Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Aatali Batami Phutli Trailer:  धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

मराठी टीव्ही मालिकेतील अभिनेता होणार बाबा; खास फोटो शेअर करत

Maharashtrachi Hasyajatra तून विशाखा सुभेदारने एक्झिट का घेतली? अभिनेत्रीने सांगितलं

Shubhvivah मालिकेतील अभिनेत्रीने लग्नाच्या तब्बल १० वर्षांनंतर दिली गुड न्यूज !

Marathi Movie Remakes : मराठी भाषेतील चित्रपटांची बॉलिवूड आणि साऊथला

‘या’ सिनेमात पहिल्यांदा मोहम्मद रफी यांनी Rishi Kapoor यांच्यासाठी पार्श्वगायन

Thappa : मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

“माझं मराठी बेळगावकडचं…”, रजनीकांत सरांचा साधेपणा पाहून भारावले Upendra Limaye

Marathi Movies 2025 : ३ मराठी चित्रपट येणार आमने-सामने!

Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडीने रिजेक्ट केलेले चित्रपट आहेत तरी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडीने रिजेक्ट केलेले चित्रपट आहेत तरी कोणते?

 Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडीने रिजेक्ट केलेले चित्रपट आहेत तरी कोणते?
कलाकृती विशेष

Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडीने रिजेक्ट केलेले चित्रपट आहेत तरी कोणते?

by रसिका शिंदे-पॉल 09/09/2025

हिंदी चित्रपटसृष्टीचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आज (९ सप्टेंबर) ५८ वर्षांचा झाला… मात्र, आजही तरुणाईला लाजवेल असा उत्साह आणि एनर्जी त्याच्यात आहे… स्वत:च्या प्रत्येक चित्रपटातला स्टंट स्वत: करणाऱ्या अक्षयने फिटनेसवर गेले अनेक वर्ष काटेकोरपणे लक्ष दिलं आहे… एका वर्षात २-३ चित्रपट करणारा अशी ओळख असणाऱ्या अक्षयचे गेल्या काही वर्षांपासून फारसे चित्रपट हवेतसे चालत नाही आहेत… परंतु, आजही त्याचा ऑरा आणि त्याचा अभिनय चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारा आहे यात तिळमात्र शंका नाही…(Bollywood News) आज वाढदिवसानिमित्त अक्षय कुमार याने बॉलिवूडचे काही सुपरहिट चित्रपट रिजेक्ट केले होते त्यांची नावं जाणून घेऊयात…

बाजीगर

शाहरुख खान याचं अभिनेता म्हणून जीवन बदलून टाकणारा बाजीगर (१९९३) हा चित्रपट… उत्कृष्ट खलनायक शाहरुखने या चित्रपटात साकारला होता.. परंतु, बाजीगरसाठी आधी शाहरुख खान नाही तर अक्षय कुमार मेकर्सची पहिली चॉईस होता.. परंतु, करिअरच्या शिखरावर असणाऱ्या खिलाडीला बाजीगरमध्ये खलनायक साकारुन रुळावर असणाऱ्या करिअरला धक्का लावू द्यायचा नव्हता.. आणि म्हणूनच त्याने बाजीगर चित्रपट नाकारला होता… या चित्रपटात काजोल आणि शिल्पा शेट्टी यांच्या देखील महत्वाच्या भूमिका होत्या…(Baazigar Movie)

सुर्यवंशम

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची दुहेरी भूमिका असणारा सुर्यवंशम चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे…  सुरुवातीला अमिताभ यांच्या ऐवजी ठाकूर भानुप्रताप सिंगची भूमिका अक्षय कुमारला ऑफर करण्यात आली होती… मात्र, चित्रपटातील प्रमुख नायकाला एका वृद्धाची भूमिका साकारायची आहे हे समजल्यानर अक्षयने तो चित्रपट रिजेक्ट केला होता…(Sooryavansham Movie)

रेस

सैफ अली खान याची प्रमुख भूमिका असणारा रेस चित्रपटही अक्षयने नाकारला होता… २००८ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने जगभरात १०० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं… शिवाय प्रेक्षकांनी देखील रेस चित्रपटाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला होता…(Race Movie)

भाग मिल्खा भाग

राकेश मेहरा दिग्दर्शित आणि फरहान अख्तर अभिनित भाग मिल्खा भाग (२०१३) हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटही अक्षय कुमार याला ऑफर करण्यात आला होता… राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या चित्रपटाला अक्षय कुमार याने वन्स अपॉन टाईम इन मुंबई दोबारा या चित्रपटामुळे नकार दिला होता.. आणि कालांतराने त्याला याचा पश्चाताप देखील झाला होता… (Bhaag Milkha Bhaag)

================================

हे देखील वाचा : Kesari Chapter 2 : “चित्रपट पाहिल्यानंतर ब्रिटीश स्वत:हूनच माफी”, अक्षयने व्यक्त केला विश्वास

=================================

अक्षय कुमारने आजवर हिंदी आणि साऊथ चित्रपटांमध्ये कामं केली..  त्याच्या उत्कृष्ट अभिनय आणि अॅक्शन्समुळे त्याला हॉलिवूड (Hollywood Movie) चित्रपटाची देखील संधी मिळाली होती… अभिनेता Dwayne याच्यासोबत एका अॅक्शन चित्रपटातून त्याला हॉलिवूड डेब्युची संधी मिळाली होती… मात्र, त्याला हॉलिवूडमध्ये जाण्यात रस नसल्यामुळे त्याने तो चित्रपट रिजेक्ट केला होता…दरम्यान, येत्या काळात अक्षय कुमारचे ‘जॉली एल.एल.बी ३’, ‘वेलकम टु द जंगल’, ‘भूत बंगला’ असे बरेच चित्रपट रिलीज होणार आहेत…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Akshay Kumar akshay kumar birthday akshay kumar film journey akshay kumar movies baazigar bhoot bangla bollywood action hero bollywood update Celebrity News Entertainment News hollywood movie khiladi akshay kumar race welcome to the jungle
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.