
Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की पाहा…
यंदा संपूर्ण देश ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या या दिवर्शी प्रत्येक देशवासी आपल्या देशाबदद्ल त्यांच्या मनात किती प्रेम आणि आस्था आहे याचं प्रदर्शन करताना दिसतात… सगळीकडे देशभक्तीपर गाणी वाजत असतात. आणि तिरंगा फडकवल्यानंतर भारतीयांच्या डोळ्यांत सैनिकांबद्दलचा आदरही दिसून येतो… सरफरोश, लगान मंगल पांडे यासोबतच बरेच Patriotic चित्रपट आजवर बॉलिवूडमध्ये आले… आता या लॉंग वीकेंडला घरबसल्या कुटुंबासोबत बसून हे देशभक्तीवर चित्रपट नक्की पाहा…
‘उरी – द सर्जिकल स्ट्राइक’
विकी कौशल याची प्रमुख भूमिका असलेला ‘उरी – द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी नक्कीच आपल्या लिस्टमध्ये हवा… २०१६ च्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारीत या चित्रपटाची कथा आहे…

‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’
अजय देवगण याची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटाची कथा शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित आहे.. राजकुमार संतोषी दिग्दर्शित या बायोपिकमध्ये अमृता राव, सुशांत सिंग, राज बब्बर, फरीदा जलाल यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या..

गदर
सनी देओल आणि अमिशा पटेल यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट देशभक्तीवर चित्रपटांच्या यादीत अग्रस्थानी आहे… स्वातंत्र्यदिनी नक्कीच हा चित्रपट तुम्हा पाहायला हवा…

बॉर्डर
भारतीय सैनिकांचं खरं जीवन मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या बॉर्डर या चित्रपटात भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या १९७१ युद्धाचं चित्रिकरण करण्यात आलं होतं…..या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या…

क्रांती
भारतीय चित्रपटसृष्टीत देशभक्तीपर चित्रपट बनवण्याच्या यादीत पहिलं नाव येतं ते म्हणजे मनोज कुमार यांचं.. त्यांनी त्यांच्या सिनेकारकिर्दित बरेच चित्रपट केले; पण त्यांनी साकारलेले क्रांती, पूर्वा और पश्चिम, उपकार असे अनेक हिट देशभक्तीपर चित्रपट हिट ठरले.

================================
हे देखील वाचा : Rajinikanth : ५ इंडस्ट्रीचे ५ दिग्गज एकत्र… ‘कुली’ १००० कोटी कमावणार?
=================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi