‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Vinod Khanna : बॉलिवूडच्या देखणाऱ्या हिरोची ‘ही’ शेवटची इच्छा अपूर्णच राहिली!
हटके ड्रेसिंग स्टाईल आणि तडफदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांची आज Birth Anniversary… बॉलिवूडचा देखणा नट अशी त्यांची खरंतर ओळख…. ६०-७०च्या दशकात एकाहून एक दर्जदार चित्रपट विनोद खन्ना (Vinod Khanna) यांना इंडस्ट्रीला दिले आणि आपलं एक वलय निर्माण केलं… प्रेक्षकांच्या प्रत्येक इच्छा आपल्या अभिनयातून पुर्ण करणाऱ्या विनोद खन्ना यांची मात्र शेवटची इच्छा अपूर्ण राहिली होती… कोणती होती ती इच्छा जाणून घेऊयात…. (Entertainment News)

विनोद खन्ना यांचा जन्म पाकिस्तानातील पेशावर येथे झाला होता… जिथे त्यांचं बालपण गेलं त्या वडिवोपार्जित घराचं शेवटचं दर्शन व्हावं ही विनोद खन्ना यांची शेवटची इच्छा होती… परंतु, त्यांना ते घर काही पाहता आलंच नाही… कालांतराने सुपरस्टार झालेल्या विनोद खन्ना यांचं नाव मात्र स्ट्रगलिंग कलाकारांमध्ये घेतलं जातं… विनोद खन्नांनी नायक नाही तर खलनायक बनून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर नायक बनून मोठ्या पडद्यावर बरीच वर्ष राज्य केलं..(Vinod Khanna movies)

विनोद खन्ना यांच्या लहानपणी त्यांना शाळेत त्यांच्या शिक्षिकेने नाटकात काम दिले आणि तिथूनच त्यांच्यामध्ये अभिनयाची रुची निर्माण झाली.. बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत असताना त्यांनी ‘सोलवां साल’ आणि ‘मुगल-ए-आजम’ असे कल्ट क्लासिक चित्रपट पाहिले आणि त्यांनी नायक व्हायचं असं मनाशी पक्कं केलं… मुंबईत आल्यानंतर एका पार्टीत त्यांना अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक सुनील दत्त भेटले… तेव्हा दत्त आपल्या ‘मन का मीत’ या चित्रपटासाठी नवीन चेह-यांचा शोध घेत होते. त्यांनी विनोद यांना चित्रपटात सह-अभिनेता म्हणून काम करण्याची ऑफर दिली… तो चित्रपट फारसा चालला नाही, पण विनोद यांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री यानिमित्ताने झाली….(Vinod Khanna birth anniversary)
================================
हे देखील वाचा : Vinod Khanna : जेव्हा अमिताभ बच्चन यांचं यश विनोद खन्ना यांच्या डोळ्यांत खुपत होतं….
=================================
सुनील दत्त (Sunil Dutt) यांनी विनोद खन्ना यांना चित्रपटात भूमिका दिली खरी; मात्र याविषयी जेव्हा विनोद यांच्या वडिलांना माहित झाले तेव्हा त्यांनी विनोद यांना बंदूकीचा धाक दाखवला आणि त्यांनी सांगितले की, “तू चित्रपटात काम केलंस तर मी तुला गोळी मारेन. मात्र, विनोद यांच्या आईने वडिलांना समजावले आणि दोन वर्षांची मुदत मागितली… वडिलांनी सांगितले, की दोन वर्षांत काहीच करू शकला नाही तर फॅमिली बिझनेस सांभाळायचा… परंतु, मागे वळण्याची वेळ विनोद खन्ना यांच्यावर आलीच नाही… ‘अमर अकबर अॅंथनी’, ‘परवरीश’, ‘रखवाला’, ‘द बर्निंग ट्रेन’, ‘बटवारा’, ‘इन्साफ’, ‘मस्ताना’, ‘इन्कार’, ‘मेरे अपने’, ‘सिकंदर’ अशा १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये कामं केली…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi