Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Bollywood : बॉलीवूडमधील पहिली सुपरहिट मेडली कशी बनली?
संगीतकार आर ड बर्मन यांच्या अनेक चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. इतके की त्यांच्या चित्रपटांना क्वचितच आर डी शिवाय दुसरा कुणी संगीतकार असायचा. यापैकीच एक होते नासिर हुसेन. आजच्या पिढीतील सुपरस्टार आमिर खान यांचे काका म्हणजे नासिर हुसेन हि ओळख सांगितली की लगेच लक्षात येईल. त्यांच्या ‘तिसरी मंजिल’ (१९६७) या चित्रपटापासून आर डी बर्मन यांच्यासोबत त्यांचे मस्त ट्युनिंग जमले होते. हा सिनेमा बेफाम होता. म्युझिकल हिट होता. याचे दिग्दर्शन गोल्डी विजय आनंदने केले होते. यानंतर ‘बहारों के सपने’(१९६८), प्यार का मौसम (१९६९), कांरवा (१९७१), यादों की बारात (१९७३), हम किसी से कम नही(१९७७), जमाने को दिखाना है (१९८१) जबरदस्त (१९८५) हे सर्वच सिनेमे आर डी यांच्या संगीतात न्हाऊन निघाले होते. (Bollywood tadaka)

‘यादों की बारात’ हा चित्रपट निर्माण होत असताना नासिर हुसेन लंडनला गेले होते. तिथे एका डिस्को थेकमध्ये त्यांनी असे दृश्य पाहिले की एक गायक येतो गाणे गाऊन जातो आणि लगेच दुसरा येतो त्या पाठोपाठ तिसरा आणि चौथा असे चार गाण्याची एक मेडली तयार होते. शेवटी चौघे पुन्हा स्टेजवर येऊन एकत्र जाऊ लागतात. एक वेगळाच कम्बाईन म्युझिकल इफेक्ट तिथे पाहायला मिळायला. हा पॅटर्न त्यांना खूप आवडला. त्यांनी भारतात आल्यानंतर आर डी बर्मन यांना याबद्दल सांगितले. हा फॉरमेट आपल्या सिनेमात वापरायचे ठरवले. याला मेडली म्हणत. याचा पहिला प्रयोग त्यांनी ‘यादो की बारात’ या चित्रपटात केला होता. ‘आपके कमरे में कोई रहता है ‘ या किशोर –आशा च्या या गाण्याला जोडूनच ‘दिल मिल गये हम खिल गये…’ हे गाणं घेतलं होतं. हा प्रयोग प्रेक्षकांना देखील खूप आवडला. (Untold stories of bollywood)

पण आर डी बर्मन यांनी हाच प्रयोग ‘हम किसीसे कम नही’ (१९७७) या चित्रपटात पुन्हा एकदा करायचे ठरवले. त्यासाठी सचिन भौमिक यांच्याकडून व्यवस्थित स्क्रिप्ट लिहून घेतले गेले. ‘हम किसीसे कम नही’ या चित्रपटात ऋषी कपूर, काजल किरण आणि तारीक खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या तिघांना घेऊनच एक मेडली बनवायचे ठरवले. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी त्याला अनुसरून गाणी लिहिली आणि भारतीय सिनेमातील सर्वोत्कृष्ट मेडली पहिल्यांदा ‘हम किसीसे कम नही’ या चित्रपटात पाहायला मिळाली. मोहम्मद रफी, किशोर कुमार, आशा भोसले आणि स्वतः आर डी बर्मन यांनी या मेडलीतील गाणी गायली. (bollywood medley songs)
पहिले गाणे होते ‘चांद मेरा दिल चांदनी हो तुम चांद से भी दूर चांदनी कहां’ यानंतर किशोर कुमारच्या स्वरातील ’आ दिल क्या महफिल ही तेरे कदमो में’ हे गाणे होते. या नंतर पंचम स्वरात ‘तुम क्या जानो मोहब्बत क्या है दिल की महफिल नही ये महफिल सनम….’ हे फडकते गाणे होते आणि शेवटी किशोर कुमार आशा भोसले यांच्या आवाजातील गाणे होते ‘मिल गया हमको साथी मिल गया जल गया हमसे गर कोई जल गया..’ हि चारही गाणे जबरदस्त झाली होती. (Bollywood news)
=============
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=============
त्या काळात आर्केस्ट्रामध्ये कॉलेजच्या कल्चरल फंक्शनमध्ये या मेडलीचा बोलबाला होता. ‘ हम किसीसे कम नही’ हा चित्रपट सुपर डुपर म्युझिकल हिट सिनेमा होता. यातील रफीच्या ‘क्या हुआ तेरा वादा वो कसं वो इरादा‘ या गाण्याने प्रचंड यश मिळवलं होतं. बिनाका गीतमालातील सर्वोच्च स्थानावरचे त्या वर्षातील गाणं होतं. या चित्रपटात एक कव्वाली देखील होती.(है अगर दुश्मन दुश्मन..) एक कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज असं या चित्रपटाचं वर्णन करावं लागेल. ऋषी कपूर तारीक खानला म्हणाला होता खरंतर यातली तुझ्यावर चित्रित गाणी ही जास्त मेलडी अस आहेत. (Bollywood songs)