Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Case No.73 Movie: ना चेहरा, ना कारण, चार खून आणि शून्य पुरावे; सहस्यमय सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित !

 Case No.73 Movie: ना चेहरा, ना कारण, चार खून आणि शून्य पुरावे; सहस्यमय सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित !
Case No.73 Motion Poster
मिक्स मसाला

Case No.73 Movie: ना चेहरा, ना कारण, चार खून आणि शून्य पुरावे; सहस्यमय सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित !

by Team KalakrutiMedia 29/12/2025

मानवी चेहरा हा अनेकदा एक मुखवटा असतो. त्या मुखवट्यामागे दडलेले असतात न सांगितलेले सुख-दुःख, न उमजलेल्या भावना आणि अनेक गूढ रहस्य. बाहेरून साधा वाटणारा माणूस आतून किती वेगळा असू शकतो, हे आपल्याला कळतही नाही. आणि जेव्हा अचानक तो मुखवटा बाजूला सरकतो, तेव्हा समोर येणारे सत्य आपल्यालाच थक्क करून सोडते. अशाच धक्कादायक वास्तवाचा वेध घेणारी कथा म्हणजे ‘केस नं. ७३’. ना चेहरा, ना कारण, चार खून आणि शून्य पुरावे अशा पार्श्वभूमीवर उभा राहिलेला हा रहस्यमय चित्रपट प्रेक्षकांच्या मनात सुरुवातीपासूनच अनेक प्रश्न निर्माण करतो. नुकतेच प्रदर्शित झालेले मोशन पोस्टर या कथेतील गूढ अधिक गडद करत असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवत आहे.(Case No.73 Motion Poster)

Case No.73 Motion Poster
Case No.73 Motion Poster

लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज यांच्या निर्मितीत तयार झालेला ‘केस नं. ७३’ हा मराठी चित्रपट येत्या जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केले असून, त्यांनीच शर्वरी सतीश वटक यांच्यासोबत चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहनिर्माते म्हणून प्रविण अरुण खंगार यांचा सहभाग आहे. चित्रपटात अशोक शिंदे, राजसी भावे, शैलेश दातार, नंदिता पाटकर आणि पियुष आपटे यांसारखे अनुभवी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Case No.73 Motion Poster
Case No.73 Motion Poster

चित्रपटातील प्रत्येक प्रसंग कथेतील नवे रहस्य उलगडतो, पण त्याच वेळी अधिक खोल प्रश्न निर्माण करतो. हा केवळ थरारक किंवा रहस्यमय सिनेमा नसून प्रेक्षकांच्या विचारांना चालना देणारी कथा आहे, असे मत दिग्दर्शक डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक प्रेक्षक या कथेतून स्वतःचे वेगळे सत्य शोधेल, असा त्यांचा विश्वास आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील रहस्यपटांचा दर्जा अधिक उंचावण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला असल्याचेही निर्मात्यांनी सांगितले आहे. (Case No.73 Motion Poster)

==========================

हे देखील वाचा: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या सुनेचे कांड; दीड कोटीची खंडणी घेताना रंगेहात पकडलं ! 

==========================

या चित्रपटाची पटकथा डॉ. ऋचा अमित येनुरकर यांनी लिहिली असून, गीतलेखन मंदार चोळकर यांचे आहे. रहस्य, थरार आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली ‘केस नं. ७३’ अखेर कोणाच्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढणार आणि त्या मुखवट्यामागे दडलेले सत्य काय असेल, हे पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ashok Shinde Case No.73 Movie Case No.73 Movie motion poster Celebrity Entertainment Marathi horror movie Marathi Movie Nandita Patkar Rajsi Bhave Shailesh Datar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.