केकचा बॉस
टीएलसी चॅनेलवरील केक बॉस मालिका तुम्ही कधी पाहिलीत का…भन्नाट आकारातले केक बघायचे असतील तर ही मालिका नक्की बघावी…असेही केक करता येतात का…हा प्रश्न पडावा असे केक…आणि त्यांची लाजबाव टेस्ट,त्यांचे आकार आणि लोकांची प्रतिक्रीया पाहून नक्कीच अंदाज येतो की, हे केक मस्तच असणार…हे केक बनवणारा आहे, बॉस…केक बॉस.
टीएलसीवर प्रसिद्ध असलेला हा केक बॉस कार्यक्रम आहे कार्लोस अर्थात बारटोलो बडी बलेस्ट्रो याचा…आता अवघी अमेरिका या बारटोलोला बडी किंवा केक बॉस म्हणून ओळखते…या बडीनं वयाची अवघी चाळीशी ओलांडलीय…आणि त्याची वार्षिक कमाई किती आहे माहित आहे, दहा मिलीयन डॉलर…त्याच्या बेकरीच्या, कार्लोस बेकरीच्या एक-दोन नव्हे तब्बल 17 शाखा आहेत…बडी जे-जे करतो त्याची मालिका होते. तो केक बनवतो…कुकींग स्पर्धेमध्ये जज म्हणून भाग घेतो. त्याच्या राजेशाही थाटाच्या प्रासादामध्ये बायको मुलांसोबत जेवण करतो….त्याची चार मुलं आणि बायको हे सर्व फिरायला जातात…तिथे जेवण करतात…किंवा तिथल्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवायला जातात…त्याच्या बहिणी…त्यांचे नवरे…त्यांच्याबरोबर बडीची पार्टी…असं काहीही असलं तरी ते आपल्याला त्याच्यावर आधारीत मालिकेत बघायला मिळतं…बडी एवढ्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे की, हे सर्व लोकांना बघायला आवडतंही…या बडीचा प्रवास
आहेसच तसा..
बडीच्या वडीलांनी ही बेकरी सुरु केली. त्याची इटालियन आई त्यांना मदत करायची…बडी आणि त्याला चार बहिणी…या मोठ्या कुटुंबाचा भार सांभाळण्यासाठी वडीलांनी ही सुरु केलेली छोटीशी बेकरी चवदार पेस्ट्री, केक, कुकीज यामुळे लोकप्रिय झाली. गर्दी वाढू लागली…अकरा वर्षाचा असल्यापासून बडी आई वडीलांना मदत करण्यासाठी बेकरीमध्ये काम करायचा. पुढे तो सतरा वर्षाचा असतांना त्याचे वडील वारले. आणि जातांना या बेकरीचे सर्व अधिकार बडीच्या नावावर करुन दिले. वडील लवकर गेले, अशावेळी त्याची आई आणि बडी यांनी मोठ्या हिंमतीने बेकरी सांभाळली. दरम्यान त्याने बेकरीविषयक अभ्यासक्रमही पूर्ण केले. बडीने या छोट्याश्या बेकरीला आधुनिक रुप दिले. टीएलसी चॅनेलवर त्याच्या आणि त्याच्याबेकरीवर कार्यक्रम सुरु झाला. हा बडीच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. केक बॉस ही त्याची टीव्ही मालिका लोकप्रिय ठरली…किचन बॉस…नेक्ट्स ग्रेट बेकर…बडीज बेकरी रेसक्यु या मालीकाही गाजल्या. केक बॉस या मालिकेनं त्याला यशाच्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं. त्यानं आपल्या बेकरीच्या तब्बल 17 शाखा उघडल्या. शहरातील मान्यवर व्यक्तींमध्ये त्याचं नाव सामिल झालं. वडीलांनी सुरु केलेल्या छोट्याश्या बेकरीचे रुपांतर त्यांनी मोठ्या व्यवसायात केलं.
हा बडी मला आवडतो कारण त्याचे ते भन्नाट केक…आणि त्याचं कुटुंबावरील प्रेम…तो कुठलेही केक करु शकतो…तोंडातून आगेचे लोळ काढणारा डायनॅसोर…चालणारा रणगाडा…ख-या सारखं असणारं डॉल हाऊस…पैसे येणारं एटीएम…खेळाचं मोठं मैदान…पाण्यात पोहणारी मगर…मोठाला रोबोट…असं काहीही…आपण जे-जे सांगू ते तो केकच्या रुपात साकारु शकतो…हे करतांना तो त्या केकची चवही सांभाळतो.. बडी आणि त्याच्या बेकरीतील प्रत्येक कर्मचा-याचं प्रेमाचं नातं आहे. त्याची बेकरी म्हणजे त्याचं कुटुंबच असल्याचं तो बोलतो…याशिवाय त्याला चार बहिणी आहेत. या बहिणीही आपल्या भावाला बेकरीच्या कामात मदत करतात. आणि त्यांचे नवरेही. बडीची बायको लीसा आणि चार मुलं…हे ही लोभस…कुठलाही सण…वाढदिवस…उत्सव…ही सर्व मंडळी एकत्र साजरी करतात…कितीही मोठं झालं तरी आपलं कुटुंब हीच खरी संपत्ती असते हा संदेश तो सर्वांना देतो…तर मंडळी तुम्ही बघता का हा केक बॉस…नसेल तर नक्की बघा…
सई बने
फोटो सौजन्य- गुगल (Google)