Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Gharoghari Matichya Chuli Serial: पात्र एक, रुपं अनेक…घरोघरी मातीच्या चुली मालिकेत

टॉम क्रुझच्या Mission Impossible : The Final Reckoning चित्रपटाची भारतात

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Re-Release 2025 : जुनं ते सोनं; Re-release trend का होतोय व्हायरल?

 Re-Release 2025 : जुनं ते सोनं; Re-release trend का होतोय व्हायरल?
कलाकृती विशेष

Re-Release 2025 : जुनं ते सोनं; Re-release trend का होतोय व्हायरल?

by रसिका शिंदे-पॉल 06/03/2025

Nostalgia… हा शब्द अनेक आठवणींना उजाळा देतो. मग तो मित्रांसोबत बसून टाईमपास करणारा असो किंवा मग शाळा-कॉलेजमध्ये खात असणारा एखादा पदार्थ असो किंवा मग चित्रपट असो. ९०च्या दशकातील मुलांना ‘हेरा फेरी’, ‘वेलकम’ किंवा ‘भूत’ असे क्लासिक चित्रपट परत यावे किंवा तेच पुन्हा पाहता यावे यासाठी सध्या बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या रि-रिलीजचा ट्रेण्ड आलाय. आत्तापर्यंत ‘रॉकस्टार’’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘तुंबाड’, ‘सनम तेरा कसम’ या चित्रपटांनी रि-रिलीजच्या लाटेत जुन्या सोबत नव्या प्रेक्षकांचा त्यातही यंग जनरेशनचा तुफान प्रतिसाद मिळवला. शिवाय, पुन्हा प्रदर्शित केल्यानंतर आधीपेक्षा आता बक्कळ बॉक्स ऑफिस कलेक्शनही केलंय. जाणून घेऊयात रि-रिलीजच्या या ट्रेण्डबद्दल…(Classic films re-release trend)

रि-रिलीजचा अट्टरहास का?

९० किंवा २००० च्या दशकात गाजलेले हिंदी चित्रपट पुन्हा प्रदर्शित करणं ही एक महत्वाची स्ट्रेटेजी आहे. यातील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे Nostalgia. कारण, ‘चुप चुपके’ किंवा ‘रहना है तेरे दिल मैं’ यासारखे तंगड्या स्टारकास्ट आणि कथानकाचे चित्रपट प्रेक्षकांना परत का पाहावेसे वाटणार नाहीत? शिवाय आत्ताच्या युवा पिढीने केवळ त्यांच्या पालकांकडून ऐकलेले किंवा रिल्समध्ये पाहिलेले चित्रपट पाहण्याची त्यांना संधी मिळाली तर हिंदी चित्रपटसृष्टीत असेही दर्जेदार चित्रपट तयार होत होते यावर त्यांचा विश्वासही नक्कीच बसेल. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे Box Office Collection. चित्रपट निर्माते, मेकर्स यांना रि-रिलीजमध्ये जितका कलेक्शनचा फायदा होत आहे तो ओरिजनली रिलीज केल्याच्या दुप्पट तिप्पट नक्कीच आहे. आणि त्यामुळेच रि-रिलीजमध्ये एक नवा प्रेक्षक, प्रेक्षकांच्या चित्रपटाच्या नव्या आवडी निर्माण करत बॉक्स ऑफिस कलेकश्नही केलं जात आहे. (Sanam teri Kasam movie re-release)

रि-रिलीजचा फायदा कोणाला?

चित्रपटांचा Re-Release Trend हा मेकर्स आणि प्रेक्षक या दोघांच्याही फायद्याचा आहे. मेकर्ससाठी आर्थिकदृष्ट्या ही महत्वाची संधी असून नव्या पिढीचा प्रेक्षकही चित्रपटाला जोडला जात आहे. आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपल्या जवळच्या लोकांसोबत आपल्या आवडीचे जुने चित्रपट पाहून जुन्या आठवणी किंवा जुने क्षण रिक्रिएट करण्याची आयती संधी मिळतेय. बरं, जुने चित्रपट साऊंड, व्हिज्युअल इफेक्ट यांचेच आधुनिकीकरण करुन पुन्हा रिलीज केले जात आहेत. त्यामुळे जरी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन ९ वर्षांपूर्वी आलेला ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट पाहात असतील तर त्यांना better video quality असणारा चित्रपट पाहता येतोय. मेकर्सना पुन्हा एकदा क्लासिक चित्रपटांतून कमावण्याची संधी देणारा हा ट्रेण्ड असल्यामुळे जुने चित्रपट नव्या प्रेक्षकांना आकर्षित करणारी ही संधी प्रत्येकजण आजमावून पाहात आहेत. (Bollywood update)

=============================== 

हे देखील वाचा : Priyanka Chopra : मिस वर्ल्ड जिंकण्यासाठीच ‘ती’ आली होती!

===============================

Upcoming रि-रिलीज चित्रपट कोणते?

ऑल्ड इज ऑलवेज गॉल्ड… जुने चित्रपट रि-रिलीज का होत आहेत हे जाणून घेतलं; आता आगामी कोणते चित्रपट रि-रिलीज होणार आहेत ते पाहूयात… Rajkumar Rao चा २०१७ साली आलेला ‘शादी मैं जरुर आना’ हा चित्रपट ७ मार्च २०२५ रोजी रि-रिलीज होणार आहे. १३ कोटीमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने २०१६ मध्ये १७ कोटींची कमाई केली होती. यानंतर, १५ वर्षांपूर्वी अभय देओल याच Road हा चित्रपट आला होता जो ७ मार्चला पुन्हा रिलीज होणार आहे. हा चित्रपट ड्रामा, अॅडव्हॅन्चर आणि रोमॅन्स यांचं मिश्रण आहे.

यानंतर अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असणारा Namastey London हा चित्रपट १४ मार्च २०२५ रोजी रि-रिलीज होणार आहे. २००७ मध्ये आलेल्या या चित्रपटाने त्यावेळी ३७.३९ कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं. याशिवाय लवकरच ‘लैला-मजनू’, ‘अंदाज अपना अपना’, ‘घातक असे कल्ट फॅन असलेले क्लासिक चित्रपट पुन्हा थिएटर गाजवण्यास येणार आहेत. 

रसिका शिंदे-पॉल

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Chitchat bollywood classic films bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured jab we met Movie re release trend road sanam teri kasam tumbaad
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.