Indeevar : संगीतकार आनंदजी यांनी इंदीवर यांना सुचवले होते हुक

Bollywood Villians : हिंदी चित्रपटसृष्टीतील टॉप खलनायिका!
कुठल्याही चित्रपटात जितका हिरो महत्वाचा असतो तितकाच खलनायकही महत्वाचा असतो. खलनायकाशिवाय हिरोचं महत्व फारसं जाणवत नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता खलनायक हा विषय सुरुच आहे आणि जर का विचारलं बॉलिवूडमधील चॉप खलनायकांची नावं सांगा तर अर्थात अमजद खान, अमरिश पुरी, गुलशन ग्रोव्हर, प्राण या पुरुष खलनायकांचीच नावं तुम्ही घ्याल. पण तुम्हाला माहित आहे का? हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ महिला खलनायकांनीही पुरुष खलनायकांच्या तोडीस तोड गाजवला आहे. जाणून घेऊयात Female Villan Characters बद्दल… (Bollywood female villians)
तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना ही म्हण नायक आणि खलनायक या जोडीसाठी तंतोतंत जुळते…चित्रपटाची कथा, इतर कलाकार जितके महत्वाचे असतात किंवा ते प्रेक्षकांना आकर्षित करतात त्यात खलनायकांचा किंवा खलनायिकांचा फार मोलाचा वाटा असतो… ६०-७० च्या दशकापासून हिंदी चित्रपटांमध्ये खलनायिकांनी स्वत:च असं वेगळं विश्व निर्माण केलं आहे. (Bollywood films)
म्हणजे एखादी वाईट सासू असेल तर त्यावेळी ललिता पवार यांचा चेहरा आणि नाव सर्वात आधी घेतलं जातं..’सौ दिवस सासू के’ या चित्रपटातील त्यांनी साकारलेली खाष्ट सासू आजही चांगलीच लक्षात आहे. याशिवाय, ललिता पवार (Lalita Pawar) यांनी साकारलेल्या मंथरा, कैकेयी, या भूमिकांमुळे त्या घराघरांत पोहोचल्या..७०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या होत्या.. इतकंच नाही तर सर्वाधिक काळ इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर घडवण्यासाठी त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे. (Entertainment)

हिंदी चित्रपटांचा विषय आणि त्यातही खलनायिकांचा विषय सुरु असेल तर अभिनेत्री नादिरा (Nadira) यांचं नाव येणार नाही असं शक्य नाही. ५०-६०च्या दशकात ’आन’, ‘पाकीजा’, ‘श्री ४२०’ या चित्रपटांत त्यांनी साकारलेली नकारात्मक भूमिका आयकॉनिक आहे… (Bollywood masala)

खलनायिकांच्या यादीतील पुढचं नाव म्हणजे बिंदू. Vamp किंवा नकरात्मक भूमिका करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत हे नावं येतंच. बिंदू (Bindu) यांनी ‘दो रास्ते’, ‘कटी पतंग’ या चित्रपटांमध्ये खलनायिका साकारली आहे.

बरं काही अभिनेत्रींनी कायमच नकारात्मक भूमिका साकारल्या नाही. त्यांनी सपोर्टिंग रोल करत काही चित्रपटांमध्ये खलनायिका केली. यातील एक नाव म्हणजे अरुणा इराणी. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत अरुणा यांनी संसार सारखा चित्रपटही केला आणि ‘मवाली’, ‘बेटी नं १’, ‘बेटा’ या चित्रपटात खाष्ट सासूही साकारली…

आता जरा अलीकडच्या काळातील खलनायिकांकडे वळूयात… सर्वात आधी नाव येतं ते म्हणजे ‘ऐतराज’ चित्रपटातील प्रियांका चोप्रा…. (Priyanka Chopra) ऐतराजमधील सोनिया आजही लक्षात आहे.. आपल्या सौंदर्य आणि अदाकारीने प्रियांकाने साकारलेल्या सोनियाचा राग येतोच… तिच्या अभिनय कारकिर्दीत काही उल्लेखनीय भूमिकांपैकी ही एक भूमिका नक्कीच कौतुकास्पद आहे… शिवाय या भूमिकेसाठी तिला अॅवॉर्ड देखील मिळाला होता…(Aitraz Movie)

यानंतर ‘गुप्त’ या चित्रपटात काजोलने (Kajol) इशा धवन ही भूमिका साकारून तिच्या अभिनयाचा एक बेन्चमार्क सेट केला होता.. विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट निगेटीव्ह रोलसाठी फिल्म फेअर पुरस्कार मिळवणारी काजोल ही पहिली अभिनेत्री आहे…

पुढची अभिनेत्री ही खरंच वर्सटाईल आहे… कधी पोलिस अधिकारी कधी सोज्वळ सून तर कधी खलनायिका… ही अभिनेत्री म्हणजे तब्बू… (Tabbu) ‘हम साथ साथ है’ मधली साधना असो किंवा ‘अंधाधुंध’ चित्रपटातील सिम्मी सिन्हा असो तिने प्रत्येक भूमिका उत्कृष्ट निभावल्या… या चित्रपटात तिने साकारली सिम्मी बऱ्याच नवऱ्यांना धडकी भरवणारी होती.

आता वळूयात शेवटच्या खलनायिकेकडे… या चित्रपटाची स्टोरी लाईन जशी वेगळी आणि युनिक होती अगदी त्याचप्रमाणे ही अभिनेत्री खलनायिका असू शकेल असा अंदाज किंवा अपेक्षा प्रेक्षकांना नव्हती ती म्हणजे कोंकना सेन शर्मा…एक थी डायनिंग या चित्रपटातील Witch कोंकणा सेन तिच्या इतर कॅरेक्टर्सना सरपास करुन गेली होती…(Konkana Sen Sharma)
==============
हे देखील वाचा : Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते
==============

हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक किंवा खलनायिका यांचं वेगळं विश्व होतं आणि आजही आहे पण चित्रपटासाठी खलनायक किती ताकदीचा असावा लागतो किंवा त्याचं काय महत्व असतं ते कुठेनाकुठेतरी आपल्याला साऊथ कडून समजलं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही..(Indian cinema)