‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

साऊथच्या छायेत Bollywood हरवलं आहे का?
“शाहरुख किंवा सलमान खानचा नवीन कोणता पिक्चर येतोय का रे?”, या प्रश्नांऐवजी आता “अरे साऊथचा नवा कोणता पिक्चर येतोय? किंवा ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा १’ परत एकदा पाहा.ला जाऊयात का?”, अशी वाक्य सध्या आपल्या कानांवर पडताना नक्कीच दिसत असतील… ‘कांतारा -चॅप्टर १’ ने (Kantara : The Legend-Chapter 1) लोकांना पार वेडं केलंय… त्यांच्या पंजुर्ली आणि गुलिगा या देवतांची मिस्ट्री, किंवा बेरमे नक्की कोण आहे? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत ठेवले आहेत… तर दुसरीकडे लोकं यशच्या ‘केजीएफ ३’ (KGF 3) किंवा ‘सालार २’ (Salaar 1) ची आतुरतेने वाट पाहात आहेत… पण तुम्ही नोटीस केलं का यात बॉलिवूड कुठेच नाहीये.. मग सध्या बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत काय सुरु आहे? (South Indian Films)

तर, फार मागे नाही २ ऑक्टोबरबद्दलच आधी बोलूयात… २ ऑक्टोबरला ‘कांतारा : द लेजेंड- चॅप्टर १’ हा कन्नड चित्रपट आणि ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा हिंदी चित्रपट रिलीज झाला… आता २०२२ मध्ये आलेल्या ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ची जादू लोकांवर आधीपासूनच असल्यामुळे ‘कांतारा १’चं प्रमोशन फारसं चित्रपटाच्या टीमला करावं लागलं नाही… पण वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटाला फारच प्रमोशनची गरज भासली… इतकं करुनही बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवण्यात हा चित्रपट सपशेल फेल झाला… त्यामुळे पुन्हा एकदा साऊथ फिल्म इंडस्ट्रीने बॉलिवूडला खाऊन टाकलं… (Bollywood movies 2025)

आता बॉलिवूडचेच कलाकार हळूहळू साऊथमध्ये जाताना दिसतायत… यात संजय दत्त, बॉबी देओल, दीपिका पादूकोण (Deepika Padukone), प्रियांका चोप्रा, सैफ अली खान, आमिर खान अशी यादी भली मोठी आहे… आता उल्लेख केलेल्या या सगळ्याच कलाकारांनी त्यांचा एक Era बॉलिवूडमध्ये गाजवला आहेच.. पण आता तितक्या ताकदीच्या कथा आणि सादरीकरण नसल्यामुळे त्यांनी साऊथकडे मोर्चा वळवला आहे का? असा प्रश्न नक्कीच उभा राहतो… दुसरं म्हणजे काही साऊथचे कलाकार बॉलिवूडमध्ये काम करताना दिसत आहेत… ‘वॉर २’मध्ये जुनिअर एनटीआर, ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास, ‘रामायण’मध्ये यश (Ramayana movie and Yash), पण त्यांनी आपलं मुळ काही सोडलं नाही आहे… पण बॉलिवूडमध्ये काही नवं येतंच नाहीये हे प्रेक्षकांनाही दिसतंय यात शंकाच नाही… (Entertainment News)

आता हिंदीत कोणते नवे चित्रपट येणार आहेत? एक तर ‘थामा’, बरं ती पुर्णपणे नवी कथा म्हणावी का? कारण, मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी युनिवर्समधील हा थामा एक चित्रपट.. त्यामुळे ‘स्त्री’, ‘भेडिया’, ‘मुंज्या’ प्रमाणेच ‘थामा’ देखील यांच्याशी कनेक्टेड असणार याच वादच नाही… मग बॉलिवूडमध्ये Upcoming आहे तरी काय? उत्तर आहे सीक्वेल्स… ‘मस्ती ४’, ‘दे दे प्रायर दे २’, ‘डॉन ३’ (Don 3), ‘हेरा फेरी ३’, ‘Animal Park’, ‘स्त्री ३’… या पलिकडे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हिंदी चित्रपट मेकर्सकडे कथा उरल्याच नाहीयेत का असा भला मोठा प्रश्न नक्कीच उभा राहतो… आणि त्यामुळेच ऑडियन्स ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि साऊथच्या सीरीज आणि चित्रपटांकडे वळतात… आता एकीकडे असं पण बोललं जाईल की साऊथमध्येही सीक्वेल्स आणि प्रीक्वेल्स येणार आहेतच की…मात्र, बॉलिवूडच्या सीक्वेल्समध्ये एकसारखेपणा आल्यामुळे प्रेक्षक खरंच बोअर झाले आहेत… त्यामुळेच ‘कांतारा १’ किंवा ‘दशावतार’ सारखे आपल्या मातीतील चित्रपट प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहेत…(Bollywood sequels coming soon)
================================
हे देखील वाचा : V. Shantaram यांनी नाव दिलं आणि बॉलिवूडचा ‘हा’ सुपरस्टार घडला
=================================
चित्रपट मग तो कुठल्याही भाषेतला असुदेत; प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं आणि त्यातून काही संदेशही त्यांना मिळावा हा खरं तर प्रत्येक मेकर्सचा उद्देश असतो… परंतु, बॉलिवूड चित्रपटांचा मुळ गाभा कुठेतरी विसरत चाललं आहे असं वाटतंय… एकेकाळी ‘हम साथ साथ है’, ‘हम आपके है कौन?’, ‘बॉर्डर’, ‘शोले’, Mother India असे सुपरहिट आणि कौटुंबिक चित्रपट दणारं बॉलिवूड आपली संस्कृती आणि आपली पाळमुळ विसरुन साऊथ चित्रपटांच्या छायेत कुठेतरी झाकोळलं जातंय का? या प्रश्नाचा विचार हिंदी चित्रपट मेकर्सनने गांभीर्याने नक्कीच करायला हवा…
-रसिका शिंदे-पॉल
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi