
Bollywood Celebs : गांधीजींनी वास्तव्य केलेल्या घरात राहतो अक्षय कुमार?
कोणता नवीन चित्रपट येतोय किंवा कोणती नवी वेब सीरीज येतेय यापेक्षा आपल्या लाडक्या कलाकारांच्या वैयक्तिक जीवनात काय सुरु आहे? किंवा त्यांचं घर कुठे असेल? कसं असेल? यात लोकांना अधिक रस असतो. आज जाणून घेऊयात सलमान खान ते अक्षय कुमार ज्या घरात राहतात त्या घराचा इतिहास…. (Bollywood Celebs )
सलमान खान (Salman Khan) ज्याची करोडोंची संपत्ती असली तरी आजही तो बांद्राच्या १ बीएचके गॅलेक्सी अपार्टमेन्टमध्ये कसा राहतो? असा प्रश्न नक्कीच त्याच्या चाहत्यांना पडत असेल यात शंका नाही. पण तुम्हाला माहित आहे का सलमान खान फॅमिली मॅन आहे. आजही तो आपल्या कुटुंबासोबतच राहणं पसंत करतो. याबद्दल त्याने अनेक इंटरव्ह्यूमध्ये देखील भाष्य केलं आहे. सलमान खान आज ज्या गॅलेक्सी घरात राहतो ते घर त्याचे वडिल सलीम खान यांनी विकत घेतले होते. जिथे त्याचं संपूर्ण बालपण गेलं ते घर आज वयाची पन्नाशी ओलांडली तरी त्याला सोडवलं का नाही? तर याचं कारण असं की एकदा सलमानच्या वडलांनी त्याला सांगितलं होतं की गॅलेक्सी हे शेवटचं घर आहे जिथे मी इनवेस्ट करतोय. त्यामुळे या घराशी जितकं सलीम खान यांना आत्मियता आहे तितकीच सलमानला देखील आहे. (Bollywood Celebs)

आता वळूयात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या घराकडे. अमिताभ बच्चन जुहू येथे जलसा बंगल्यात राहतात. पण तुम्हाला माहित आहे का हे घर बिग बी यांना दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी भेट म्हणून दिलं होतं. सत्ते पे सत्ता हा चित्रपट हिट झाल्यानंतर रमेश सिप्पी यांनी जलसा बंगला अमिताभ बच्चन यांना गिफ्ट दिला होता. पण जलसामध्ये शिफ्ट होण्यापूर्वी अमिताभ बच्चन प्रतिक्षा बंगल्यात राहात होते जो बंगला त्यांचे वडिल हरिवंशराय बच्चन यांनी बांधला होता. या बंगल्यात केवळ अमिताभ बच्चन यांचेच बालपण नव्हे तर अभिषेक बच्चनही तिथेच लहानाचा मोठा झाला आहे. आणि याच भावनिक कनेक्शनमुळे अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्नही त्याच बंगल्यात (Bollywood Celebs) झालं होतं.

एकेकाळी खिशात केवळ १५०० रुपये घेऊन आलेला दिल्लीचा मुलगा संपूर्ण बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत आहे. हो बरोबर ओळखलं किंग खान अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan). १५ कोटींना शाहरुखने मन्नत विकत घेतला होता आणि जगभरातून त्याचे चाहते त्याचा बंगला आणि शाहरुखची एक झलक दिसावी म्हणून मुंबईत येतात. तुम्हाला माहित आहे का १९९७ साली येस बॉस हा शाहरुखचा चित्रपट आला होता ज्यात चांद तारे तोड लाऊ या गाण्याचे शुटींग मन्नत या त्याच्या आत्ताच्या घरासमोरच झालं होतं. मन्नतचं पूर्वीचं नाव होतं Villa Vienna. १९९७ ला ज्या बंगल्यासमोर शुट केलं जो बंगला ४ वर्षांनी खरेदी करुन शाहरुखने इतिहास रचला. पण ज्या घरात तो राहतो त्यालाही एक ऐतिहासिक महत्व आहे. १९१४ साली एका पारसी कुटुंबाने तो बंगला बांधला होता. १९९० सालापर्यंत एका रिअल इस्टेटने तो बंगला विकत घेतला. पण त्यानंतर बंगल्याची फारच दुरावस्था झाली. परंतु, गौरी खानने ते घर इतकं सुंदर सजवलं की आता शाहरुख आणि त्याचं कुटुंब पृथ्वीवरील जन्नत असलेल्या मन्नतमध्ये राहतात.

आता येऊयात सिधे साधे अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) घराकडे. तर झालं असं की जेव्हा अक्षय कुमार चित्रपटसृष्टीत स्ट्रगल करत होता तेव्हा तो जुहूला जाऊन फोटो शुट करत असे. एकदा शुटला जुहूला अक्षय गेला असता त्याने तिथे एक बंगला पाहिला. तिथे त्याने फोटो शुट करायला सुरुवात केली आणि काही वेळाने बंगल्याच्या वॉचमनने त्याला तिथून हाकलून दिलं. अक्षयने तो क्षण लक्षात ठेवला आणि ३२ वर्षांनी तोच बंगला विकत घेत तिथे आलिशान घर उभे केलं.

अक्षय कुमारने जे घर खरेदी केलं होतं त्या घराचं आणि महात्मा गांधीजींचं एक कनेक्शन होतं. ते घर सोमती मोरारजी या महिलेचं होतं ज्या एक स्वातंत्र्यसेनानी आणि महात्मा गांधीजींच्या मैत्रिण होत्या. इतकंच नव्हे तर बऱ्याचवेळा गांधीजींनी त्या घरात वास्तव्य केलं होतं. त्यामुळे जिथे एकेकाळी गांधीजी राहून गेले आहेत तिथे आज अक्षय कुटुंबासह राहात आहे.
==================
हे देखील वाचा :Amitabh Bachchan : ‘कभी-कभी’ चित्रपटाला ४९ वर्ष पुर्ण; वाचा खास किस्सा
==================
शाहजान याने त्याची बेगम मुमताज हिच्यासाठी ताजमहाल बांधला होता अगदी त्याचप्रमाणे पतौडी पॅलेस सैफ अली खानचे (Saif Ali Khan) आजोबा इफ्तिखार अली खान यांनी त्यांच्या पत्नी साजीदा सुलतानसाठी बांधला होता. १९३५ मध्ये पतौडी पॅलेज बांधण्यात आला होता. या पॅलेसचं डिझाईन त्याकाळचे सुप्रसिद्ध आर्किटेक्चर रॉबर्ट टॉर यांनी केले होते. आजही हा पॅलेस शानदार दिसतो. या पॅलेसमध्ये अॅनिमल, मेरे ब्रदर की दुल्हन, वीर झारा अशा अनेक चित्रपटांचं शुट झालं आहे.

रसिका शिंदे-पॉल