
सुपरस्टार Dev Anand पाहायचे ‘हा’ मराठी कार्यक्रम!
भटकायला कुणाला आवडत नाही? रोजच्या ऑफिसच्या, धकाधकीच्या जीवनात थोडासा ब्रेक घेऊन मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत फिरायला सगळ्यांनाच आवडतं.. पण जर का काही कारणांमुळे फिरायला जाता येत नसेल तर घरबसल्या बाहेरचं जग तुम्हाला दाखवू असं कुणी म्हटलं तर? साहजिकच हसायला येईल… पण २००५ मध्ये अभिनेते मिलिंद गुणाजी (Milind Gunaji) यांनी ‘भटकंती’ या कार्यक्रमातून लोकांना सह्याद्रीची सफर घडवली होती… ९०च्या दशकात जन्मलेल्या प्रत्येक मराठी माणसाला झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा ‘भटकंती’ (Bhatakanti Tv Show) हा कार्यक्रम नक्कीच आठवत असेल… पण तुम्हाला माहित आहे का? बॉलिवूडचा एक सुपरस्टार चक्क मिलिंद गुणाजी यांचा भटकंती कार्यक्रम पाहायचे आणि त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया देखील मिलिंद यांच्यापर्यंत पोहोचवल्या होत्या… काय होता हा किस्सा जाणून घेऊयात..

नुकतंच, सह्याद्री मित्रसंमेलन झालं… यावेळी झालेल्या मुलाखतीमध्ये मिलिंद गुणाजी यांनी ‘भटकंती’ कार्यक्रमाच्या विशेष आठवणी सांगितल्या… मिलिंद म्हणाले की,‘सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये भटकंती करण्याची मूळ प्रेरणा मला वडिलांकडूनच मिळाली. या दऱ्या-खोऱ्या, गड-किल्ल्यांवर भटकंती करायला लागलो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे विशाल कर्तृत्व आणखी प्रेरणा द्यायला लागले. वाचनाचीही मला आवड होती. गोनिदा, बाबासाहेब पुरंदरे, हरीश कपाडिया यांसारख्या दिग्गजांचे साहित्य मला प्रेरक व मार्गदर्शक ठरले,’ असं गुणाजी म्हणाले…
================================
हे देखील वाचा: Dev Anand : ….तसं झालं असतं तर देव आनंद ‘तिसरी मंझिल’चा नायक राहिला असता!
=================================
पुढे मिलिंद गुणाजी यांनी ज्येष्ठ गिर्यारोहक राजेश गाडगीळ यांच्याशी मुलाखतीत बोलताना देव आनंद (Dev Anand) यांची एक खास आठवण सांगितली… गुणाजी म्हणाले की,देव आनंद यांनी राज्याच्या छायाचित्र प्रकल्पात लिखित अभिप्राय देत त्यांना हा कार्यक्रम आवडतो आणि ते कार्यक्रम पाहतात असं लिहिलं होतं.. त्यामुळे बॉलिवूडच्या गाईडला मराठीतला भटकंती करणारा गाईड आवडला होता असं नक्कीच म्हणालं लागेल… जाता जाता मिलिंद गुणाजी यांच्या कारकिर्दिबद्दल बोलायचं झालं तर ‘द्रोह काल’, ‘देवदास’, ‘जुलमी,’गॉडमदर’, ‘द गाझी अॅटॅक’, ‘रेस’, ‘पानिपत’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये कामं केली आहेत… तुम्हाला आजचा किस्सा कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा…(Milind Gujani Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi