
Bollywood : तीन मुस्लीम एकत्र आले आणि तयार झालं श्रीकृष्णाचं Iconic गाणं!
‘मधुबन में जो कन्हैया किसी गोपी से मिले’ हे शब्द कानावर पडताच डोळ्यांसमोर ‘लगान’ (Lagaan) चित्रपटातील हे सुंदर आणि iconic गाण्याचं चित्र उभं राहिलंच ना… पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणारे गावकरी चिंतेत असूनही श्रीकृष्णाला साद घालत आहेत… जितकं अप्रतिम हे गाणं आहे तितकीच सुंदर आमिर खान आणि ग्रेसी सिंग यांची केमिस्ट्रीसुद्धा होती. पण हे गाणं नेमकं कोणी लिहिलं हे खरं तर अनेकांना माहितच नाही आहे. जाणून घेऊयात या गाण्याच्या सुत्रधारांबद्दल…. (Bollywood)

तर, लगान चित्रपटातील हे भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या रासलीलावरील सुंदर गाणं लिहिलं आहे प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी. आणि गाणं संगीतबद्ध केलं आहे भारताचा मोझार्ट ए आर रेहमान यांनी… आणि हे गाणं चित्रित झालं आहे आमिर खानवर… त्यामुळे गंमत बघा ना… गाणं लिहिणारा मुस्लिम, गाणं संगीतबद्ध करणारा मुस्लिम आणि त्या गाण्यावर रासलीला करणाराही मुस्लिम… भारताची संस्कृती उत्कृष्टरीत्या सादर करण्याचं काम जावेद अख्तर, ए आर रेहमान आणि आमिर खान या त्रिकुटाने केलं आहे. या गाण्याची आणखी एक खासियत म्हणजे या गाण्याची कॉरिओग्राफी केली आहे सरोज खान या आणखी एका मुस्लिम आर्टिस्टने.. त्यामुळे एकीकडे देशात हिंदु-मुस्लिम वाद सुरु असताना दुसरीकडे मात्र कलाविश्वात एक वेगळं संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळत होतं आणि या पुढेही मिळेल…(Entertainment)
================================
=================================
जरा भूतकाळात जाऊयात… लगान चित्रपटापूर्वी ६० च्या दशकात असाच अनोखा संगम घडला होता… आपल्या सर्वांनाच ‘मधुबन में राधिका नाचे रे…गिरधर की मुरलीया बाजे रे…’ हे रासलीलावरचं सुप्रसिद्ध गाणं ठाऊक आहेच… या सुंदर गाण्यात आपल्याला दिलीप कुमार आणि मीना कुमारी यांची सुदंर केमिस्ट्री दिसून आली होती…. आता जरा या गाण्याची पार्श्वभूमी पाहिली तर हे गाणं गायलं होतं मोहम्मद रफी यांनी… गाणं लिहिलं होतं प्रसिद्ध शायर शकील बदायुनी यांनी… आणि या गाण्याला संगीतबद्ध केलं होतं नौशाद अली यांनी… या तीन मुस्लिम कलाकारांनी मिळून जी ठुमरी लिहिली ती गेल्या ६० वर्षांपासून सिनेप्रेमी आणि संगीत प्रेमींच्या मुखात आजही आहे. भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू आणि मुस्लिम कलाकारांनी एकत्र येऊन अशी ग्रेटेस्ट गाणी आणि कलाकृती तयार करुन ठेवल्या आहेत, ज्यांचा प्रभाव पुढील कित्येक पिढ्यांपर्यंत राहणार आहे. (Bollywood Retro News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi