Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ambat Shaukin Marathi Movie : गौतमी पाटीलच्या घायाळ अदांची प्रेक्षकांना

Manache Shlok Marathi Movie: मृण्मयी देशपांडे झळकणार सहा हिरोंसोबत एका फ्रेममध्ये? ‘मना’चे

Ye Re Ye Re Paisa 3 Poster Launch: अण्णा, आदित्य, बबली

Vadalvaat मालिकेच्या शीर्षक गीताची अनटोल्ड स्टोरी!

Karz movie : ऋषी कपूर-टीना मुनीमचा म्युझिकल हिट ’कर्ज’!

Gulkand ची १ महिन्यानंतरही थिएटरमध्ये जादू; जाणून घ्या बॉक्स ऑफिस

Squid Game 3: पुन्हा फासे पलटणार; येणार नवा ट्विस्ट!

Aamir Khan : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ बॉलिवूडमधून एक्झिट घेणार?

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केला समित कक्कड  दिग्दर्शित ‘रानटी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

 बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केला समित कक्कड  दिग्दर्शित ‘रानटी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
Ranati Marathi Movie Trailer
मिक्स मसाला

बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केला समित कक्कड  दिग्दर्शित ‘रानटी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

by रसिका शिंदे-पॉल 14/11/2024

नावीन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक समित कक्कड  मराठी सिनेसृष्टीत रानटी  धडाकेबाज अॅक्शनपट घेऊन येतायेत. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट असणार आहे. अॅक्शनचे बादशहा असणारे प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित केला आहे. (Ranati Marathi Movie Trailer)

Ranati Marathi Movie Trailer
Ranati Marathi Movie Trailer

माणसात दोन शक्ती कार्यरत असतात. एक त्याला वाईट आणि अयोग्य गोष्टींकडे आकर्षित करते तर दुसरी त्या बाबतीत नकारघंटा वाजवून चांगल्याकडे खेचू पाहते.पण जेव्हा माणसातील रानटी शक्ती इतकी प्रबळ होते की माणसातील चांगले गुण नाहीसे होत थैमान घालणारी माणसं दिसू लागतात. याच थैमान शक्तीला आवरण्यासाठी  काही जणांना रानटी व्हावे लागते. आजूबाजूची परिस्थिती त्यांना तसं बनवत असेल कदाचित त्यामुळेच काही रानटी असतात तर काही बनतात… असाच रानटीपणा घेऊन  या दशकातील  सर्वात मोठा ‘अँग्री यंग मॅन’ दिग्दर्शक समित कक्कड २२ नोव्हेंबरला आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. दमदार व्यक्तिरेखा, अॅक्शन, इमोशन्स, सूडनाट्य असा जबरदस्त मसाला असलेला हा धमाकेदार चित्रपट असल्याचे दिग्दर्शक समित कक्कड सांगतात.

Ranati Marathi Movie Trailer
Ranati Marathi Movie Trailer

भगवान विष्णूंचा सर्वात उग्र अवतार म्हणून नरसिंह अवतार ओळखला जातो. पातळपूरातील अशाच अधर्मी वृत्तीचा नाश  करण्यासाठी विष्णु येतोय. याच विष्णूचा दमदार अवतार ट्रेलर मध्ये पहायला मिळतोय. पिळदार शरीरयष्टी, वाघासारखी नजर, चित्यासारखा वेग लाभलेलं भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेले अभिनेते शरद केळकर ‘रानटी’ मध्ये शीर्षक भूमिकेत आहे. ‘रानटी’ च्या पोस्टर, टीझर, ट्रेलर मधून शरद यांचं ‘अँग्री यंग मॅन’ रूपच समोर आलं आहे. स्वत:चं अस्तित्व सिद्ध करताना कुटुंब आणि प्रेमावर घाला घालणाऱ्या खलनायकाला धोबीपछाड देणारा डॅशिंग विष्णूला रुपेरी पडद्यावर पहाणं ही प्रेक्षकांसाठी जणू एक मेजवानीच ठरणार आहे.(Ranati Marathi Movie Trailer)

================================

हे देखील वाचा: सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

================================

अखेरच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यासाठी विष्णूचा ‘रानटी’ अवतार सज्ज झाला आहे. प्रसिध्द अभिनेता शरद केळकर यांच्यासोबत संजय नार्वेकर, संतोष जुवेकर, नागेश भोसले, जयवंत वाडकर, संजय खापरे, छाया कदम, अक्षया गुरव, कैलास वाघमारे, माधव  देवचक्के, सुशांत शेलार, हितेश भोजराज, सानवी श्रीवास्तव,नयना मुखे अशी तगडी स्टारकास्ट ‘रानटी’ चित्रपटात आहे.‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम ह्या चित्रपटाला लाभलेली आहे.२२ नोव्हेंबरला ‘रानटी’ आपल्या नजीकच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Celebrity Entertainment Marathi Movie rohit shetty samit kakkad Santosh Juvekar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.