Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,

Border 2: ‘घर कब आओगे…’ तब्बल 28 वर्षांनंतर प्रसिद्ध गाणं नव्या स्वरूपात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला!
प्रसिद्ध फिल्ममेकर जे. पी. दत्ता यांच्या 1997 साली प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक चित्रपट बॉर्डरनंतर आता त्याचा बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘बॉर्डर 2’ (Border 2) प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार असून, सध्या त्यातील एका खास गाण्यामुळे तो विशेष चर्चेत आहे. ‘घर कब आओगे…’ हे अजरामर गीत तब्बल 28 वर्षांनंतर नव्या स्वरूपात पुन्हा एकदा रसिकांच्या कानावर पडणार आहे. आधी या गाण्याचा ऑडिओ रिलीज करण्यात आला होता आणि आता अखेर त्याचा व्हिडिओदेखील प्रेक्षकांसमोर आला आहे. या गाण्यामुळे जुन्या बॉर्डरच्या आठवणी ताज्या झाल्या असून, भावनांचा ओघ पुन्हा एकदा वाहू लागला आहे.(Border 2)

सनी देओल (Sunny Deol) , वरुण धवन (Varun Dhavan) , दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बॉर्डर 2 मधील या गाण्याच्या ऑडिओ रिलीजची घोषणा अभिनेता अहान शेट्टी आणि गीतकार मनोज मुंताशीर यांनी केली होती. हे गाणे संगीतकार अनु मलिक यांच्या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम ऑडिओ स्वरूपात प्रदर्शित झाले होते. आता त्याचे व्हिज्युअल सादरीकरणही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.या नव्या आवृत्तीत सोनू निगम, अरिजीत सिंग, दिलजीत दोसांझ आणि विशाल मिश्रा यांच्या आवाजांचा सुरेख संगम ऐकायला मिळतो. विशेष म्हणजे, या गाण्याचे बोल पूर्णपणे नव्याने लिहिण्यात आले आहेत. संगीतामध्येही बदल करण्यात आला असला, तरी मूळ गाण्याचा आत्मा जपण्यासाठी काही परिचित सुरांचा वापर करण्यात आला आहे.

देशाच्या मातीपासून ते कपाळावरच्या बिंदीपर्यंत प्रत्येक भावनेला स्पर्श करणारे हे सुमारे 10 मिनिटे 34 सेकंदांचे गीत आहे. 1997 मध्ये सोनू निगम आणि रूप कुमार राठोड यांनी गायलेले मूळ गाणे उच्च पट्टीतील आणि तीव्र भावनांनी भरलेले होते. मात्र, यावेळी या गाण्याची अधिक संयत, सौम्य आणि भावनिक मांडणी करण्यात आली आहे. प्रत्येक शब्दातून सैनिकांची वेदना, घराची ओढ आणि देशप्रेम ठळकपणे जाणवते.(Border 2)
===========================
हे देखील वाचा: Kabhi Khushi Kabhie Gham चा दूसरा पार्ट येणार? करन जोहरने दिली हिंट
===========================
‘बॉर्डर 2’ मधील हे गीत केवळ गाणे न राहता, एक भावनिक अनुभव ठरत असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढवणारे ठरले आहे.हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.