Junaid Khan आमिर खानच्या मुलाला ‘लाल सिंग चड्ढा’, ‘लापता लेडीज’साठी
Chandra Barot: ‘या’ गाण्याच्या मेकिंगची भन्नाट कथा!
कधी कधी गाण्याची सिच्युएशन अनपेक्षितपणे सापडते आणि गाणं तयार होतं कधी कधी अगदी गप्पातील काही शब्दांमधून देखील गाण्याची सिच्युएशन मिळते. तर कधी चर्चेमधील भावनांमधून गाण्याची सिच्युएशन मिळते. असाच काहीसा प्रकार गीतकार इंदीवर (Indeevar) यांच्याबाबत झाला होता आणि यातून जे गाणे तयार झाले ते हिंदी सिनेमातील आयकॉनिक गाणे बनले. या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हे गाणे सुचाण्यामागे एक भन्नाट स्टोरी आहे. (Chandra Barot)
त्याच काय झालं, साठच्या दशकामध्ये एकदा संगीतकार कल्याणजी-आनंदजी (Kalyanji–Anandji) टांझानिया या देशात दौऱ्यासाठी गेले होते. तिथे त्यांची भेट एका भारतीय तरुणाशी झाली. तो तिथल्या बार्कलेस बँकमध्ये काम करत होता. दोन भारतीय एकत्र भेटल्यानंतर गप्पा होतातच. तो तरुण आनंदजी यांना म्हणाला, ”मुंबईत माझी एक मैत्रीण आहे. तिच्यावर माझं जीवापाड प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे. तिच्याशिवाय मी जगूच शकणार नाही. माझा हा निरोप कृपया तुम्ही तिच्यापर्यंत पोहोचवा.” आनंदजी यांनी त्याला होकार दिला.
टांझानियाचा दौरा संपल्यानंतर कल्याणजी मुंबईत आले त्यांनी आवर्जून त्या मुलीचा शोध घेतला. पण त्यांच्या असं लक्षात आलं की त्या मुलीचे तर लग्न झाले आहे आता टांझानियातील त्या मित्राला काय कळवायचे? ते खूप अपसेट झाले. ही बातमी ऐकल्यावर तो तरुण तर अक्षरशः कोलमडून पडेल. काय करायचे? गाडीमध्ये त्यांच्यासोबत गीतकार इंदीवर होते. आनंदजी म्हणाले, ”त्याला कळवायलाच नको. काळ हे सर्व दु:खावरील जालीम औषध आहे!” पण तरी ते इंदीवर यांना म्हणाले, ”कसमे वादे प्यार वफा या फक्त बोलायच्या गोष्टी असतात. वास्तविक जीवनात याला खरंच काही अर्थ असतो का? प्रत्येक जण आपापल्या मर्जीनुसार निर्णय घेत असतो. दुसऱ्यांच्या भावनांचा काहीच विचार करत नाही!” (Chandra Barot)
इंदीवर संवेदनशील कवी मनाचे. त्यांना देखील ही सर्व कर्म कहाणी ऐकून खूप वाईट वाटलं. पुढे आनंदजी म्हणाले, ”सध्या काय समाजाची स्थिती झाली पहा. एक आई पाच-सहा मुलांना जन्म देते. त्यांना चांगलं वाढवते. मोठे करते. त्यांना त्यांच्या पायावर उभं करते. पण ही मुलं मोठे झाल्यानंतर ही मुलं एकत्र होऊन एका आईला सांभाळू शकत नाही तिला वाऱ्यावर सोडतात!” पुढे अधिक भावनाविवश होऊन ते म्हणाले, ”काळ किती निष्ठूर असतो पहा. ज्या आई-वडिलांनी आपल्याला सांभाळलं असतं त्याच्याच चितेला अग्नी मुलगा देत असतो!” (Chandra Barot)
=============
हे देखील वाचा : Kishore Kumar शत्रुघ्न सिन्हावर चित्रित किशोर कुमारने गायलेलं पहिले गाणे कोणते?
=============
हे ऐकून हिंदीवर चरकले ते म्हणाले, ”काय विदारक सत्य तुम्ही सांगितलं आहे. या सगळ्या सिच्युएशनवर एक चांगलं गाणं होऊ शकत!” आणि त्यांनी गाणं लिहून टाकलं ‘कसमे वादे प्यार वफा सब बाते है बातो का क्या कोई नही यहा किसी का नाते है नातो का क्या…’ हे गाणं तयार झाल्यानंतर काही वर्षांनी मनोज कुमार यांच्या उपकार या चित्रपटात थोडाफार फरक करून हे गाणं घेण्यात आलं. मन्ना डे (Manna Dey) यांनी हे गाणं अतिशय भावस्पर्शी पद्धतीने गायलं. या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. (Untold stories)
आता तुम्ही विचाराल त्या टांझानियाच्या बँकरच काय झालं??? हा बँकर नंतर भारतात आला आणि तो देखील सिनेमा लाईनमध्ये आला आणि १९७८ साली त्याने एक सुपरहिट सिनेमा दिग्दर्शित केला. हा चित्रपट होता अमिताभ बच्चन यांचा ‘डॉन’ आणि हा बँकर होता चंद्रा बारोट (Chandra Barot)!