत नाहीत.. कोण आहेत ते जाणून घेऊयात… (Bollywood News)

खरं तर, एखादा सेलिब्रिटी आजच्या घडीला सोशल मिडियावर नाही हे ऐकूण खरं तर सगळ्यांनाच धक्का बसेल… कारण, आपल्या चाहत्यांशी कनेक्ट करणारं इन्स्टाग्राम हे फार महत्वाचं माध्यम बनलं आहे… परंतु, काही कलाकार सोशल मिडियापासून आपल्या कुटुंबाला, मुलांना आणि स्वत:ला देखील दूर ठेवण्यास पसंती देतात… (Entertainment news)
१. रेखा
बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे रेखा…. आज वयाची सत्तरी गाठली असूनही रेखा यांचं सौंदर्य आजही तितकंच लोकांना वेडं करतं… पण तुम्हाला माहित आहे का रेखा सोशल मिडियाचा वापर करत नाहीत… जरी आज कोणत्याही सोशल गॅदरिंग्समध्ये नवोदित अभिनेत्रींपेक्षा कॅमेऱ्याची लेन्स रेखा यांच्याच शोधात असली तरी रेखा मात्र आपलं वैयक्तिक जीवन सगळ्यांपासून लांबच ठेवताना दिसतात… (Rekha)

२. सैफ अली खान
एकीकडे करिना कपूर खान सोशल मिडिया क्वीन म्हणून ओळखली जाते, तर दुसरीकडे तिचा नवरा अर्थात अभिनेता सैफ अली खान इन्स्टापासून दूर आहे… आपलं वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवावं या मताचा तो असून त्याचा सोशल मीडियावर प्रेझेन्स नाही आहे… (Saif Ali Khan)

३. रणबीर कपूर
या यादीत अभिनेता रणबीर कपूर याच्या नावाचाही समावेश असून त्याच्या नावाचं अधिकृत कुठलंच सोशल मिडिया अकाऊंट नाही आहे… मात्र, फेक नावाने तो इन्स्टाग्रामवर असून त्याचं जगात काय सुरु आहे यावर लक्ष असल्याचं त्याने त्याच्या काही मुलाखतींमध्ये सांगितलं आहे… (Ranbir Kapoor)

४. आमिर खान
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा देखील सोशल मिडियापासून लांब आहे… अर्थात त्याचे काही फॅन पेज आहेत; परंतु, त्याचं ऑफिशिअल अकाऊंड नाही आहे… (Aamir Khan)

५. राणी मुखर्जी
नुकत्याच राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणारी ९०च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री राणी मुखर्जी देखील इन्स्टाग्रामवर नाही आहे… इतकंच नाही तर तिच्या आणि आदित्य चोप्राच्या लग्नाचा एकही फोटो कुठेच उपलब्ध नाही आहे… (Rani Mukherjee)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
================================
हे देखील वाचा : V. Shantaram यांनी नाव दिलं आणि बॉलिवूडचा ‘हा’ सुपरस्टार घडला
================================