
‘पण तू तर दलित आहेस’ Janhvi Kapoor च्या बॉयफ्रेंडवर युजरने केली कमेंट; Shikhar Pahariyaने दिलेल्या उत्तराने सगळ्यांची मन जिंकले…
Actress Janhvi Kapoor बऱ्याच काळापासून शिखर पहाडियाला डेट करत आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. दरम्यान, अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. जान्हवी कपूर शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. हे दोघं अनेकदा एकत्र दिसतात. मात्र एका पोस्टमध्ये शिखर पहाडियाला सोशल मीडियावर लोकांनी ट्रोल केलं आहे. एका युजरने शिखरला दलित म्हणत त्याचा अपमान केला आहे. आता जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडनेही एक प्रतिक्रिया पोस्ट करत युजरला त्याच्याच भाषेत खरपुस उत्तर दिल आहे. शिखर पहारियाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि आता सर्वजण शिखरच कौतुक करत आहेत.(Shikhar Pahariya slams troll for casteist remark)

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडियाला त्यांच्या अफेअरमुळे नेहमीच चर्चेत असतात, परंतु त्यांचे रिलेशनशिप स्टेटस अद्याप अपडेट करण्यात आलेले नाही. मात्र, ते सर्व सण एकत्र साजरे करतात. कोणत्याही कार्यक्रमात ते एकत्र दिसतात. दिवाळीच्या निमित्ताने ही शिखरने जान्हवी आणि त्यांच्या पाळीव कुत्र्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांनी या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला.

मात्र, एकाने ‘पण तु तर दलित आहात’, अशी कमेंट त्यावर केली आहे.त्याला उत्तर देताना शिखरने युजरला शिकवताना लिहिले की, “2025 मध्ये तुमच्यासारखे इतक्या छोट्या, मागास मानसिकतेचे लोक आहेत हे प्रामाणिकपणे खेदजनक आहे.” भारताच्या विविधतेवर भर देताना तो पुढे लिहितो की, “दिवाळी हा प्रकाशाचा, प्रगतीचा आणि एकतेचा सण आहे, ज्या संकल्पना संकुचित मनाच्या आकलनापलीकडे आहेत. भारताची ताकद नेहमीच वैविध्यपूर्ण संस्कृतीत राहिली आहे, जी आपण स्पष्टपणे समजून घेण्यात अपयशी ठरलो आहात.
==================================
==================================
शिखर पहाडियाला पुढे लिहितो, ‘भारताची ताकद नेहमीच विविधतेत आणि सर्वसमावेशकता राहिली आहे. हे समजून घेण्यात तुम्ही पूर्णपणे अपयशी ठरलो आहात. कदाचित अज्ञान पसरवण्यापेक्षा स्वत:च्या शिक्षणावर भर द्यावा कारण सध्या जे अस्पृश्य आहे ते तुमच्या विचारांची पातळी आहे.’